लोणचं

Submitted by भुंगा on 8 July, 2011 - 08:32

गप्पागोष्टीवर सहज गप्पा मारताना एक कल्पना सुचली आणि त्यावर "बागेश्री"च्या शैलीमध्ये कविता कशी होईल त्याचा एक केलेला छोटासा प्रयत्न.
*******************************************

फडताळातल्या जुन्या लोणच्याच्या बरणीने
सहज परवा लक्ष्य वेधून घेतलं....
कोण कुठल्या आंब्याच्या त्या फोडी,
पण कश्या अगदी एकमेकांत मुरून गेल्यात ना.....

मला पण नेहमी असं वाटतं की,
तू आणि मी .....
अगदी असंच मुरलेलं आयुष्य जगावं...
एकमेकांपासून वेगळं करणं, जमूच नये कोणाला

पण हे असं फक्त मलाच वाटतेय....
की तुलाही ??

मी अपेक्षा करतेय तुझ्याकडून
आंबटगोड मुरलेल्या आंब्याच्या फोडीची
आणि तू......

तू मात्र, तेलाच्या तवंगासारखा...... !!!!!

मी अपेक्षा करतेय तुझ्याकडून
आंबटगोड मुरलेल्या आंब्याच्या फोडीची
आणि तू......
तू मात्र, तेलाच्या तवंगासारखा...... !!!!! >>>>

व्वा भुंग्या ..... झणझणीत लोणचं .....

तू मात्र, तेलाच्या तवंगासारखा...... !!!!! इति.. श्रीमती भुंगा. Happy
भुंग्या, मस्त मुरलीय... लोणच्यासारखी !

Pages