साड्यांचा सेल लागलाय !!!

Submitted by दिनेश. on 1 September, 2011 - 09:58

आज अचानक मूड लागलाय. पैठणीनंतरचे हे दोन नमुने.. !!

आता बास करतो.

गुलमोहर: 

सुंदर.

छानच !
[ दिनेशदा, सेल इथंच आहे, हे बरंय. मा.बो.करणीनी घडी मोडून, अंगावर घेऊन व उजेडात नेऊन साड्या पाहून घेण्याची इथं सोय असती, तर तुम्हाला हात मोडेपर्यंत पुन्हा पुन्हा घड्याच करत बसावं लागलं असतं ! Wink ]

मामी, कॉटन नाही सिल्कमधेच असते ही. खास करुन लग्नप्रसंगी नेसतात.
पुर्वी क्रॉस मैदानात सरकार तर्फे विणकरांचा मेळावा भरायचा. अनेक प्रकारच्या साड्या प्रत्यक्ष विणताना बघायला मिळायच्या, त्यावेळी मला खुप इच्छा व्हायची. ती अशी पूर्ण केली.

काळी, ती संक्रांत साडी.
आणि लाल पांढर्‍या साडीला, "घरचोला" असा शब्द आताच एका गुजराथी मित्राने सांगितला. (खात्री करावी लागेल.)

"घरचोला" असा शब्द आताच एका गुजराथी मित्राने सांगितला. <<< घरचोला बरोबरे पण त्याचे काठ थोडे अजून उंच हवेत आणि ही साडी नुसतीच गोल नेसली जाते. ओढणीसाठी वेगळी लाल रंगाची कींवा पांढर्‍या लाल कॉम्बो मधलीच दुसरी साडी असते. वधू वस्त्र आहे हे बहुतेक.

घरचोला" असा शब्द आताच एका गुजराथी मित्राने सांगितला >>> हा शब्द नाही ऐकला इकडं, पण लाल पांढर्‍या साडीला - लग्नातल्या पानेतर म्हणतात.
ओढणीसाठी वेगळी लाल रंगाची कींवा पांढर्‍या लाल कॉम्बो मधलीच दुसरी साडी असते. वधू वस्त्र आहे हे बहुतेक. >> हो हो, वधुवस्त्रच आहे ते. दोन नेसतात एकदम. आतली भारी अन वरची पानेतर पतली एकदम. Happy

दिनेश,
डिजीटल आर्ट एकदम मस्त,
आता एकही क्षेत्रं असं उरलं नसेल जिथे तुमची मास्टरी नाही Happy

आमची पण आरडर........नलिनीबरोबर!

आतली भारी <<
तीच घरचोला गं.
पानेतर शब्द आठवत नव्हता बघ.
घरचोला + पानेतर असा सेट असतो.

अर्थात या प्रकारच्या साड्या वेगळ्या पण नेसतात पण मग त्यात सफेद रंग नसतो कॉम्बो ला. Happy

आतली भारी <<
तीच घरचोला गं. >> हो का? ऑफिसातल्या प्रियंका / नेहाला विचारते, हल्लीच लग्न झालयं दोघींचं. पानेतर-पानेतर करायच्या या मुली. Happy

आता एकही क्षेत्रं असं उरलं नसेल जिथे तुमची मास्टरी नाही
>>
+१००

मस्तच आहे Happy
मला पैठणीची लिंक द्या ना
दिनेशदांच्या लेखनात गेलं की ते मुळ फोटो शोधायचा रहातोय आणि त्यातल्या पदार्थांचे फोटोज पासुन तोंपासु
दिनेशदांचं लेखन ढुंडाळायचं हा एक अत्याचार वाटतोय