मुळा आणि गाजरे

Submitted by sneha1 on 17 July, 2008 - 15:42

दिनेशदा,तुम्ही मिनरल वोटर च्या बाटलीत मुळा कसे लावायचे?आणि तशी गाजरे पण येतात का?अशी कमी जागेत अजुन कोणती भाजी लावता येइल?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy मोठीच यादी दिलीस.

भाटिया नर्सरीची वेब साइट बघितली. शपथ्थ, खजिनाच आहे की. चाफा पण आहे. चाफा आमच्या हेंच्या सायबाला हवा होता बगा. नवर्‍याच्या बॉसने मला promise केलेय, चाफ्याचे रोप मिळवुन दिले तर त्याला बढती Happy

पालकाचे आणि करडईचे बी भारतातुनच आणायचे आहे. आपल्याकडच्या पालकाला जी चव असते ती येथे मिळणार्‍या पालकाला नसते Sad

मृ, लाव बरे केळी, संत्री, आंबे, चिकू, पेरु, सीताफ़ळ, डाळिंब्,नारळ. फळं लागली की सांग. मी येतेच Happy

शोनु, परत एकदा धन्यवाद Happy

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आमच्या गावात मोठा फ्लावर शो होतो.तेंव्हा एक हवाईची कंपनी ( आपली ह ह नाही ती ह (रवली) कुठेतरी ) शेकड्याने चाफ्याची रोपं विकते. बघ येणार आहे का तेंव्हा?

अनंताची झाडं पण होम डेपो मधे गार्डेनिया नावाने मिळतात.

येणार म्हणजे काय येणारच...पुढच्या वर्षी बढती नको का Proud

मृ, लाव बरे केळी, संत्री, आंबे, चिकू, पेरु, सीताफ़ळ, डाळिंब्,नारळ.<<< कप्पाळ!!!! जी आहेत तीच टिकवता टिकवता नाकीनऊ येतात!

शेपूसाठी बाळंतशोपा पेरायच्या.

लाल भोपळा, मिरच्या, टोमॅटो वगैरे बाजारातून घरी आणून, बिया वाळवून लावता येतात.

फ्लोरिडात जनता ऑर्किड्स पण जगवते!! हौशी मंडळी!!!
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

शोनु म्हणतेय ते बरोबर आहे. मेथी जुन झाली की पाने मोठी होत जातात. पण मग तीचा देठ नाही वापरता येत... अगदी कडक होउन जातो तो पाने मोठी होईपर्यन्त.

एक जाड काठि रोवून त्याला हे झाड बांधायचे. नाहीतर लोळण घेते हे झाड.>>> दिनेशदा खरे आहे. मि लावलेले ६ फुटापेक्शा मोठे झालेय.
माझ्याकडे पण पहीली फुले गळुन गेली. पण मग आलेली फुले छान टिकुन राहिली.
Photobucket Photobucket

मला पण ह्या खारींचा खुप त्रास होतो.. त्यामुळे सगळी झाड घरात लावली आहेत.

कडीपता http://www.logees.com/ मध्ये पण मिळतो. ३० दिवसाच्या गॅरंटीसहीत.

माझ्या कडीपत्त्याला कीड लागलेय.

किड लागलेल्या फांद्या तोडुन टाका. साबणाचे अत्यंत सौम्य द्रावण करून ते शिंपडा. झाडाला पुरेसे ऊन लागेल असे बघा. नविन पाने चांगली येतील.

धन्यावाद दिनेश,

फांद्या मी तोडल्या आहेतच. साबणाचा ऊपाय करुन बघेन.

मी कढीपत्ता पुर्ण छाटुन टाकला. ५-६ दिवसातच छाटलेल्या खुंटांना बारिक हिरवे दाणे दिसायला लागले. आणि पाहता पाहता नविन फांद्या आल्या. आता आलेला कढिपत्ता अगदी मस्त काळपट हिरवागार आणि लांबट पानांचा आहे. वासही मस्त आहे.
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

गॉडफादर सिनेमात मार्लन ब्रँडो मरतो, त्या सीनमधे उंच वाढलेली टोमॅटोची झाडे आहेत. माझे लक्ष त्या झाडांकडेच जाते.

ऑर्किड भारतात (मुख्यतः पुण्यात) वाढू शकतो का? असल्यास काही विषेश काळजी घ्यावी लागते का?
जाणकारांकडुन थोडी माहिती हवी आहे.
कारण इथे (UK मध्ये) खुप थंडी असल्याने आम्ही याला सकाळी स्नानग्रुहात (moisture साठी )आणि नंतर दीवान खोलीत ठेवायचो कारण तिथे शक्यतो नॉर्मल तापमान असते. आता याला पुण्यात न्यायचा बेत करतोय.
विमानातुन रोपे कशी नेता येतील हेही सांगा.

भारतात जवळ जवळ सगळ्या भागात ऑर्किड्स उगवतात, वाढतात. सह्याद्रीच्या जंगलात अनेक प्रकार आढळतात. शिवाय सर्व मोठ्या शहरातल्या नर्सरीमधे सुद्धा मिळतात. पण एका देशातून दुसर्‍या देशात झाडे, कंद, बिया, कलमे नेण्यावर चिकार निर्बंध आहेत. तुमच्याकडे जर अगदी खास अन मोठं कलेक्षन असेल तरच या फंदात पडावे. अन्यथा परत जाण्यापूर्वी ही झाडे कोणा आप्त मंडळींना देऊन जाणे सोयीचे. पुण्यात गेलात की तिथे मिळणारी ऑर्किड्स आणा विकत .

काही काही मंडळी बियांची ने- आण करतात विमानातून, पण जर पकडले गेले तर फार कटकट होते.

शोनू अगदी बरोबर. एका ठिकाणची झाडे दुसर्‍या ठिकाणी नेऊ नयेत हेच खरे.
वेगवेगळ्या हवेत वेगवेगळ्या प्रकारची ऑर्किड्स वाढतात. कोकणात याचे अनेक प्रकार दिसतात. तसेच ते सातारा भागातही दिसतात. आपल्याकडे इशान्येकडील राज्यात त्याचे खास प्रकार आहेत.

नमस्कार,

पुण्यात gardening चा certificate /hobby course कुठे conduct होतो हे कोणाला माहित आहे का?

मी थोडीफार माहिती काढली : FC , Modern college मध्ये हा course आधी व्हायचा आता बंद झाला आहे. Sad

College of Agricluture , deccan education society आणि university ह्या तिन्ही ठिकाणी असा कोणताहि course घेत नाहीत. ARI (Agharkar Research Inst) मध्ये आहे पण timings मला (नोकरदार असल्यामुळे ) suit होत नाहीयेत. ह्या व्यतिरिक्त अजून कुठे असेल, any idea?

कोणाला एखादा gardening enthusiast / माळी माहित असेल जो त्याच/तिचं knowledge share करायला तयार असेल किव्वा बागकाम शिकवत असेल तर please सांगा.

स्नेहा,
इंट्रेस्टींग माहिती मिळाली.
तसही भाज्यामध्ये खाण्यासाठी मुळा आणि गाजरे सगळ्यांनाच आवडत असतील !
Happy

Pages