असंच काही इकडलं तिकडलं.. :)

Submitted by तात्या अभ्यंकर on 24 August, 2011 - 03:20

छ्या बुवा! ही दीक्षा सेठ नावाची नटी आहे म्हणे..! २१ च वर्षांची आहे. मी ४२ वर्षांचा म्हणजे वास्तविक तिच्या बापाच्या वयाचा. मग हिला पाहून मला चाळवल्यासारखं का झालं बरं? तसा अन तेवढा वासनेनं बरबटलेला आहे का मी..?

नक्कीच नाही, खचितच नाही. कारण सर्व वयाच्या पोरीबाळीत, बायकांत मी मोकळेपणाने वावरतो आणि ज्या अर्थी त्या मला त्यांच्यात तसा वावरू देतात, मोकळेपणी माझ्याशी बोलतात त्या अर्थी मी तसा नसावा.. Happy

मग ही आणि हिच्यासारख्या अनेक नट्यांना पाहून किंवा माझ्या अवतींभोवती वावरणाऱ्या काही आकर्षक स्त्रियांना पाहून माझ्या मनात चलबिचल का होते? अशी चलबिचल फक्त मलाच होते की माझ्यासारख्या कित्येक पुरुषांना ती होते..? येथील काही पुरुष वाचकांनी याचा खुलासा केल्यास बरे होईल! Happy

काही बायकांच्या बोलण्यात तर 'अगदी म्हातारपणाकडे झुकलेली काका/मामा/आजोबांसारखी काही मंडळी तर जामच चालू असतात बुवा! उगीच, 'बेटा', 'मुली' असं संबोधून पाठीवरून हात वगैरे फिरवून घेतात. या ना त्या कारणाने स्त्रियांना स्पर्श करण्याचा चान्स सोडत नाहीत...' असा नेहमी उल्लेख येतो. चर्रकन शहारा आणणारे असतात ते स्पर्श असंही त्या म्हणतात..

छ्या बुवा..! विचारांचा सगळाच गोंधळ वाटतो आहे का..?

काकाजी म्हणाले होते, "बेटा श्याम, ठेव बाबा ते गीतेचं पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे ते. पण आपण नाही ना इतके थोर..!

कबुलीजबाब देताना आचार्य म्हणाले होते, " केरसुणीनं समुद्राच्या लाटा परतवायची महत्त्वाकांक्षा आमची..! ती कशी जमणार..?!

छ्या..! आज या मुलीचं चित्र पाहून आमच्या तर तिच्यायला केरसुणीची सारी हिरंच गळून पडली..

समिदराच्या लाटा काय परतवणार, कप्पाळ..?! Happy

(स्खलनशील) तात्या.

गुलमोहर: 

सुंदर आहे दीक्षा सेठ.

सौंदर्याचं अ‍ॅप्रेसिएशन आणि भावना चाळवणे या वेगळ्या गोष्टी आहेत.