पेंटब्रश

Submitted by दिनेश. on 23 September, 2011 - 09:08

मागे झपाटल्यासारख्या पेंटब्रशमधे मी साड्यांची चित्रे काढली होती. पेंटब्रशच्या मूळ सुविधाच मी वापरत
होतो आणि मनासारखी डीझाईन्स जमतही होती. पण मूळ सुविधा वापरुन कापडाचा पोत काही जमत नव्हता.
सगळ्या साड्या सपाट (फ्लॅट) वाटायच्या. तलमपणा वा पोत नजरेला जाणवत नसे,
इथले पहिले काहि नमुने तसेच आहेत. शिवाय रंगाची हवी ती छटाही मिळत नसे, माझे प्रयत्न चालूच होते.
मग अचानक एका नव्या तंत्राचा शोध लागला, आता मला पोताचा साधारण अभास जमू लागला.
मग काहि नमूने तसेच केले.
आणि मग काही भरतकामाचा भास होईल असेही नमूने जमू लागले. (म्हणजे मला असे वाटले खरे.)
इथले नमुने प्रगतीच्या टप्प्याच्या क्रमानेच दिले आहेत.

भाऊंसारखे कसबी कलाकार हे तंत्र वापरुन बरेच काही चितारू शकतील. माझी कुवत नक्कीच तोकडी
पडलीय.

1 हा जून्या तंत्राने

2 हा नमुना पण जुन्याच तंत्राने

3 इथे तंत्र तोकडे पडले असे जाणवले

4 हा नुसता पोताचा प्रयोग

5 हा हि पोताचा प्रयोग

6 आता जरा धीर आला

7 इथे जरा पोतावर जास्त प्रयोग केले

8 मग साधे डिझाईन, नव्या तंत्रात

9 थोडे प्रिंटचे प्रयोग

10 जरा जास्त रंग वापरले

11 आणखी जास्त रंग

12 थोडे जरीकाम

13 मग थोड्या बुट्ट्या करुन बघितल्या

14 नुसती जरीचे काठ

15 जरा काriगरी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा दिनेशदा....... छानच डिझाइन्स.
अधिक आवडलेली :
क्र. १० थ्री-डी टाइप इफेक्ट .... मस्तच
क्र. १२ जरीकाम ... देखणं
क्र. १३ जरी + बुट्टी .... सुंदर कॉंबिनेशन
---------------------------------------------------------------------

छान

अहा! काय सुंदर साड्या वाटतायत. दिनेशदा, पण सुरुवातीच्या सपाट वाटणार्‍या साड्या खरं तर सिंथेटिक वाटतायत. म्हणजे तोही फसलेला प्रयोग नव्हे.

पण अशा साड्या तयार कोण करून देणार?

आम्हाला साधी सरळ लाईन सुद्धा निट मारता येत नाही Sad
तुम्ही डायरेक्ट साड्यांपर्यंत पोहोचलात ?
पेन्टब्रशातली ही चित्रकला तुमच्याकडून शिकायला आवडेल.

किती, सुरेख आहेत या डिझाइन्स..
दिनेशदा तुम्ही साड्या अप्रतिम डिझाईन करु शकाल..

आम्हाला साधी सरळ लाईन सुद्धा निट मारता येत नाही
तुम्ही डायरेक्ट साड्यांपर्यंत पोहोचलात ?
पेन्टब्रशातली ही चित्रकला तुमच्याकडून शिकायला आवडेल.
............. मनापासुन अनुमोदन

वाटत नाही की हे पेन्टब्रश मध्ये केलंय असे, खरंच सुंदर हात बसलाय तुमचा पेन्टब्रश वर.

<< दिनेशदा तुम्ही साड्या अप्रतिम डिझाईन करु शकाल.. >> करू शकाल ? "करता आहात" म्हणायचंय बहुधा तुहाला !
'पेंटब्रश' वापरणारे माझ्यासारखे रंगारी खूप आहेत; पण रंगारी व चित्रकार यातला फरक दिसतोच ना वरच्या डिझाईन्स, रंगसंगति व टेक्स्चरमधून !! अप्रतिम !!!

दिनेशदा __/\__
खूपचं भारी... पेन्टब्रश वापरुन थोडं आवघड जात असेल ना..... फोटोशॉप वापरुन त्या मानाने सोप्पं जाईल असं वाटतयं..

दिनेशदा शेवटच्या दोन साड्यांची "आरडर लिवा"(आपल्या नलिनीच्या भाषेत!).
भारी, अप्रतीम सुंदर!

माझी पहिली समस्या होती ती योग्य ती छटा मिळवायची. पेंटब्रशमधले एडीट कलर्स टूल वापरुन ती मिळत नव्हती. मग मी दूसर्‍या एखाद्या फोटोत ती मिळतेय का ते शोधले. तशी मिळाल्यावर जास्तीत जास्त झूम इन करुन नेमके पिक्सेल्स निवडले. फोटोत साधारण आजूबाजूच्या छटाही असतात. त्याही निवडून घेतल्या. त्यासाठी गरज वाटलि तर वेगवेगळे फोटो निवडले. मग त्या सर्व पिक्सेल्स चा एक चौकोन केला.
असा एक चौकोन झाल्यावर तो कॉपी केला, मग परत परत कॉपी करत सर्व स्क्रीन भरुन घेतला.
इथे दोनाचे चार, चाराचे आठ हे तंत्र उपयोगी पडले.
मग पुढचे काम सोपे होते.

याला जास्त वेळ लागत नाही.

Pages