गणपती बाप्पा मोरया!

Submitted by आदित्य चंद्रशेखर on 1 September, 2011 - 01:14

ganesh-wallpapers-photos.jpg
बाप्पा, आज तुम्ही आलात. मागच्या वर्षी तुम्हाला ’पुनरागमनायच’ म्हटल्यापासून या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. दरवर्षी आम्ही आनंदाने तुम्हाला घरी आणतो, दहा दिवस तुमची बडदास्त ठेवण्यात कसे निघून जातात हेसुध्दा कळत नाही. या दहा दिवसात तुम्हाला आम्ही आमच्यातलं प्रेम, माणुसकी, हेवेदावे कसे आहेत ते सगळं सगळं दाखवतो आणि साकडं घालतो की हे गणराया, आम्हाला सुबुद्धी दे, हे दे, ते दे आणि काय काय दे. पण परत तुम्ही पुढच्या वर्षी बघता की आमच्यात तसूभरही फरक पडलेला नसतो. देवा, आम्हाला माहीतीये की आम्ही सुधारायचं मनावर घेतल्याशिवाय परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही. पण बाप्पा, ’कळतं पण वळत नाही’ अशी आमच्या सर्वांची अवस्था आहे. तेव्हा बाप्पा, यंदा तरी आम्हाला कळालेलं वळायची बुध्दी दे हेच मागणं आहे!

गणपती बाप्पा मोरया!

(चित्र आंतरजालावरुन साभार)

गुलमोहर: