काचकर्तन?

Submitted by गजानन on 13 July, 2011 - 04:32

माझ्याकडे जुन्या संगणक-पडद्यावर आपल्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून अडकवली जायची ती काळ्या रंगाची पारदर्शक काच आहे. मला त्याचे शोभायंत्र बनवायचे आहे. पण त्या काचेचे तुकडे कसे करायचे (सरळ रेषेत, ठराविक रुंदीचे :फिदी:) हे माहीत नाही. काच कापायचा करवत मिळतो का? कुठे? किंमत?

दादरला माझ्या कॉलेजच्या वाटेवर बरीच हार्डवेअरची दुकाने आहेत. तिथे अनेकदा मोठमोठ्या काचा कापल्या जाताना बघितल्या आहेत. वेळ काढून तिकडे जाऊन ते कापून देतील का विचारावे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्डवेअरवाले देतात काच कापून हवी त्या मापात. शोभिवंत आरसे, काचेची पार्टिशन्स मिळण्याच्या दुकानातही कापून मिळेल. कडा गुळगुळीतही करुन देतात. एचिंगही करुन देतात.

एखाद्या ग्लास सेंटर मधे हव्या त्या आकारात काच कापून मिळेल. ग्लास कटर बहुतेक एखाद्या मोठ्या हार्डवेअर दुकानात मधे मिळते. Happy पण त्याने काच कापणे तितके सोपे नाहीये. बर्‍याचदा काचेचे तुकडेच हाती लागतात. कटर ने काच कापताना एका विशिष्ट दाबाने कटरवर जोर द्यायचा असतो. तो फसला कि फसलच सगळं.

गजानन, तुझ्याकडे जी काच आहे ती पातळ असेल. अशी काच कापताना तुटु शकते आणि कापणारे त्याची गॅरंटी देत नाहीत.

फार पूर्वी रेल्वेच्या पुलावर काही बायका गारगोटीसारखे दिसणारे दगड घेऊन बसत. त्या दगडांनी त्या काचा कापुन दाखवत असत. हल्ली मात्र पाहण्यात नाहीत.

पातळ म्हनजे किती एमएम पर्यंत असेल ती काच. २-३ एमएम च्या काचा कापून घेतल्यात बरेचदा. त्यापेक्षा कमी जाडीच्या काचांचा अनुभव नाही.

कुठुनही कापुन आणाहो का. पण ते शोभायंत्र तयार झाले की कृतीसह इथे पोस्टा म्हणजे आमच्याकडच्या काचेचाही उपयोग होइल Proud

गजानन, काच कापायला जे कटर वापरतात त्यात टोकाला एक हिरा बसवलेला असतो... आणि कापायचे टेक्निक दिसते तितके सरळ नाही...
तेव्हा कुठल्याही दुकानात जिथे काच विकत मिळते तिथे तुला काच कापून मिळेल पाहिजे त्या आकारात..

शोभायंत्र (Kaleidoscope) बनवायला आरसे लागतील ना रे? नुसत्या काचेने आवर्ति प्रतिमा कशा मिळतील?

सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

काचवाल्याला विचारून बघतो. काच साधारण दोन मिलीमिटर जाडीची असावी.

माधव, साध्या म्हणजे पूर्णतः पारदर्शक काचेनेही चांगले शोभायंत्र होते. शोभायंत्रातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपली नजर काचेला जवळजवळ समांतर असते. त्यामुळे काचेपलीकडील दृश्य न दिसता काचेसमोरच्या पदार्थाच्या परावर्तीत प्रतिमा दिसतात. आणि माझ्याकडची काच काळी आहे त्यामुळे प्रतिमा आणखी स्पष्ट दिसतील.

लहाणपणी मी आणि मित्राने असे शोभायंत्र बनवले होते. तेव्हा अगरबत्तीच्या पुड्याचे जाड कागदी पुठ्ठ्याचे नळकांडे वापरले होते. हल्ली तसली नळकांडी दिसत नाहीत. ड्रॉईंग शीट ठेवायचे प्लास्टीकचे नळकांडे कापून वापरावे असे वाटतेय, पण ते (व्यासाने) खूप मोठे होईल असे वाटतेय.

टिश्यू पेपरच्या रोलच्या आत एक नळकांडे असते ते परफेक्ट आकाराचे असते.
गुगलबाबाने ही एक लिंक दिली. थोडी वेगळी रचना आहे पण मस्त आहे. खूपच विषयांतर झाले माझे. Happy

कमी व्यासाचे जाड पुठ्ठ्याचे नळकांडे हवे असेल तर किचन पेपर रोल / किचन फॉइल रोल / क्लिंग फिल्म रोल इ च्या आत असतं ते नळकांड चालू शकेल ना. माझ्याकडे फॉइलच्या आतली २-४ नळकांडी काहीतरी करु अश्या विचाराने ठेवलेली आहेत.

गजाभौ, येरीया कुठला तुमचा ? काचवाल्याकडे / अ‍ॅक्वेरीयम बनवणार्‍याकडे किंवा आमच्याकडे काच कापून मिळेल.

>हल्ली तसली नळकांडी दिसत नाहीत. >> असतात. एकदा सीसीडीमध्ये जाऊन तिथली बिस्किटे विकायला ज्या नळकाड्यांत ठेवतात, तसे एखादे बिस्किटांसकट घेऊन ये. चांगली मजबूत असतात. मस्तच वापरता येतील.

@जॉनी वॉकर
या ग्लास कटरला मराठी मध्ये 'हिरकणी' असं म्हणतात.
(माहिती साठी व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर)