फरक

Submitted by सुमेधा आदवडे on 7 July, 2011 - 06:51

लग्न झालं आणी मागच्या दीड-दोन वर्षात थांबलेला माझा मुंबई लोकलचा प्रवास पुन्हा सुरू झाला. रोज सकाळी ८.३० पकडण्यासाठी आणि संध्याकाळी ६.१४ पकडण्यासाठी धावपळ माझी सखी बनली..हो सखीच! कारण तिच्यामुळे घरात,ऑफिसमध्ये करायच्या कामांत,जबाबदारीत गती आली. गती शिवाय आयुष्याला अर्थ नाही..मग तिच्याबद्दल तुम्ही कितीही तक्रारी करा! काही ती वाढवायच्या मागे.तर काही कमी होत नाही म्हणुन वैतागणारे..तर काही त्यासाठी अगदी कुतरओढ करताना दिसणारे..स्वत:ची आणि कधी नाईलाजाने तर कधी जाणुनबुजून आपल्या जवळच्या माणसांचीही..

गेल्या आठवड्यात असंच एक कुटूंब ट्रेन मध्ये पाहिलं. मुंबई लोकल मधल्या रोजच्या..काहींना अगदी सरावाच्या तर काहींना अगदी अचंबीत करणाऱ्या, पण कसंही दोन क्षण लक्ष वेधुन घेणाऱ्या, प्रसंगानुरुप कधी योग्यतो वेळ आणि सर्वतोमान्य मदत मिळवणाऱ्या अनेक कोटी प्रसंगांपैकी एक प्रसंग..

एक बाई तिचं तान्हं बाळ आणि आणखी एका फार तर ३-४ वर्षांच्या मुलीसोबत लेडीज डब्यात चढली. माझ्यासमोरच्या बाकड्यावर सेकंडसीटला बसली. ती मुलगी मागे कुठेतरी बसली होती. त्या मुलीकडे कसलीशी पिशवी होती. ही तिच्याकडुन त्यातलं काहीतरी मागत होती..
"ए शबाना..दे ना रे जल्दी..भूक लगी है मेरेको!"
त्या मुलीला ती मागत असलेली वस्तु सापडली नाही बहुदा..आईने "ला वो थैली इधर ला" म्हत्टल्यावर पोरीनं तिच्याजवळ ती पिशवी आणुन दिली आणि पुन्हा मागे जाऊन बसली.
बाईने "किधर है रे? खा गयी क्या तू?" करत पिशवी चाचपडली आणि फेकली..माझ्या बाकड्यावरच्या चौथ्या सीटच्या बाईला लागुन पिशवी मध्ये पडली..
"ले तेरे XXX में डाल!" एव्हाना आजुबाजुच्या बायकांचं तिने लक्ष वेधुन घेतलं होतं..मग शांत झाली.
पुढच्या स्टेशनला मागच्या काही सीट्स रिकाम्या झाल्या तशी ही मागे गेली आणि एका हाताने बाळाला सांभाळत दुसऱ्याने मुलीचे केस ओढुन तिला जोरजोरात थपडा मारु लागली.."मजाक समझती है तू? हं?.." ती पोरगी आक्रोश करत डब्याच्या पुढच्या भागात पळाली..सगळ्या बघु लागल्या. पण ती मघासची शबाना नव्हती. ही थोडी मोठी,५-६ वर्षांची मुलगी होती. पळत जाऊन पुढच्या भागातल्या एका सीट वर बसली आणि रडु लागली. तिथे शबाना आणि ही पोरगी आणि त्या दोघींपेक्षा थोडी मोठी,१०-१२ वर्षांची एक मुलगी बसली होती. तिघी मुली एकदम गोऱ्या गोमट्या...गोंडस! मार खाणारी तर रडुन लालेलाल झालेली. पण काही क्षणातच त्यांचं हसणं आणि मस्ती सुरू झाली. मी बघतच राहिले.

माझ्या शेजारची बाई मला आणि समोर बसलेल्या आजींना बोलली.." थैली में कुछ खाना था वो उसने खा लिया..इसलिये मार रही है..हमारे बच्चे तो खाते नहीं तो उनके पीछे भागना पडता है..क्यू मारना बच्चोंको? उनको खिलाने के लिये ही हम कमाते है ना?"समोरच्या आजी पण तिला दुजोरा देऊन तिच्याशी बोलु लागल्या. इतक्यात शबाना माझ्या शेजारी येऊन बसली..आजी तिला विचारु लागल्या.." मा है तेरी?" तिने होकारार्थी मान हलवली. " हररोज मारती है?" ती हसुन निघुन गेली.

पुढच्या स्टेशनला बाईंची गोतावळ उतरली. तीन मुली,एक मुलगा आणि हातात एक तान्हं बाळ असं तिचं स्वरूप होतं.
ह्यात काय? हे तर नेहमीचंच आहे ट्रेन मधलं! खरंच!
प्रसंग नेहमीचाच..प्रश्न ही नेहमीचेच..त्यांची उत्तरं मात्र आपल्या कोणाकडेच नाही.
फक्त पिश्वीतला खाऊ खाल्ला म्हणुन सख्ख्या मुलीला बेदम मारणारी आई..
पोसण्याची ऐपत नाही हे दिसुनही पदरी पाच-पाच पोरं
ह्याला आयुष्य म्हणावं की अंधार? आपल्यापैकी..आपल्या अगदी जवळच्याही लोकांना आज आपण संततीसुखासाठी तीळ तीळ तुटताना बघतो...दुनीयेतलं सगळं ऐश्वर्य असुनही अख्खं आयुष्य घालवुनही त्या माणसांना ते सुख मिळत नाही..आणि इथे ज्यांना मुलांच्या पोटात दोन वेळचं अन्नही घालायची क्षमता नाही अशांच्या पदरी पाच-पाच मुलं!
त्यांनी एकदा कधी जास्त खाल्लं तर मार देणारी आई आणि ’खा ग..खा रे" म्हणुन आपल्या लहानपणी आपल्या मागे लागलेली आपली आई..दोघी आईच! ’अनंतकाळच्या माता’...मग ह्या फरकाचं काय?
हे दैव की मस्करी? ’दात आहेत तिथे चणे नाहीत आणी चणे आहे त्तिथे दात नाहीत’ ह्या उक्तीचं परिपुर्ण भरणपोषण परमेश्वराशिवाय कोण करु शकतं? त्याचे खेळ निराळे असतात म्हणतात..

गुलमोहर: 

सुमेधा, निरीक्षणही छान आणि ललितही छान. परीस्थितीचं मात्र विचारू नकोस? हे बदलणं कितपत शक्य आहे तुच सांग. आहे त्यात आपण समाधानी आहोत म्हणून आपल्याला असं चित्र पाहून अस्वस्थ वाटते. परिस्थितीचा हा खेळ असाच चालु राहणार कितीही मनाच्या विरुध्द असला तरीही.

काय करणार?

सुमेधा, खरे तर इतके विखारी इथे मी लिहायला नको, पण "त्यांच्यात" आपली लोकसंख्या वाढवायचे छुपे संदेश दिले जातात, असे मला एकाने सांगितले. (या माझ्या वाक्यावरुन इथे वेगळी चर्चा सुरु होऊ नये, अशी मनापासून आशा करतो.)

लोक्स...नादखुळा म्हणतो तशी ही परिस्थिती आपण आहे तशीच बघु शकतो हेच सत्य आहे...पण तिचा विचार केल्याशिवाय रहावत नाही हेही खरंच..
दिनेशदा...हे संदेश त्या लोकांना दिले जात असतीलही..पण पायाला गँगरीन झाल्यावर बँड-एड कितपत उपयोगी ठरेल हाही प्रश्न आहेच..असो.