गणपतीची आरती

Submitted by हर्षदा परब on 3 September, 2011 - 04:48

आमच्या शेजारच्या गणपतीला म्हटली जाणारी नवीन आरती,(म्हणजे मी तरी पहिल्यांदाच ऐकलीय)ही आरती मी स्वत: रचलेली नाही,पण मला ही आरती फार आवडली आणी नवीनही आहे म्हणुन मी इथे टाकत आहे.:)
(चाल-गोरी गोरी पान फुलासारखी छान)
गोरा गोरा पान सुपाएवढे कान
गौरी माते तुझा गणपती छान.
भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थी
घरोघरी आणती गणेशाच्या मुर्ती
गणेशाच्या पुढे आरती गाऊ या छान
गौरी माते तुझा गणपती छान.
गणपती आणायला किल्लारी गाडी
किल्लारी गाडीला उंदराची जोडी
उंदराच्या जोडीचे चिमुकले कान
गौरी माते तुझा गणपती छान.
गणपतीला बसायला सोन्याचा पाट
सोन्याच्या पाटापुढे चांदीचे ताट
चांदीच्या ताटामध्ये फुले होती छान
गौरी माते तुझा गणपती छान.
गणपतीला केले होते मोदक आणी लाडु
मोदक आणी लाडु त्याला एकवीस वाढु
एकवीस लाडु त्याला आवडतात छान
गौरी माते तुझा गणपती छान.

गुलमोहर: 

छान आहे !

मस्त

हर्षदा,
एक जुनी रचना जी स्मृतीपटलावर अंधूक झाली होती, तिला उजाळा मिळाला. धन्यवाद!