संस्क्रुती व सुधारणा

Submitted by vedangandhaa on 21 September, 2011 - 05:30

माणूस हा निसर्गाचा एक घटक आहे.निसर्गावर प्रभुत्व मिळवन्याच्या हव्यासाने माणुसकीचे आकाश झाकळून गेले आहे.म्हणुन सुधारलेल्या जगाला आज संस्कृतीची गरज आहे.

पण नेमकी संस्क्रुती कशाला म्हणायचे? असा प्रश्न पडतो. मोठ मोठे विचरवंत म्हणतात की 'सुधारणा म्हणजे वैभव प्रदर्शन आहे तर संस्क्रुती प्रत्यक्ष जीवन दर्शन आहे' संस्क्रुती हे रूप आहे तर सुधारना हे संस्क्रुतीने परिधान केलेले वस्त्र आहे.सुधारणा सुखाने जगण्यास संगते पण संस्क्रुती कश्यासाठी जगावे ?याचे उत्तर संस्क्रुतीत मिळते. उपलब्ध सुविद्या पैश्याने मिळविता येते पण संस्कृतीची तत्वे उच्च जगाच्या पाठीवर कोणत्याच बाजरपेठेत मिळत नाहीत. जगण्याला अर्थ प्राप्त करून देणार्‍या मौलीक गोष्टींचे संवर्धन संस्क्रुतीत होते. स्वयंभू व स्वनिर्धारीत जीवन मुल्यांनी, आचार विचारांच्या नियामक तत्वांनी संस्क्रुतीची निर्मिती होते.

संस्क्रुती ही व्यक्ती आणि समाज यांच्यातील सजीव संबंधाचा परिपाक असतो.स्वभावतील मार्दव, निर्भयता आणि दृष्टीची व्यापकता म्हणजेच संस्क्रूती. श्रिमंती व संस्कृती यात कांही वेळा द्वैत आढळून येते.गरीब मणसे मनाने श्रिमंत असतात तर श्रिमंत केवळ धनाचे रखवालदार होतात्.सुधारनेमुळे येणारे वैभव कांही वेळा अधोगतीचे मूळ ठरू शकते.

संस्कृतीचे दर्शन मणसाच्या वगण्या, बोलण्यातून होते.'अंतरी निर्मळ आणि वाचेचा रसाळ' यातच संस्क्रुती आहे. संस्कृती समर्थांच्या पावनभि़क्षेत आहे,बुद्धांच्या भावनांत आहे(मैत्री, मृदुता,करूणा ,उपेक्षा)जैनंच्या सस्त्य,अहिंसा,आर्जव, मार्दव्,अपरिग्रह, क्षमा ईत्यादी.दशलक्षण धर्मतत्वांत आहे .टागोरांच्या विश्वधर्मांत ,विवेकनन्दांच्या विचारधनांत आणि ज्ञानदेवांच्या पसायदानांत आहे.

संस्कृती सांगण्यात नसते जगण्यांत असते.म्हणुनच म.गांधी ,गाडगेबाबा झोपडीत राहीले,बुद्ध वनांत गेले. आजच्या या वर्तमान युगात भौतीक वेगामुळे नैतीक वाटचाल मंदावली आहे व म्हणूनच विज्ञानाने थोडे मागे वळून पहावे व संस्क्रूतीला सुधारणेबरोबर येऊ द्यावे.शास्त्रिय उपकरणांच्या सुक्ष्मतेपेक्षा भावानिक तरलतेला महत्व देऊन लक्षही द्यावे.

मानवाहून श्रेष्ठ असे कांहीच नाही .म्हणून मानवतेची अवहेलना करणारे रजकारण वर्ज्य मानने ,साहित्य,संगीत ,धर्म्,तत्वज्ञान यांच्यात आनंद शोधने यालाच संस्क्रूतीचे सार म्हणतात्. अहंकारी माणूस नेहमीच दुसर्‍याला सुसंस्कृत आहात काय? तुमच्यात सुसंस्कृतपणा नाही? असे टोमणे मारताना दिसतो.तेव्हा नेमका सुसंस्कृत पणा म्हणजे तरी काय?

म्याथ्यू अर्नाल्ड नावाचे कवि म्हणतात की "ज्याच्या ठायी भावनांचे मार्दव्,बुद्धीची प्रगल्भता आढळते तो खरा सुसंस्कृत होय"प्रत्यक्ष दुसर्‍याला हिनवणार्‍याच्याच अंगी वरील गुणांचा अभाव असल्याने तो तसे बोलतो.प्लोटो म्हणतात की "अत्म्याचे संस्करण म्हणजे संस्क्रुतीचा कळस". शेवटी मानवाच्या ठायी असणारे उदात्त आणि उन्नत भाव हेच तर संस्कृतीचे आधिष्ठान आहे!.........

विनिता ल. पाटिल.

गुलमोहर: 

शुद्धलेखनाची समस्या आहे. दोन परिच्छेदांमधे एक ओळीचे अंतर सोडावे. आणखी विस्ताराला जागा आहे.
बाकी ठीक. Happy