पाऊस

Submitted by vedangandhaa on 8 September, 2011 - 09:04

थेंब टपोरे नचता
वार्‍यासंगे ओला गंध
व्हावी नव्याने ओळख
तस्म मनं झल धुंद.

माझे अंगण हासले
हिरव्या पाचूच्या पानांत
उन्ह पिवळे लाजले
रूप बिलोरी ऐन्यात

थेंबासंगे गाऊ गाणी
आणि वेचू आठवणी
वारा खट्याळ बोलतो
पानाच्या कनोकानी.

मतीचा गंध ओला
श्वासातून देहांतरी
मोहरून मन गेल
शोधू कश्यास कस्तूरी.

सौ. विनित ल. पाटिल.

गुलमोहर: 

अरे व्वा ....आवडली Happy

थेंब पोरे नचता
वार्‍यासंगे ओला गंध
व्हावी नव्याने ओळख
तसं मनं झालं धुंद.

माझे अंगण हासले
हिरव्या पाचूच्या पानांत
उन्ह पिवळे लाजले
रूप बिलोरी ऐन्यात

थेंबासंगे गाऊ गाणी
आणि वेचू आठवणी
वारा खट्याळ बोलतो
पानाच्या कनोकानी.

मतीचा गंध ओला
श्वासातून देहांतरी
मोहरून मन गेलं
शोधू कश्यास कस्तूरी.