हळू टाक पाऊले

Submitted by पिटुकली on 21 July, 2011 - 07:31

हळू टाक पाऊले
नको वाजवू कडीही
शांत निश्चिंत
निजली आहे परीराणी

खेळ खेळूनी दमली
चिऊ काऊ बाहुल्यांशी
खळी गालावर खोल
मम मनीही ठसली

आता निजेतही
कोण हसविते हिला
निद्र!राणीलाही काय
भुरळ पडली

दीसभर ठआइ ठआइ
हास्यकल्लोळ मांडला
घरभर विखुरल्या
आनंदाच्या खुणा

धरी आईचा पदर
बाबा घोडा घोडा करी
आजी आजोबांची होई
मुकया पाप्यान्नी चंगळ

खेळ खेळूनी दमलि
गोड माझी सोनुकली
दृष्ट लागो न बाई
तीट गालाला लावली

गुलमोहर: