Submitted by SHANKAR_DEO on 14 July, 2011 - 02:35
दादा बाबा आबा l तुम्ही का थंडोबा l
हा खेळ खंडोबा l कुठवरी ll
बांधली आघाडी l तरी टोळधाडी l
कातडी हो जाडी l सत्तेमुळे ll
सत्तेमध्ये खोट l म्हणून हे स्फोट l
अंगावरी कोट l मळेचिना ll
खाकी वर्दी मिळे l लाख लाख गिळे l
रक्त भळभळे l निष्पापांचे ll
खुली मुंबापुरी l वडा पाणीपुरी l
कांदापोहे वरी l खाऊ घाला ll
तुरुंगी कसाब l चापतो कबाब l
किरकोळ बाब l बॉम्बस्फोट ll
दादा आवरेना l आबा सावरेना l
बाबा बावरेना l कशानेही ll
कसे जगायाचे l कसे तगायाचे l
आता बघायाचे l कुणाकडे ll
तुम्ही केली पूजा l परी भाव दुजा l
आमचीही सजा l संपे कधी ll
नासली ही गंगा l तुझी पांडुरंगा l
शब्दांचा ही दंगा l व्यर्थ आहे ll
गुलमोहर:
शेअर करा
योग्य लिहिलय.
योग्य लिहिलय.
लिहीलंय छान
लिहीलंय छान

मस्त लिहले
मस्त लिहले
वा व्वा !
वा व्वा !
मनात कोलाहल झाला वाचून
मनात कोलाहल झाला वाचून
भेदक..!
भेदक..!
झणझणीत, पण ते निलाजरे आहे,
झणझणीत, पण ते निलाजरे आहे, डोळे कधी उघडतील देव जाणे, देवा अभंगाला पाव रे.
बॉम्बस्फोटाचे अभंग पुन्हा
बॉम्बस्फोटाचे अभंग पुन्हा लिहिण्याची वेळ न येवो हीच पांडुरंगाचे चरणी प्रार्थना.
बॉम्बस्फोटाचे अभंग पुन्हा
बॉम्बस्फोटाचे अभंग पुन्हा लिहिण्याची वेळ न येवो हीच पांडुरंगाचे चरणी प्रार्थना. >>>> खरे आहे. पण शक्यता कमीच.
धन्यवाद सर्वांना...!
धन्यवाद सर्वांना...!
मनातली तळमळ योग्य लिहिलिय.
मनातली तळमळ योग्य लिहिलिय.
जबरदस्त,मार्मिक विश्लेषन !
जबरदस्त,मार्मिक विश्लेषन !

धन्यवाद..!
धन्यवाद..!
अभंग.....दुभंगलेल्या
अभंग.....दुभंगलेल्या परिस्थितीला...सावररे पांडुरंगा रचना आवडली
यथयोग्य एकदम..
यथयोग्य एकदम..
याच विषयावरचा हा एक लेख
याच विषयावरचा हा एक लेख ...
http://www.maayboli.com/node/27322
छान दबंग आहे अभंग!
छान दबंग आहे अभंग!
>>नासली ही गंगा l तुझी
>>नासली ही गंगा l तुझी पांडुरंगा l
शब्दांचा ही दंगा l व्यर्थ आहे ll
खरे आहे..