अनिवासी भारतीय आणि प्राप्तीकर

Submitted by धारा on 10 September, 2011 - 13:45

२८ डिसेंबर २००७ पासून इथे रहाणारे एक नातेवाईक परत भारतात जात आहेत. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमधे जातील. ते अनिवासी भारतीय मानले जातील का? इथली सिटीझन्शिप वगैरे नाही. केवळ नोकरीसाठी इथे रहात होते.
२८ स्प्टेंबर पर्यंत जर भारतातून बाहेर पडून जास्त काळासाठी परदेशी गेलं तर (१८१ दिवसांचे वास्तव्य होत नसल्यामुळे) त्या आर्थिक वर्षाचा इनकम टेक्स भरावा लागत नाही असं सकाळ पेपरमधे वाचलं. तसाच काही नियम वगैरे भारतात परत जाताना असतो का?
असेल तर काय असतो? भारतीय आर्थिक वर्षातले किती दिवस परदेशी असल्यास टेक्स लागत नाही?
आर्थिक नुकसान न होण्यासाठी काय करता येईल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय आर्थिक वर्षातले किती दिवस परदेशी असल्यास टेक्स लागत नाही?>> एप्रिल - मार्च या आर्थिक वर्षात सलग १८३ दिवस भारताबाहेर असेल तर कर लागत नाही... तर तुमच्या नातेवाईकाला १ ऑक्टोंबर नंतर भारतात जायला सांगा...

राजु एक दुरुस्ती , ते सलग १८३ दिवस नाहीत तर त्या आर्थिक वर्षात एकुण १८३ दिवस किंवा जास्त दिवस भारताबाहेर वास्तव्य असेल तरच परदेशातील उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागत नाही.

धन्यवाद राजू७६, श्री.

http://www.nritaxservices.com/who_nri_fema.htm
या वेबसाईटवर बरीच माहिती आहे, पण त्यात ९ वर्षांच्या भारताबाहेरील वास्तव्याबद्दल काही नियम वगैरे आहेत.
पण जर ९ पेक्षा कमी वर्षे भारताबाहेर असतील तर गेल्यावर खूप टेक्स (हे कसं लिहायचं) भरायला लागणार नाही ना? कारण ९+ नियमात देशात परतल्यानंतरही २ वर्षं RNOR म्हणून करसवलत असते.

परदेसाई | 14 September, 2011 - 13:34
टॅक्स हे TEks असे लिहावे

अहो ते पार्शी मराठीत लिहिताहेत.