भिंतीवरचे घड्याळ

Submitted by बस्के on 31 August, 2011 - 15:26

मी केलेले मॅथेमॅटिकल वॉल क्लॉक.. काटे जुन्या घड्याळाचे वापरले. बाकी पेपर्,कार्डबोर्ड, वॉटरकलर्स..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

:अत्यंत ओशाळलेली बाहुली: .. मीच बनवलय हे पण कोणीतरी मला प्लीज, प्लीज, प्लीज १० आकड्याचा रेफरन्स सांगा! गामा रेज वगैरे सगळं डोकं लावून झालंय..

बस्के, काटे जुन्या घड्याळाचे म्हणजे काटे आणि बरोबरचं एलेक्ट्रिक सर्कीट(?) का?

छानच .. ५, ७, ११ १२ कळत नाहीये ..

१० = g = gravity (९.८ kg/m2) का?

x` = 3` + 5` असं आहे का ते? ` हे चिन्ह transpose साठी आहे का? समजावून सांग म्या पामराला ..

सशल, ते
x square = 3 sq + 4 sq आहे. पायथॅगोरस.
१० आणि ११ मला कळले नाहीत.

५ चुकल आहे, तुमच्या equation(मराठी शब्द महीत नाही) नुसार ते २५ होत. त्या equation मधे square root घाला. १० ला पण round(g) करा.

>> log(55) = 1.74

बेस न लिहीता नुसतं लॉग लिहीलं की बेस 'e' असतो ..

बाकीचे बेसेस specify करावे लागतात ..

हो स्वातीचे बरोबर आहे.
रसमलाई, सशल ते स्क्वेअर आहे. २ आकडा आहे. नीट दिसत नाहीये फोटोत.
५ स्क्वेअर = ३ स्क्वेअर + ४ स्क्वेअर

0b = hexadecimal ११

सशल हो काटे+सर्किट हे सगळं जुन्या घड्याळाचे आहे.

बायदवे मोठ्ठा श्रेयअव्हेर : हे इक्वेशन्स मी नाहि तयार केलेत. गुगल करून असं इक्वेशनवालं घड्याळ मिळालं. बाकी रंगरंगोटी ( जिओमेट्रिक शेप्सचे डिझाईन हे मी केलेय..)

Hexadecimal आहे होय. ओके ओके. Happy
(बायनरी दिसल्यावर ट्यूब पेटायला हवी होती. Happy )

बस्के, ते 'b कळत नाही गं .. Sad

रसमलाई, log 55, base 10 = 1.74, log 55 (no base specified, hence e) which is same as ln 55 = 4.007 ..

equation सोडवलं वरचं तर उत्तर ५ मिळतं ना?

>> बायनरी दिसल्यावर ट्यूब पेटायला हवी होती. स्मित

हो की .. बायनरी आणि माझं जमत नाही हल्ली बहुतेक .. (आठवा There 10 kinds of people in this world, those who understand binary and those who don't ह्यावरचा मी नंद्याला विचारलेला प्रश्न .. :p)

मस्त. XKCD वरील या कार्टुनची आठवण झाली:

http://xkcd.com/899/

त्याचे शिर्षकही येथे समर्पक आहे:

The Wikipedia page 'List of Numbers' opens with 'This list is incomplete; you can help by expanding it'.

Pages