Submitted by सांजसंध्या on 20 July, 2011 - 05:36
कवि अनिल यांनी मुक्तछंद हा प्रकार लोकप्रिय केला असं म्हणतात. डॉ मीरदेव गायकवाड यांचं काव्यबंध हे पुस्तक वाचनात आलं होतं त्यात दिलेल्या माहीतीप्रमाणे मुक्तछंद म्हणजे सैलसर बंध. वृत्त(छंद) बद्ध रचनेतून मिळालेली थोडीशी सूट असं म्हणता येईल.
उदा. अष्टाक्षरी या अक्षरगणवृत्तामधे एखादी रचना सादर करतांना एखाद्या ओळीमधे एक अक्षर कमी पडत असेल तर तिथे घेतलेली सूट हा सैलबंध झाला. मुक्तछंदाला पूर्वी सहजकाव्य असं नावं होतं हे ऐकलय. तसच मुक्तछंदाचे वेगवेगळे प्रकार होते.
या प्रकारांची माहीती कुणाकडे आहे का ?
हल्ली गद्य उता-यांना मुक्तछंद म्हटलं जातं ते योग्य आहे का ? तसच मुक्तकविता म्हणजे काय , मुक्तके म्हणजे काय याचीही माहीती हवी आहे.
- संध्या
गुलमोहर:
शेअर करा
या विषयी मलाही वाचायला आवडेल.
या विषयी मलाही वाचायला आवडेल.
"मुक्तक" विषयावर नुकतीच काही
"मुक्तक" विषयावर नुकतीच काही महिन्यांपूर्वी इथे चर्चा सुरू होती -
http://www.maayboli.com/node/21877
नक्कीच आवडेल वाचायला.
नक्कीच आवडेल वाचायला.
आनंदयात्री - मुक्तछंद
आनंदयात्री - मुक्तछंद
मी तरी आत्ता चालू असलेली
मी तरी आत्ता चालू असलेली मीटींग संपल्यावर लिहिणार बुवा या धाग्यावर!
सांजसंध्या, जेवढे ऐकले, वाचले
सांजसंध्या, जेवढे ऐकले, वाचले तेवढे नोंदवून ठेवतो.
१. कवितेला छंदाची अट आहे पण आपल्याला हवा तो आशय त्या छंदात अचूकपणे मांडता येत नही, रूपके किंवा प्रतिमांच्या भाषेतही मांडता येत नाही आणि आशयाशी अप्रामाणिक तर व्हायचे नाही अशा परिस्थितीत छंदात घेतलेल्या 'क्षुल्लक / कमीतकमी / रसिक, वाचक यांना मान्य होतील इतपत/ एखाद्या मात्रेच्या / उदाहरणार्थ दहा ओळींच्या कवितेत (हे फक्त उदाहरण) तीन ते चार सुटी अशा सुटींना मुक्तछंद म्हंटले जाऊ लागले.
२. मुक्तछंदाबाबतीत बोलताना (मुक्तछंदाच्या बाजूने बोलताना) अनेक कवी नेहमी एकच विधान करताना दिसतात की आमचे काव्य मुक्तछंदात आहे मात्र छंदमुक्त नाही. हे विधान माझ्यामते गफलतयुक्त आहे. छंदमुक्त याचा अर्थ जर छदापासून मुक्त असा असेल तर मुक्तछंद म्हणजे छंदात घेतलेली सुट असे म्हणावे लागेल व त्या दोन्हीतील सीमारेषा कुणीही कधी ठरवू शकणार नाही. एकदा छंदापासून फारकत घेतली की तो मुक्त्तछंद छंदमुक्तच झाला हे मान्य करण्यात त्यांना अडचण वाटते यामागे 'आम्ही वाटले तर छंदातही लिहू शकतोच' ही भावना असते.
३. क्रमांक १ चा मुद्दा नोंदवल्यानंतर हे लक्षात यावे की किरकोळ किंवा दुर्मीळपणे सूट घेणे हे केवळ आशयाशी प्रामाणिक राहण्यासाही असून त्या रचनेत प्रामुख्याने एक रिदम, एक लय ही तरीसुद्धा राहतेच. (पुढील प्रतिसादात उदाहरणे देईन). त्या रचनेत यमक जुळवण्याचा किमान प्रयत्न राहतोच. सूट ही केवळ एक सूट असते मात्र ती सोडली तर रचना बरीचशी लयीत म्हणता येते.
४. मात्र! क्रमांक ३ चा मुद्दा डायल्यूट होत होत अशा अवस्थेत आहे (श्रेष्ठ उदाहरण डॉ अरुणा ढेरे आणि विंदा ) की मुक्तछंदातील कविता म्हणजे अक्षरशः 'क शी ही' बांधणी असलेली कविता! त्यात 'आशयाशी प्रामाणिकता' याव्यतिरिक्त काहीही बांधिलकी नाही. मग गद्य लिहिणार्या जीएंच्या आशयघन लेखनाला कविता का म्हणू नये याचे उत्तर कसे देणार? ओळी तोडल्या, एकाखाली एक शब्द लिहिले, कवीसंमेलनात काही ओळी दोनदा वाचल्या की ती कविता'च' झाली ही व्याख्या मुक्तछंदाचा गैरफायदा घेऊन कविता म्हणून गद्य किंवा व्याकरणाचे नियम न पाळलेल्या ओळी रसिकांच्या गळी उतरवणार्यांनी मांडण्यात यश मिळवलेले आहेच. आपण शाळेत असतानाही कविता म्हणजे प्रामुख्याने लयबद्ध गीतरचना असायची. ती कवितेची बांधणीसंदर्भातील गरज पायदळी तुडवण्याइतकी साहित्यिक उन्नती करण्यामागची भूमिका काय? गद्य आणि पद्य या शब्दात फरक काय?
५. मायबोली गुलमोहरात येत असलेल्या ९० % कविता बांधणीने अजिबातच कविता नसतात. आशय सुंदर असू शकतो. मग आशय सुंदर काय फक्त कवितेचाच असतो? कितीतरी गद्य लेखनही असते ज्याचा आशय सुंदर असतो. (ठळक उदाहरण दाद, हबा)! मग त्यांना कविता'च' का म्हणू नये? कविता विभागात डकवताना ओळी तोडणे, टिंबे देणे, उद्गारवाचक चिन्हे देणे आणि शब्दांचा क्रम उलटपालट करून लिहिणे इतकेच करावे लागते. अन्यथा ते सरळ गद्यही ठरू शकते. फक्त सुंदर आशय म्हणजे कविता हा समज योग्यच आहे हे कसे काय मान्य होते?
नुकतेच कैलास गायकवाड व निशिकांत यांच्याबरोबर ज्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी संमेलनाला गेलो होतो तेथे मिळालेल्या पुस्तकांमध्ये (उर्दू शायरी, नझ्म, गझला इत्यादी) 'मुक्तछंद कसा असावा' याची इतकी सुंदर उदाहरणे मिळाली की बस! ती पुढील प्रतिसादात देणार आहे. ती वाचल्यानंतर 'किमान मुक्तछंद या शब्दात मुक्त का होईना पण छंद आहे' इतके तरी पचनी पाडले जावे.
हल्ली गद्य उता-यांना मुक्तछंद म्हटलं जातं ते योग्य आहे का ?>>>
माझ्यामते तरी नाही.
तसच मुक्तकविता म्हणजे काय , मुक्तके म्हणजे काय याचीही माहीती हवी आहे>>>
मुक्तकविता म्हणजे काय माहीत नाही. (मुक्तछंदातील कविता असाच अर्थ असल्यासही माहीत नाही). मुक्तक मात्र चार ओळींचे असते व त्यात पहिल्या, दुसर्या व चौथ्या ओळीत यमक असते. मुक्तक वृत्तबद्ध असते व मुक्तकाला मराठी रुबाई म्हणता येत नाही असे म्हणतात कारण रुबाईची वृत्ते वापरली तर'च' रुबाई म्हंटली जाते असे म्हणतात.
-'बेफिकीर'!
कवितासंग्रह - खोया हुवा सा
कवितासंग्रह - खोया हुवा सा कुछ
कवी - निदा फाजली
मुक्तछंदाचे उदाहरण - ठळक केलेली अक्षरे. शब्द ई.
====================================
हुआ सवेरा
जमीन पर फिर अदबसे आकाश
अपने सर को झुका रहा है
कि बच्चे स्कूल जा रहे है (बोलताना 'ई'स्कूल म्हणतात व तसे केल्यासच वृत्तात म्हणता येईल)
वृत्त - लगालगागा लगालगागा असे!
===================================
नदीमे अस्नान करके सूरज
सुनहरी मलमलकी पगडि बांधे
सडक किनारे
खडा हुआ मुस्कुरा रहा है
कि बच्चे स्कूल जा रहे है
येथेही तसेच
==================================
तुम्हारे लिये
सब दुआगो है
तुम जो न होंगे
तो कुछ भी न होगा
इसी तरह
मर-मरके जीते रहो तुम
ठळक केलेले शब्द 'लगागा लगागा' यात बसत नाहीत. कवी ते शब्द वाचताना पॉझ घेणार.
==================================
ये जिंदगी
आज जो तुम्हारे
बदनकी छोटी - बडी नसोंमे
मचल रही है
तुम्हारे पैरोंसे चल रही है
तुम्हारी आवाजमे गलेसे
निकल रही है
तुम्हारे लफ्जोंमे ढल रही है
यात मचल, चल, निकल व ढल या यमकांआधीच्या ओळींच्या मात्रा समान नाहीत तरीही वृत्त समान आहे. लगालगागा लगालगागा! (उर्दूत 'ये', भी' 'के' अशी काही अक्षरे एक व दोन मात्रांमध्ये दोन्हीत गणली जातात)
=================================
बजी घण्टियाँ
ऊंचे मीनार गुंजे
सुनहरी सदाओंने
उजली हवाओंकी पेशानियोंपर
रहमत के
बरकत के
पैगाम लिख्खे
वृत्त - लगागा लगागा! आता याच ओळी सरळ लिहिल्या तर गद्य का होणार नाहीत याचे कारण असे की कवीने जाणीवपुर्वक लय पाळलेली आहे. गद्याला तो नियमच नाही.
=================================
अशी अनेक उदाहरणे या एकाच पुस्तकात आहेत.
धन्यवाद!
बेफी उत्तम माहिती... अजुन
बेफी उत्तम माहिती... अजुन सविस्तर येऊ दे..
भूषणराव.., बरीच माहीती
भूषणराव.., बरीच माहीती मिळाली...आणखी काही उदाहरणे आली तर बेस..
बेफि दंडवत
बेफि
दंडवत
मुक्त कविता म्हणजे काय
मुक्त कविता म्हणजे काय ?
व्याख्या नाही माहीत. पण यमक, छंद अशा नियमांमधून मुक्त झालेल्या कवितेला मुक्त कविता म्हणून ओळखले जाते. या फॉर्मचा वापर प्रभावी मांडणीसाठी केला जातो. मुक्तछंदापेक्षा ही वेगळी आहे. मुक्तछंदाचे गीत होऊ शकते मुक्त कवितेचे होईलच असं नाही. हॉ स्टेजवर वाचण्यासाठी बेस्ट !
मै और मेरी तनहाई
अक्सर बाते करते है
वाचतोय बेफिकीर यांनी खूप
वाचतोय
बेफिकीर यांनी खूप चांगली माहीती दिली आहे.
बेफिजी छान माहीती देत आहात.
बेफिजी
छान माहीती देत आहात. आणखी वाचायला आवडेल
माझं चुकत नसेल तर मुक्त कविता
माझं चुकत नसेल तर मुक्त कविता हे नामकरण पाडगावकरांनी केलय... चर्चा छान चालू आहे.
छन्दोशास्त्र हे
छन्दोशास्त्र हे रविकिरणमंडळाचे माधव जूलिअन लिखित ९वे पुस्तक... २६-०६-१९१९ रोजी आर्यसंस्कृत मुद्रणालय,पुणे येथे वासुदेव गोपाळ परांजपे यांनी प्रसिध्द केले होते. यातील प्रकरण २ते७ मधे कवीने यमक विचार, गण विचार्,अक्षर विचार्,वृत्त विचार ,छन्द विचार, छन्दशास्त्र जाति विचार्,विस्तार आदि व्र चर्चा केली आहे.मी हे वाचुन पुष्कळ वर्षे झालीत...हे पुस्तक कोणास मिळाले तर शास्त्र शुध्द समाधान मिळेल. मी हे पुस्तक ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या लायब्ररीत वाचले होते....चौकशी करते... ( वरील संदर्भ तुम्हाला पुस्तक शोधणे सोपे जावे म्हणुन दिला आहे.) रविकिरण मंडळावर आरती दि.अंकासाठी लेख लिहिला होता. त्या निमित्त हे टिपण काढले होते.
ते पुस्तक ''छंदोरचना'' आहे.
ते पुस्तक ''छंदोरचना'' आहे. माझ्याकडे त्याची प्रत आहे.
पद्मगंधा प्रकाशनाने काव्यबंध
पद्मगंधा प्रकाशनाने काव्यबंध या नावाने दोन वेगवेगळी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. डॉ मिरदेव गायकवाड यांचे छोटेखानी पुस्तक अर्थातच नवोदितांना एकंदर काव्यशास्त्राची ओळख करून द्यायला उपयुक्त आहे. याच पुस्तकात उफणिका, मुक्तछंद आदि प्रकारांचा छान आढावा घेतला गेला आहे. ऑर्कूटवर काव्यशास्त्रासंबंधी स्वामी निश्चलानंद यांनी खूप चांगले विश्लेषण केलेले आहे. ते मायबोलीवर देखील असल्याचे समजते. संस्कृत, मराठी आणि इंग्रजी काव्यशास्त्राचा त्यांचा व्यासंग थक्क करणारा आहे. त्यांनी इथे उपस्थिती लावावी यासाठी नक्की प्रयत्न करता येतील.