अ‍ॅपोकॅलिप्टो !!!!

Submitted by Unique Poet on 18 June, 2011 - 08:10

apocalypto.jpg

ट्रेलर - http://www.youtube.com/watch?v=6pocldpQ9Mw

वर्ष : 2006

दिग्दर्शक: Mel Gibson

कथाकार / लेखक: Mel Gibson, Farhad Safinia

कलाकार: Gerardo Taracena, Raoul Trujillo and Dalia Hernández

बर्‍याचदा एखादा चित्रपट पाहताना अपेक्षा ठेवून पाहीला तर बहुतांशी वेळा तो फुसका बार ठरण्याची शक्यता जास्त असते.... पण नावाजलेला दिग्दर्शक म्हंटला की.... माझ्या डोक्यात त्या चित्रपटाविषयी अपेक्षांचे डॊंगर उभे राहतात.... असाच हा एक चित्रपट....!

अ‍ॅपोकॅलिप्टो !!!!

मेल गिब्सनचा हा चित्रपट........ माझ्यासाठी एक जबरदस्त अनुभव ठरला....

चित्रपटाची सुरूवात एका रानडुकराच्या शिकारीपासून होते..... जी आदिवासी जमात
ही शिकार करते त्या आदिवासी जमातीवर दुसरी प्रबळ जमात आक्रमण करते.... त्यातील स्त्री- पुरुषांना पकडून घेऊन जाते... त्या पुर्वी जग्वार पॉ ( हिरो ) त्याच्या बायको आणि छोट्या मुलाला एका विहीरी सदृश्य जागेत लपवतो.... ती गर्भवती.... जवळ जवळ ९ महिन्यांची.... त्या दुसर्‍यांपैकी एकाच्या त्यांना तिथे लपवलेले आहे हे लक्षात येते.... तो त्या घळीत सोडलेली दोरी तोडून टाकतो...
त्यांना पकडून नेत असताना... रस्त्यात ... एक लहान मुलगी.... तिच्या आईकडे जाऊ पाहाते.... तिला ते... हातातल्या दंडूक्यांनी ढकलतात..... ती पुन्हा पुन्हा येते... त्यांच्यातील एक जण तिच्या छातीवर.... दंडूक्याने जोरात प्रहार करतो.... तिच्या चेहर्‍यावर काहीही भाव उमटत नाहीत ... पण आपल्याला जाणवत राहते...की तिला जबरदस्त मुका मार लागला आहे....
ती शापवाणी उच्चारते.......
" तो जग्वार बरोबर येईल....एकाला साप चावेल.. जग्वार पॉ तुमचा नाश करेल..." वगैरे वगैरे..

पकडून नेलेल्यांपैकी स्त्रियांची विक्री होते.... पुरुष नरबळी करिता नेतात.... त्यात अगदी सुदैवाने सुर्यग्रहण लागल्यामुळे जग्वार पॉ बळी जाता जाता राहतो.. .. त्याला आणि इतरांना एका मैदानात नेऊन पळून जाण्याची संधी दिली जाते... मागून दुसरी जमात भाले , बाण मारणार.... मैदानाच्या दुसर्‍या टोकाला त्या जमातीच्या सरदाराचा मुलगा टणक हत्यार घेऊन उभा...... बाण ... भाल्यातून अर्धवट जखमी ... वाचलेल्यांना तो मारणार....जग्वार पॉ आणि त्याचा जोडीदार तिरकस पळण्याची युक्ती वापरतात... पण आक्रमक टोळीच्या सरदाराचा एक बाण जग्वार पॉला लागतोच .... जखमी होऊन पडलेल्या जग्वार पॉ ला मारायला तो सरदाराचा मुलगा येतो.... पण त्याने असे सहजा सहजी मारले हिरोला तर मग अर्थ काय राहिला....? लागलेल्या बाणाचे टोक मोडून जग्वार पॉच त्याला मारतो..... आणि कसाबसा... पुढच्या शेतात शिरतो..... मग सुरु होतो थरार....... पाठलागाचा.... जगण्याचा !

ज्या प्रत्येक वेळी त्याच्या जीवावर बेततं ... त्याला त्याची वाट पाहात घळीत अडकलेली पत्नी आणि मुलगा आठवतात.... आणि तो पुन्हा.... वाचण्यासाठी धडपड करत राहतो....

यात काही दृश्ये अक्षरश: अंगावर येतात... काटा आणतात...

१) खराखूरा जग्वार ( काळा चित्ता ) जग्वार पॉच्या जेंव्हा मागे लागतो.... तेंव्हा विरूध्द टोळीचा एक तरूण जग्वार पॉला फक्त पाहून दुसर्‍या वाटेने पळत मध्ये येतो..... चित्ता त्याच्याच अंगावर उडी मारतो.... तरूणाचा चेहरा चित्त्याच्या जबड्यात सापडतो.... तो मारला जातो... त्याच वेळी त्या जमातीचे इतर साथीदार येऊन भाल्यांनी हत्यारांनी त्या चित्त्याला तिथल्या तिथे भोसकून मारतात.... त्या तरूणाचा विद्रूप झालेला चेहरा ... आणि भोसकलेला चित्ता.... काटा येतो अंगावर... ( माझ्यातरी आला )...

२ ) जग्वार पॉ त्यातल्या एकाला... मारतो...... { मला आता नीट आठवत नाही - चित्रपट पाहून जवळ पास वर्ष झाले आहे.... } मला वाटतं ... बहुधा त्याचे नाव " मिडल आय " होते..... ज्याने जग्वार पॉच्या वडिलांना त्याच्या डोळ्यांदेखत मुद्दाम केवळ ते ह्याचे वडील आहेत असे कळाले म्हणून मारले होते तो हा... मिडल आय.......जग्वार पॉला कायम त्रास देत असणारा ....
मिडल आयचा वार चूकवून त्याच्या डोक्यावर जेंव्हा जग्वार पॉ टणक हत्याराने.... वार करतो.... रक्ताच्या धारा.... अक्षरश: स्प्रे ऊडावा तशा उडतात....आणि त्या देखील..... रक्ताचे अभिसरण होते.... नाडीचे ठोके पडतात ना त्या गतीने.. कमीजास्त होत......

३) विरूध्द टोळीचा सरदार... यांच्या जनावरांच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकून मरतो.....तेंव्हा त्याच्या पाठीतून बाहेर आलेल्या अणकुचीदार टोकावर लटकलेले त्याचे मांस....

४) जग्वार पॉची बायको घळीत असते......ती घळ पाऊस सुरु झाल्यावर भरायला लागते....ही मुलाला.. खांद्यावर बसवते..... पाणी वाढतच जातं ... हाईट म्हणजे ती पाण्यात ..... चित्रपटात अक्षरश: प्रसूत होते..... ते नाळ असलेले नवजात बाळ....

खूप सारे प्रसंग आहेत ... हे चारच पुरेसे आहेत इथे कल्पनेसाठी..

या चित्रपटात ती पिरॅमिड सदृश्य सुर्यमंदीरावर सुर्याला नरबळी द्यायची पध्दत.... पिरॅमिड म्हंटले की ( किमान ) मला फक्त इजिप्त माहिती..........
अगोदर मला वाटले.... पुरातन संस्कृती दाखवायची म्हणून घेतली असेल..... मी नुकतेच डॉ. मीना प्रभूंचे " मेक्सिकोपर्व " वाचले.... त्यात ह्या संस्कृतीचे सगळे वर्णन आहे.... माया संस्कृती च्या अगोदरची " आस्तेक संस्कृती "ती ही.... त्यांच्या पध्दती जशाच्या तशा चित्रपटात दाखवल्या आहेत.... - मेक्सिकोत समुद्रमार्गे स्पॅनिश येतात....तेही चित्रपटाच्या अगदी शेवटी येते....
जग्वार पॉ च्या पाठलागावर आलेले आक्रमक जमातीचा सरदार आणि त्याच्या बरोबर असणारे ८/१० जण त्या मुलीच्या शापाप्रमाणे मरत जातात... फक्त दोघे राहतात.....
वाचलेला जग्वार पॉ भर पावसात त्या घळीपाशी येतो.... तेंव्हा त्याला दिसते..... मुलाला खांद्यावर बसवलेली ..... नवजात शिशूला हातांनी पाण्यावर धरलेली.... जिचा चेहरा फक्त श्वास घेण्यापुरता पाण्यावरती आहे.....अशी त्याची प्राण डोळ्यात आणून वाट पाहात असलेली पत्नी......

शेवटी जग्वार पॉ बाळाला पाठीवरच्या झोळीत बांधून दुसर्‍या मुलाशी थोडासा खेळत हातात भाला घेऊन चाललेला असतो ... त्याच्या मागे त्याची पत्नी येते असते...... त्यांना एका कोपर्‍यातून जंगलाला लागून असलेला समुद्र आणि किनार्‍या वरील जहाजे दिसतात.... ते थांबतात.... त्याची पत्नी त्याला विचारते .." ते काय आहे... आपण तिथे जायचे ?" तो... क्षणभर... शांत उभा राहतो.... मग ... " ते आपल्यासाठी नाही...., आपल्याला जंगलच बरे आहे.. " तो जंगलाची पुन्हा निवड करून चालायला लागतो.... तिथे चित्रपट संपतो.....
आपल्या मनात.... जग्वार पॉची विजीगिषा..... जगण्याची...,लढण्याची जिद्द भरून राहते....!

बर्‍याच दिवसांपासून या चित्रपटावर लिहायचे मनात होते.... वर्षा अंकाच्या निमित्ताने... वेळ काढून लिहून टाकले.....
मी हा चित्रपट बघून जवळजवळ वर्ष झाल्यानंतर हा परिचय लिहीतोय त्यामुळे यातील काही संदर्भ पुसट झाले असण्याची शक्यता आहे......
- समीर पु.नाईक

" ऋतू हिरवा-२०११ " या वर्षाविशेषांकात पुर्वप्रकाशित !

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आताच १५ दिवसापूर्वी पाहिला चित्रपट. अजुनही डोळ्यसमोर उभा आहे. जग्वार पॉचा लहान मुलगा आपल्या आईला धीर देतो तो प्रसंग, त्या विहिरीत पाणी शिरतं तेव्हा त्या मुलाच्या चेहर्‍यावरील भाव... सगळंच सुंदर!!

एक चांगला चित्रपट बघितल्याचं समाधान मिळालं. Happy

मला सुद्धा खूप आवडतो हा सिनेमा. जबरदस्त पाठलाग तर आहेच शिवाय त्या कलाकारांचे अत्यंत नैसर्गिक अभिनय, गर्द जंगलातला वावर, त्यांना पकडून नेतानाचा तो करुण प्रवास, अद्भूत निळा रंग, चमत्कारिक वेषभुषा हे सगळच आवडलं. मला या सगळ्या अ‍ॅझटेक, माया वगैरे संस्कृतींचं गूढ आकर्षण कायम वाटत आलय आणि खरं तर हेच मुख्य कारण सिनेमा आवडण्याचं.

Mel Gibson दिग्दर्शित Apocalypto हा चित्रपट अप्रतिमच आहे. हा चित्रपट Maya भाषेत subtitle मधे असुनही अतिशय उत्कंटावर्धक वाटतो. या चित्रपटातील जग्वार पॉची बायको जेव्हा त्या पाण्याच्या घळीत एका बाजुला आपल्या लहानग्या मुलाला साचत जाणारया पाण्यापासुन उंचावर नेण्यासाठी करत असलेले प्रयत्न आणि दुसरया बाजुला प्रसुतीच्या सहन करत असलेल्या वेदना त्यातच प्रसूत होणे आणि पाण्यातच जन्मणारे नाळ असलेले नवजात बाळ. तो scene अक्षरशः अप्रतिम दिग्दर्शनाचा कळसच आहे.

पुन्हा पुन्हा पहावासा वाट्णारा चित्रपट. गोर फॅक्टर खरंतर थोडा जास्तच आहे तरि सुद्धा टिव्हिवर लागला कि पाह्तेच. खिळवुन ठेवणारा अनुभव.

तसेच यात कैद्याना दोरिने बांधुन नेत असतात ,तेव्हा एक व्रुद्ध कैदी अन्गावर झाड पडल्याने मरतो...तोही प्रसन्ग मनातुन जात नाही.

मला सुद्धा खुप आवडतो हा चित्रपट !
अवघ्या ५-६ वर्षाचा त्याचा मुलगा, त्याच्या पायावरची जखम शिवण्यासाठी त्याची आई जी युक्ती वापरते ती अंगावर काटा आणणारी आणि त्या लेकराची सहनशक्ती सलाम ठोकावा वाटायला लावणारी...!
त्याच्या पायाची फाटलेली कातडी शिवण्यासाठी त्याची आई जमीनीवरचे एक विशिष्ठ प्रकारचे लाल मुंगळे उचलुन जखमेवर चिकटवते. तो मुंगळे लगेच आपले पाय (नखे) त्याच्या जखमेच्या दोन्ही बाजुच्या कातडीत रोवतात आणि त्या मुलाचे रक्त पितात आणि तिथेच मरुन चिकटून बसतात. पण त्याच्या पाय रोवण्यामुळे तिथली कातडी मात्र सांधली जाते. ते लेकरु मात्र आईलाच धीर देत शांत बसुन असतं. अंगावर काटा येतो ते बघताना !
जंगलातला जॅग्वारचा विरोधी टोळीतील लोकांनी केलेला पाठलाग आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतो.

मस्त लिहीले आहे,
यातली पाठलागाची दृष्ये अफलातून आहेत आणि एकदम 'रॉ', दडपून टाकणारे जंगल.

मी बघितला नाही. (कदाचित बघवणारही नाही.) या मायन संस्कृतीतील नरबळी प्रथेचे एक चित्र नॅशनल जिओग्राफिक मासिकात बघितलेले होते. तेही नीट बघू शकलो नव्हतो.
जखम शिवण्यासाठी मुंगळ्यांचा उपयोग, मला वाटतं प्राचीन भारतातही होत असे. (मी वाचलेय कुठेतरी.)

जग्वार पॉ पाठलाग करणार्‍या एकाला समोरासमोर भिडून जमिनीवर पडलेलं हत्यार उचलून उलटा फिरुन डोक्यावर मारतो,आणि डोक्यातून रक्ताचे कारंजे फूटते,जे हार्ट बीट नुसार कमी जास्त होतं हा प्रसंग सुद्धा अंगावर काटा आणतो.

आणि हा प्रसंग बर्‍याच दक्षिण भारतीय चित्रपटांत जसाच्या तसा ढापला आहे.

एकूण एक बघणेबल पिक्चर.

प्रतिसादांना उत्तर उशिरा देतोय त्यासाठी क्षमस्व ! सगळ्यांचेच आभार !

भ्रमर ...... खरंच सुंदर आहे चित्रपट.. खूप बारिक बारिक डिटेल्स आहेत ह्यामध्ये ...!

शर्मिला फडके ...... तुम्ही अगदी सुयोग्य शब्द वापरले आहेत...!

बंडुपंत ..... तो प्रसुतीचा प्रसंग जबरदस्त घेतलाय..

गेहना.... हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्यासारखाच आहे... वेगळाच अनुभव आहे तो..

dhanashri...... यातील काही प्रसंग...मनात घर करून राहतात .... जग्वार पॉ च्या वडिलांना मारतात तोही असाच एक प्रसंग !

नादखुळा..... माझ्या लिस्ट मध्ये..... जागा पटकावली आहे... Happy

विशालदा.... यात आपल्याच सहनशक्तीची परिक्षा पाहणारे किती प्रसंग आहेत नाही...? तो प्रसंग भारीच !

आगाऊ ....... Happy पाठलाग आणि जंगल चित्रपटाचे प्लसपॉईंटस आहेत...

बागुलबुवा ..... चित्रपट अतिरंजित वाटतो खरा काही प्रसंगात... पण ...मर्यादे बाहेर जात नाही...!

दिनेशदा.... नरबळीचे प्रसंग अवघडच आहेत..... एकदा पाहायला हरकत नाही... पण त्रास होणार असेल तर नकोच.! Happy मुंग्यांच्या नांग्याचा उपयोग टाक्यासाठी वापर भारतात सुश्रुताने केला होता..... ( एका मित्रा कडून रिमाईंड झाले )

अखी ..... खरच... जबरा सिनेमा..! Happy

शायर हटेला .....अख्ख्या चित्रपटातील काही भारी ... अशा प्रसंगांपैकी तो एक......... मी दक्षिण भारतीय चित्रपट फारसे पाहिलेले नाहीत.... त्यामुळे असा प्रसंग अजून कुठल्यातरी चित्रपटात पाहिल्याचे. अंधूक आठवते.....नक्की चित्रपट कुठला ते नाही आठवत...!

Happy

टिव्हीवर कायम अर्धवटच बघितला जातोय.. पूर्ण बघायचाय... जेव्हढा बघितलाय तेव्हाढा नक्कीच आवडला...

विशालनी लिहेलेला प्रसंग फारच झकास आहे.. तो मुलगाच आईच्या हातात मुंगी पकडून देतो.. एकूणच जेव्हढा बघितलाय त्याचे चित्रीकरण जबरीच...

जबरी चित्रपट!
जीव वाचवण्यासाठी केलेली अतोनात धडपड पाहताना आपण स्वतःला त्याच्याच रोल मधे पाहू लागतो आणि मग आपणच बेभान होउन पळत सुटतोय असं वाटतं!

मस्तच आहे.... तो साप चावतानाचा सिन तर खतरनाक आहे... बरेच सिन असे आहेत कि त्याच चित्रीकरन कसे केले असेल याचेच आश्चर्य वाटते...

काही काही सिन्स अंगावर येतात्....उदा. नरबळीचा...

माझा मुलगा माझ्याबरोबर पहात होता...तो खूप घाबरला....

अ मे झिं ग! असा चित्रपट आहे. वातावरण निर्मिती, वेशभुषा, प्रकाशाचा उपयोग फार सुंदर. काही दृष्ये थोडी क्रूर वाटायचा संभव आहे पण अत्यंत परिणाम करणारी आणि म्हणूनच अत्यावश्यक अशी आहेत.
सर्वानी जरूर पहावा असा चित्रपट.

सुलु + १. मस्त मुवी आहे. नेहमीच कुठल्यातरी चॅनेलवर चालु असतो, पण प्रत्येकवेळा पहायचं टेम्पटेशन होतंच. पाठलाग, जंगल, पुरातन संस्कृती आणि त्यातल्या चित्रविचित्र प्रथा सगळंच थरारक आहे. कास्टींगही जबरी आहे.

अफाट मूव्ही आहे!
मीसुद्धा टीव्हीवरच पाहिला. हा सिनेमा सुरू असतांना आमच्या मातोश्रींनी मधेच दोन-चार सीन बघितले आणि मग मळमळायला लागले म्हणत मला च्यानेल बदलवायला लावला चक्क ! पण मी पुन्हा लागल्यानंतर नेटाने पूर्ण पाहिलाच. नंतर अनेकदा पाहिला.

टीव्हीवर बहुधा काही सिन्स कापले असावेत असे वाटते. (साहजिकच आहे म्हणा !) पण त्याने कंटिन्युटी तुटल्यासारखी होते. आता एकदा ओरिजनल प्रिंट आणून पहायचा आहे.

जखम शिवण्यासाठी मुंगळ्यांचा उपयोग, मला वाटतं प्राचीन भारतातही होत असे. (मी वाचलेय कुठेतरी.)

BBC वर सुश्रुता वर एक डॉकुमेंटरी दाखवली होती त्यात सुश्रूत लाल मूंगळ्यांचा वापर जखम
शिवायला करत असे अस दाखवल होत. तेच ह्या सिनेमात वापरलय.

BBC वरल्या त्या फिल्म मध्ये लाल मूंगळ्याचा वापर करण्याबद्दल सुश्रूताला हीणवले होते.

ह्याच सुश्रुताला आधुनिक जगाच्या प्लास्टिक सर्जरीचा जनक मानल जाते.
ह्याच सुश्रुताने शत्रक्रीयेसाठी १५० विविध शस्त्रांचा (Instruments)चा शोध लावला. हिच १५० शस्रे आजही
वापरली जातात. शरीरांच्या विविध भागातुन नाक, कान कसे घडवावेत याचे विस्त्रुत वर्णन सुश्रूताने
आपल्या ग्रंथात केले आहे.

मग हाच सुश्रुत जखम शिवण्यासाठी लाल मुंगळ्यांचा वापर करेल हे काही मनाला पटत
नाही.

धन्यवाद! इथलं वाचून चित्रपट पाहिला, आवडला..
काही सिन्सना मी डोळे मिटून - नवर्‍याला, सिन झाल्यावर सांग सांगून ठेवलेलं Proud

मला तरी मुंगळ्यांचा वापर करणे ब्रिलियंट कल्पना वाटली.. का बुवा हिणवलं बीबीसीनं?

मला नाही आवडला. खूप रक्तरंजीत वाटला >> + १००० .

माझ्या नवर्याला आवडतो आणि तो बघत असला तर मी जाम चिड्चिड करते नाहितर मग सरळ दूसर्या खोलीत निघुन जाते . मलाही फार मळमळतं काही सिन्स बघून Sad

मस्त आहे. पोराला फार आवडतो हा मुव्ही. मी पण त्याच्याबरोबर बसुन बघितला.
संपुर्ण सिनेमाभर तो जिवघेणा पाठलाग!!
पहिल्यांदा काही काही सिन पहावत नव्हते.... टोकदार सुयांनी/ काट्यांनी टोचलेले बॉडी पार्टस बघुन!
हिरोच्या बायकोचा चेहरा पुष्कळसा भारतीय स्त्रीसारखा दिसतो...कपाळावरील टिकलीमुळे.

त्या मुलीच्या शापवाणीने मात्र खरच जीवाचा थरकाप होतो.
पिवळ्या रंगाच्या बेडकाला अणकुचीदार काटे टोचुन त्याचं विष लावुन ठेवणे इ इ. सर्व कल्पनेपलिकडचे.

तो हिरो धबधब्यावरुन उडी घेतो तो सिन अफाट आवडला. Happy

मलाही हा चित्रपट आवडला...पण खर सांगु एक्दाच पाहण्यासारखा वाटला..दुसर्यावेळी पाह्ताना तेवढी मजा येत नाही...तो थ्रील परत जाणवत नाही ..किंवा तो इतका वेळा रीपिट करतात की बोअर होत मग
आपल्याला बाण लागु नये म्ह्णुन त्याच ८ फिगर मधे पळत जाण्,,,त्यांचे हल्ले चुकवण... भारी घेतल आहे Happy
त्याचा पाठलाग करताना..एक जण जेव्हा त्याच्या मागे त्या धबधब्यात उडी टाक्तो आनि त्याच डोक फुटत दगडावर आपटुन तो सीन पण अफाट आहे Happy
त्याची बायको मात्र भारतीय च वाटते....खुप गोड दिसली आहे ती...बिचारी..खड्ड्यामधे पडलेली अस्ते अनि तिथेच पाण्यामधे बाळाला जन्म पण देते...तो सीन पण फार भयानक वाटला मला.....
त्याला मारणार्या जमातीचे एकुन गेटअप पण खुप आवडला मला..कसले भयानक दिसतात Sad

बाकी जंगल भारी घेतल आहे ....