पाऊसधारा आणि झारा

Submitted by SHANKAR_DEO on 15 June, 2011 - 07:54

दारात उभी ती झेलीत पाऊसधारा
तळण्यास भजी तू हाती घे गं झारा ll

तू येशील म्हणूनी गाऊन झाली गाणी
चिरताना कांदा डोळा आले पाणी
बापाचा तिकडे नक्की चढला असेल पारा
तळण्यास भजी तू हाती घे गं झारा ll१ll

केसांत रुपेरी थेंब पदराने टीपून घेता
ती उभी पाठ करुनी मी बेसन चाळून देता
कढईत ओतले तेल कानात पेटला वारा
तळण्यास भजी तू हाती घे गं झारा ll२ll

बाहेर कडाडे वीज खुळ्या आकाशी
ही धांदल माझी ती गेली ओट्यापाशी
तो गंध भज्याचा घरात भरला सारा
तळण्यास भजी तू हाती घे गं झारा ll३ll

ती भरवीत होती घास सुखाचे मजला
तो बाप तिथेचा दारामधूनी घुसला
संपली कहाणी येथे हातात भज्यांचा गारा
ती येईल केंव्हा इकडे हा वाट पहातो झारा ll४ll

गुलमोहर: