यु एस बी पोर्टचा प्रॉब्लेम

Submitted by अनन्या_न on 5 September, 2011 - 00:28

आमच्या घरी दोन महिन्यापूर्वीच नवीन पीसी आणला (असेंबल केलेला). आणला त्यावेळी त्याच्या त्याचा युसबी पोर्ट वापरुन पाहिले नाही. आता काही कामास्तव सीपीयुच्या समोरील दोन युसबी पोर्ट मध्ये पेन ड्राईव्ह लावला असता एकात पेन ड्राव्हव डिटेक्ट होतो, एकात नाही. त्यानंतर सीपीयुच्या मागे लावून पाहिला असता तिथे पण अगदीच तसच होतं. सगळं करुन पाहिल्यावर एक लक्षात आलं की एक पेन ड्राईव्ह असताना बाजूच्या पोर्ट मधला पेन ड्राईव्ह दिसत नाही. म्हणजे एकावेळी फक्त एकच पोर्ट चालते. ईंजिनिअरला बोलवणार आहे पण त्यापूर्वी जाणून घ्यायचं आहे हा प्रॉब्लेम कशामुळे येतोय. हा हर्डवेअरचा प्रॉब्लेम आहे सॉफ्ट्वेअरचा? पीसीमध्ये विंडोज एक्सपी आहे जे माझ्या एका मित्राने ईन्स्टॉल करुन दिले आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढच्या बाजुला असलेले पोर्ट हे युएसबी १.० आहेत का ते विचारा. माझ्याकडे असे होत होते, मग एका शहाण्या (?) हार्डवेअरवाल्याने ते काढूनच टाकले. ना रहेगा पोर्ट ना चलेगा कोई बाहरी डिवाईस. Uhoh

connection nit kele nasel.......nahi tar to tumachyaa cabinet cha problem aahe....cabinet badalun ghyaa...maage suddha hot asel tar mag connection chuki che kelele aahe...

कदाचित युएसबी चे ड्रायवर्स नीट टाकले गेले नसतील. पुढील बाजुचा प्रॉब्लेम कनेक्शनमुळे होऊ शकतो. मागील बाजुस प्रॉब्लेम येत असेल तर मदरबोर्डचा म्हणावा लागेल.

महेश, उदय, भ्रमर धन्यवाद..
भ्रमरजी मला तेच विचारायचे होते की ड्रायवर्स नीट टाकले नसतील तर प्रॉब्लेम होऊ शकतो का? तपासून बघते.

महेशजी जर १.० असेल तर असा प्रॉब्लेम होतो का?

बाप्रे जी वगैरे नका म्हणू...
१.० आणि २.० मधे स्पीडचा फरक आहे असे म्हणतात, तसेच आजकाल बरीच डिवाईसेस ही फक्त २.० पोर्टला चालतात आणि १.० ला चालत नाहीत. तज्ज्ञ लोक जास्त प्रकाश टाकू शकतील.

पोर्टस फॉल्टी असण्याची शक्यता आहे.
अथवा, अजून एक शक्यता आहे की, पोर्टस वेगवेगळ्या व्हर्जनचे असावेत. १.० आणि २.० (किंवा ३.०) तसं असेल तर सिस्टीम मध्ये जावून आधी तपासा की नक्की कोणते व्हर्जेन आहेत आणि त्यानुसार ड्रायवर नसतील तर इंस्टॉल करा.

डिव्हाईस मॅनेजरमध्ये जाऊन बघा, तुम्हाला नक्की कळेल किती यु एस बी पोर्ट इँस्टाल केले आहेत. (My Computer > Right Click > Properties)

किंवा एकदा हा प्रयत्न करून बघा

एकेका पोर्टला राईट क्लिक करून अन-इँस्टाल करा, आणि ते झाल्यावर प्रत्येक पोर्टला पेन ड्राव्हव लावा. तो ड्राईव आणि ड्रायवर्स आपोआप परत इँस्टाल होईल.... Happy Happy

आणि हो USB 3.0 आले आहेत Happy

http://en.wikipedia.org/wiki/USB_3.0

डिव्हाईस मॅनेजरमध्ये जाऊन बघा.
(My Computer > Right Click > Properties)
खाली दाखवल्याप्रमाणे क्लिक (View > Devices by connection)

1.JPG

Expand all the switches till you find the follwoind view:

2.JPG

लाल वर्तुळ USB पोर्टस दाखवत आहेत. कुठेही "? मार्क" नकोत. तुमच्या device manager चा screen shot इथे शेअर केला तरी चालेल.

Insert USB pen drive in each port and it should be enumerated.

१.० (Full Speed) devices will enumerate with Universal Host Controller.
2.० (High Speed) devices will enumerate with Enhanced Host Controller.

हा नक्कीच मदरबोर्डचा प्रॉब्लेम आहे. connection चा प्रॉब्लेम आहे.

स्वतः दुरूस्ती करण्यापेक्षा ज्याच्या कडून नवीन पीसी आणला आहे त्याला फिक्स करायला सांगा, नाहीतर तुम्ही हात लावला म्हणुन तो जबाबदारी नाकारेल