गोलकीपर

Submitted by ankt on 14 July, 2008 - 05:35

मला या व्यक्ति विषयी लिहायची खुप इच्छा होती, आज कधी नव्हे तर आमचे Servers बंद पडले आणि मला लिहायला वेळ मिळाला.
"गोलकीपर" हा शब्द कोणी शोधून काढला माहीत नाही, पण C-DAC मध्ये असतांना आम्ही हा वारंवार वापरण्यास सुरुवात केली. हा तर गोल म्हणजे मुलगी आणि गोलकीपर म्हणजे तिचा "BEST BEST Friend" (मी तो कोण आहे? असा एका मुलीला विचारला तेव्हा मला हे उत्तर मिळाल), खुप गुतांगुतीचा प्रकरण असता बरकाहे.
आता एखादी मुलगी आवडली की पहिल्यादा आपण बघतो की हे प्रकरण कुठे अडकलेला तर नाहीना. ९०% लोक या गोलकीपरला प्रियकर समजण्याची चुक करून बसतात, एका अर्थी ते बरोबर आहे कारण ते गोलकीपरची सर्वप्रथम जवाबदारी आहे.
तर याच्या काही जवाबदार्या
१. हा प्राणी मुली पासुन लोकांना (विशेषकरून तिच्यावर Line मारण्य़ारांना) दुर ठेवतो, सरळ भाषेमध्ये तो गोल होवु देत नाही.
२. तो मुलीचा घरचे लोक सोडून प्राथमिक Contact असतो, मग मोबाईल Recharge करणे, कुठला पुस्तक मिळत नसेल तर ते शोधून आणे अशी त्ततस्म कामे तो हसत हसत पुर्ण करतो.
३. तो तिच्याशी रोज किमान ३० मि. तरी बोलतो, आणि पुढे अजुन संभाषण वाढवायचा असेल तर तो फ़क्त एक वाक्य बोलतो "और क्या?" बस संभाषण अजुन अर्धातास वाढत.
४. त्याला तिच्या आयुष्यामध्ये काय सुरु आहे याची तंतोतंत माहीती असते. जस "माझ्या मामाची मुलगी ( अबक मामे बहीण) उद्या इथे येणार आहे आणि आम्ही सिनेमा पाहयला जायचा विचार करतो आहे" (इथे एक गोष्ट लक्षात घेण्या सारखी आहे की तो हे पण नाही विचारत कोणता मामा? आणि लहान की मोठी बहिण?, कारण त्याच्या डोक्यामध्ये त्या मुलीचा वंशऋक्ष एकदम पक्का बसलेला असतो)
५. ती कुठे जाणार असेल तर तो आठवणीने "Wish you Happy and safe Jouney" चा SMS करतो.
६. तो तिच एक लाडाच नाव पण ठेवतो. (ते नाव इथे लिहीत नाही नाही तर तुम्हाला पण माझ्या सारख्या Fits येतील.)
आता हे गुतांगुतीचा प्रकरण कसा असता त्या बद्दल थोडा संदर्भासहीत स्पष्टिकरण,
माझ्या एका मित्राने Friendship Day ला एक खुप सही sms पाठवला "एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही बन सकते!, Wish you Happy Friendship Day" , काही बाबतीत हे खरपण आहे, लोकाच्या बोलण्याने, टोमणे ऐकून, एक जण विचार करायला लागतो. त्यामुळे अशी अडचण असते की त्या दोघांमध्ये नक्की गंभीर कोण आहे ते? मी अशे पण गोल पाहीले आहेत की ते एकतर गोलकीपरने केले आहेत नाही तर गोलपोस्ट्ने (म्हणजे मुलीने) स्वत: हून करवून घेतला आहे. मी अशा पण घटना पाहील्या आहेत ज्या मध्ये गोलकीपरला स्वत:च्या गोल पोस्टवर गोल करण्याबद्दल त्या जागे वरून काढून टाकण्यात आल.
पण जर तुमची दोघांशी चांगली मैत्री असेल तर, हा माणूस तुम्हास एकदम योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो.

तर असा हा गोलकीपर आमच्या सारख्या Line मारणार्याच्या कुडंली मध्ये राहू-केतु बनलेला असतो. कोणाला जर असा सारखा अनुभव आला असेल तर नक्की share करा. आणि याला कसा हाताळाव हे पण सध्यातरी मला याची नितांत गरज आहे.

गुलमोहर: 

एकदम सही .....
दिल की बात को जबान मिल गई...

का रे आ !! लाडाचं नाव काय ??
naghtyपणा करतो ?? मी नाव लिहु का ? आणि लिन्क देउ का गोल पोस्ट ला ?

यात विनोदी काय आहे??
एक अतिगंभीर प्रश्न!!!
--------------
नंदिनी
--------------

नंदिनी Happy

अन्क्त, सोप्पय....
१. यू कॅन बी अ बेटर गोलकीपर Happy - म्हणजे तो आत्ताचा जे काय करतोय त्यापेक्षा जास्तं आणि जास्तं चांगलं...
२. इस गोलकीपरकी ऐसी की तैसी... त्याची गल्ली शोधून काढा...
३. कीपर नसलेला गोल शोधून काढा आणि मग स्वतः गोलकीपर बनून किल्ला लढवत बसू नका.... (वैसे सब दुनिया 'गोल' है :))
आणि काय हो, मॅचसाठी सिलेक्शन होत होतं तेव्हा कुठे होतात? ऑ?
असेल हिम्मत तर.... गोलकीपर गोलकीपर काय घेऊन बसलात?.... होऊन जाऊंदे..... 'हर हर महादेव'!

हा लेख चुकून विनोदी सदरात घातला असल्यास इथले (माझे तरी) सल्ले मानू नयेत. (आधीच सांगतेय.. मग मागून म्हणाल...)

नंदिनी, बरोबर आहे, प्रश्न गंभीर आहे....तुच सुचव काही तरी
शलाका, चांगला गोलकीपर होण्याची तयारी आहे माझी पण जागा आधीच गेलेली आहे ना, आणि कीपर नसलेला गोल मिळना आज काल खुप दुर्मिळ झाला आहे.
गल्ली वाला option चांगला आहे, पण तो शेवटचा पर्याय आहे.

अरे हो! मॅच साठी सिलेक्शन त्यांच्या college मधेच झाला ना.
सगळी सेटिंग आधीच झाली. Sad

दुनीया मै इतने गोल कीपर है की तुम्हे और कोइ भी मिल जायेगा! बस ये याद रखना एक ही गोल के पिछे जिंदगी भर मत भागना! वैसे तो किसीने कहा है: "you should decide your main goal first & then try to achieve sub- goals. Always remember that according to changing tmes you shoukd update your goals".

और हा ये मैने ही कहा है ! Happy Proud well i ope for 2day its enough

ह्या गोलकीपर मूळे सगळ्यांचेच वांदे होतात, हे गोलकीपर आपणही गोल् करत नाहीत आणि दुसय्रालाही करु देत नाहित. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे बेन्ड इट लाइक बेकहेम आणि करुन टाक गोल बिनधास्त...

गोलकीपर गोलपोस्ट्ला चिकटुन जरी उभा असला तरी गोल करायची संधी त्याला कधीच नसते आणि चुकुन गोल् केलाच तरी फायदा दुसय्राच संघाला होतो, नाही का?

अरे अन्क्त... सोपा उपाय सांगू
गोलपोस्ट १८० अंशात फिरवुन घे.... आणि मग तुला पाहिजे ते कर.... वाटल्यास गोल कर नाहीतर गोलकीपर हो!

मेन्टोस झिंदाबाद!

अरे हा भो आहे.. गोल सोडुन ह्याला गोलकिपरचीच जास्त चिंता.

गोल गोल गोल करुन टाक झोल झोल झोल करुन टाक... घेउन टाक.
हे अवधुतच गोलमाल चित्रपटाल गाण ऐक. प्रोब्लेम सोल्व ना भाई...

एक गंभीर सल्ला. तु स्वतःच बर्‍याच जणाचा गोलकिपर (मित्र) बन. मग त्यातली एक निवड. अनजानी आफतसे जानी पहचानी मुसीबत हमेशा अच्छी होती है |