Submitted by तुलशिदास on 12 September, 2011 - 16:20
स्वताचा वेबपेज तयार करायचा असल्यास स्वताजवळ कामपुटरच पाहिजे का? नसेल तर सायबरवर बसुन अपडेट करता येतो क?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉम्प्युटर नसला, किंवा
कॉम्प्युटर नसला, किंवा तुम्हाला कॉम्प्युटर चालवता येत नसेल तरी चालते. कुण्या वेब डिझाईन कंपनीला सांगून करवून घेतला तर फक्त पैसे द्यायची गरज. हवी तितकी वेबपेजेस तयार होतील.
तेच की. आपल्या माबोवरील एक
तेच की. आपल्या माबोवरील एक सदस्या हे काम करतात. http://www.graphikera.net/ इथे माहीती मिळेल.
उत्तर दिल्याबद्दल
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद्,मला स्वताची डायरि तयार करायची आहे,म्हनुन मला दुसस्याकडून करुन घ्यायची नाहि .असा काहि आसेल तर सानगा.
डायरी अप्पा बळवंत चौकात
डायरी अप्पा बळवंत चौकात स्वस्तात मिळतील. रविवार पेठेत घाऊक दरात स्वस्तात मिळतील.
अनिल
अनिल
>>मला स्वताची डायरि तयार
>>मला स्वताची डायरि तयार करायची आहे,>> तुलशिदास, मग ब्लॉग बनवा स्वतःचा आणि नित्य नेमाने लिखाण करा. त्यासाठी blogspot.com, wordpress.com सारखे पर्याय आहेत.
हो तेच करायच आहे म्हणून मि
हो तेच करायच आहे म्हणून मि पहिला प्रश्न विचारला आहे,माझ्याजवळ कामपुटर नाहि,सायबरमधे बसुन ते करता येईल का ?कशाप्रकारे करता येईल ते सविस्तर सागने.
मित्रा तुलसीदासा, गूगल ला
मित्रा तुलसीदासा,
गूगल ला विचार रे. 'how to make a blog' असं काही विचारलं तर बरीच माहिती मिळेल. सोप्प असतं.
दुसरी गोष्ट,
डायरी ऑनलाईन ठेवण्याचा मतलब काही समजला नाही. डायरी आहे म्हणून ती दुसर्याकडून बनवायची नाही. पण मग लोक वाचतील ना?
माझ्याजवळ कामपुटर नाहि आपल्या
माझ्याजवळ कामपुटर नाहि
आपल्या जवळ काम पुट करणा-याला मराठीत बॉस म्हणतात
तुलशिदास माफ करा, तुमच्या
तुलशिदास माफ करा, तुमच्या प्रश्नातच विचारून घेतो आहे.
लोक हो, मी पण स्वतः वेबपेजेस तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे (ब्लॉग नाही).
आधी पेजेस तयार करून मग होस्टिन्ग विकत घेऊन वेबसाईट करायची आहे.
मी एका चांगल्या GUI असलेल्या tool च्या शोधात आहे, ज्यामधे सहज drag and drop करून पेज बनविता येईल.
या साठी आत्तापर्यंत केलेले प्रयत्न खालील प्रमाणे,
१. BlueVoda Website Builder : हे काही प्रमाणात free असुन अगदी मला हवे तसे आहे, पण याचा प्रॉब्लेम असा आहे की जी पेजेस तयार होतात ती html नसुन bvp extension तयार होतात, होस्टिन्ग कम्पलसरी त्यांच्याकडेच विकत घ्यावे लागते. bvp ची html पेजेस करण्याची युक्ती गुगल वर सापडली पण ती सुद्धा कटकटीची आहे. त्यामधे बरेचसे कन्टेन्टसची इमेज तयार होत असल्याने html मधे आणताना फार कटकटीचे आहे.
२. Microsoft WebMatrix : हे freeware असुन खुप म्हणजे खुपच चांगले आहे पण ब्लू व्होडा प्रमाणे drag n drop नाहीये, सर्व काही html, css, javascript, etc. विचार करून करावे लागते. मी हे पण करून पाहिले पण div ने खुप हैराण केले, page layout is looking different in IE and other browsers like firefox, chrome त्यावर पण शोध घेऊन पाहिला तर उपाय असा की IE साठी वेगळी css आणि बाकी browsers साठी वेगळी css तयार करणे की जे अजुनच complicated होणार.
३. Wordpress, Jumla, Drupal : हे प्रकार अजिबात म्हणजे अजिबातच user friendly वाटले नाहीत. प्रोग्रामिन्ग करून करणार्यांसाठी ठिक आहे (अगदी प्रोफेशनल वेबसाईट) पण सर्व सामान्य हौशी लोकांसाठी हे प्रकार किचकट आहेत.
मला शक्यतो static pages च बनवायची आहेत, त्यामधे pictures and script असेल, तसेच भारतीय भाषांमधे पण मजकुर लिहायचा आहे.
कृपया कोणी चांगला उपाय सुचवू शकाल का ?
कृपया वरील प्रश्नावर
कृपया वरील प्रश्नावर जाणकारांनी मार्गदर्शन करावे
क्रुपया weebly.com वापरून
क्रुपया weebly.com वापरून पहा, एकदम छान वेबसाईट तयार होते. मी वापरून पाहिले आहे
प्रफुल्ल, धन्यवाद, मी जे शोधत
प्रफुल्ल, धन्यवाद, मी जे शोधत होतो ते बहुतेक यामधे मिळेल असे दिसते आहे, प्रयत्न करून सांगतो.
तुलशिदास
तुलशिदास http://www.blogwale.info/ इथे वाचा...मराठी/इंग्रजी दोन्ही भाषेत ब्लॉग कसा बनवायचा हे सोपे करून सांगितलंय.
ही लिंक बघा. इथे खूप फुकट
ही लिंक बघा. इथे खूप फुकट (आणि विकत) 'थीम्स' पण आहेत.
सल्ला: फुकटच्या थीम्स बर्याच आहेत पण बेसिक आहेत, स्वतःही थीम्स बनवता येतात थोडी माहिती असली तर.
तुलशिदास, येथे तुम्हाला ब्लोग
तुलशिदास,
येथे तुम्हाला ब्लोग तयार करता येइल:
https://accounts.google.com/ServiceLogin?service=blogger&passive=1209600...
तुम्हला तुमचा ई मेल इथे नोंदवावा लागेल. तुमच्या ब्लोगला नाव द्यावे लागेल. आणि तुम्हाला आवडेल format निवडावा लागेल. हे अगदी सोपे आहे आणि यासाठी स्वतःकडे computer असण्याची अजिबात गरज नाही.
प्रमोद्,धन्यवाद मि ब्लागवाले
प्रमोद्,धन्यवाद मि ब्लागवाले साईड वाचुन पहातो.मला तेथे भरपुर माहिती मिलेल अशी अशा व्यक्त करतो,आणी तेथुन भरपुर शिकुन घेतो.
माझाही १ प्रश्न आहे. ब्लॉग
माझाही १ प्रश्न आहे.
ब्लॉग मधे वरती टॅब कश बनवतात..??
आपला ब्लॉग कमर्शियल
आपला ब्लॉग कमर्शियल जाहीरातीसाठी वापरला तर चालतो का? स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल माहिती इ इ असेल तर चालते का?
ब्लॉग आणि वेब पेजमध्ये फरक
ब्लॉग आणि वेब पेजमध्ये फरक काय?
वेब साइट आणि डोमेन दोन्ही
वेब साइट आणि डोमेन दोन्ही फुकटात होऊ शकते का?
http://www.socialdesire.com/2
http://www.socialdesire.com/2007/10/23/difference-between-a-website-and-...
माझा ब्लॉग तयार झाला. गुगल.
माझा ब्लॉग तयार झाला. गुगल. याहु सर्च मध्ये यावा यासाठी काय करावे?
वेबसाईट तर गुगल मधे पण तयार
वेबसाईट तर गुगल मधे पण तयार करता येते (https://sites.google.com). पण त्या साईट आधी गुगल असे दिसते.
जी मेल अकाऊंट असेल तर असे करता येईल.
हो गूगल वर माझिपन आहे आणि ते
हो गूगल वर माझिपन आहे आणि ते छानही आहे आणि सोप्पहि आहे .....
AkaSh Thakre सर्च करा गूगल वर.