आम्हाला मायबोलीवर स्थानापन्न होऊन आता काही वर्षे झाली. या कालावधीत आम्ही आमच्या दे धडक बेधडक पद्धतीने इथे सर्वत्र संचार केला आहे (याला काही लोक जिथे तिथे नाक खुपसणे असेही म्हणतात त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो). फ़िरताफ़िरता आमच्या असे लक्षात आले की माबोवर उपलब्ध असलेली मदतपुस्तिका अत्यंत उपयोगी असली तरी बदलत्या काळाला सामोरे जाण्यात तिला काही अंगभूत मर्यादा आहेत (काय वाक्य जम्या हय! चिनूक्स जमतय ना रे?). ही अडचण सोडवण्यासाठी आम्ही ही नवी मदतपुस्तिका प्रकाशित करीत आहोत. माबोवरील अनेक गोष्टींप्रमाणे ही पुस्तिकाही डायनॅमिक आहे, वाचकांनी त्यात भर टाकत रहावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
१] अनुल्लेख कसा करावा?
(हा काय प्रश्न आहे? यात काय अवघड आहे? अशा प्रतिक्रिया लगेच मनात आल्या असतीलच, त्या टाकू नका, अनुल्लेख होईल!!!)
तर अनुल्लेख हे एक नाजूक आणि घातक अस्त्र आहे त्यामुळे ते कसे हाताळावे हे नव्या मेंबरास कळणे आवश्यक आहे. अनुल्लेखाचा सरळ अर्थ हा की एखाद्या आयडीच्या प्रतिक्रियेला उत्तर न देणे. पण कुठलीही गोष्ट साधीसरळ राहील तर ती मायबोली कसली. अनुल्लेख कुठे केला गेला आहे त्यावरुन त्याचे उपप्रकार पडतात -
१. वाहत्या बाफ़वरील अनुल्लेख. उदाहरणार्थ खालील संवाद वाचा. (याला काहीजण ’बायकात बाबु बडबडला’ म्हणतील त्याला इलाज नाही)
योडी | 8 June, 2011 - 11:08
श्या, काय फालतुगिरी चाललीय माझी आज.सकाळी पाणी सांडलं, आता लायनर लावलेला डोळा खसाखसा चोळला.
अश्विनी के | 8 June, 2011 - 11:10
आता लायनर लावलेला डोळा खसाखसा चोळला.
>>> मी पण कधी चुकून माकून लायनर लावलं तर विसरुन डोळा चोळते. कधी कधी एका डोळ्याचं इंटॅक्ट असतं आणि एका डोळ्याचं गायब.
बागुलबुवा | 8 June, 2011 - 11:10
हाय लोक्स, नमस्कार!!! 
नीधप | 8 June, 2011 - 11:11
योडे आता सगळं तोंडच खसाखसा चोळ म्हणजे तोंड काळे करणे चा अर्थ कळेल. मग धुवून टाक.अजून लिक्विड लायनर वापरतेस? बये पेन्सिल वापर जास्त चांगलं दिसतं आणि सोप्पंही. चांगली पेन्सिलसुद्धा ७०-१०० पर्यंत येईल.
बागुलबुवा | 8 June, 2011 - 11:11
हाय लोक्स, नमस्कार!!! 
योडी | 8 June, 2011 - 11:14
बये पेन्सिल वापर>>ओरिफ्लेमचं पेन्सिलचचं आहे गं. माझ्या लक्षातच रहात नाही लायनर लावलेलं असलं की.
बागुलबुवा | 8 June, 2011 - 11:14
हाय लोक्स, नमस्कार!!! 
अश्विनी के | 8 June, 2011 - 11:16
नीरजा, मी ते पेन्सिल/स्केचपेनसारखं दिसणारं लिक्विड लायनर आणलंय. सुरेख उमटतं त्याने. ते तर दिडशेच्या आसपास आहे तरी पण चोळलं की जातंच.
बागुलबुवा | 8 June, 2011 - 11:16
हाय लोक्स, नमस्कार!!! 
लाजो | 8 June, 2011 - 11:16
लायनर लावलं तर माझे डोळे अजुनच बारीक दिसतात अरेरे काश असच काहितरी अम्गावर लावता आलं असत. तर??? निदान मी बारीक तरी दिसले असते
बागुलबुवा | 8 June, 2011 - 11:18
हाय लोक्स, नमस्कार!!! 
नीधप | 8 June, 2011 - 11:18
पेन्सिलीने स्केचपेनसारखं नाही लावायचं. शेड द्यायची आणि मर्ज करायचं. इफेक्ट येतो आणि दिसत नाही. आता डेली वेअर मेकपचे क्लासेस पण घेते मी.
बागुलबुवा | 8 June, 2011 - 11:18
हाय लोक्स, नमस्कार!!! 
आता एवढे नमस्कार देवाला घातले असते तर तो ही पावला असता! थोडक्यात काय तर पूर्णपणे फ़ोकस्ड राहून इतर कोणत्याही अडथळ्यांकडे ल़क्ष न देता आपण आपल्या गप्पा रेटत न्यायच्या (इथे ’गप्पा’ हा शब्द जनरल अर्थाने घ्यावा, ’स्पेसिफ़िक’ गप्पांशी याचा संबंध नाही!). नवे लोक या एकाग्रतेचे कौतूक करायचे सोडून उगीच अशाने मायबोलीवर ’कडवटपणा’ कसा वाढतो वगैरे आरोप करतात.
२. चर्चेच्या बाफ़वरील अनुल्लेख.
इथे अनुल्लेखाची प्रोसेस समजाउन घेणे आवश्यक आहे . लिहिलेला मुद्दा बिनतोड असणे, त्यावर पटकन प्रत्युत्तर न सुचणे, त्यामुळे राग येणे आणि अनुल्लेखाच्या मदतीने तो कॉमेंट दुर्लक्षीत ठेवणे अशी साधारण प्रक्रिया दिसते. काही आयडींना मुद्दा सुचला नाही तरी प्रतिक्रिया टाकल्याशिवाय बरे वाटत नाही. तुम्ही त्यापैकी असाल तर त्यासाठी खदाखदा हसणार्या स्माईली टाकणे हा अनुल्लेखाचा एक नामी प्रकार आहे. दुसर्या व्यक्तीला आपली प्रतिक्रिया आवडली म्हणून हसताहेत की उपहासाने ते कळत नाही.
प्रतिसाद देउनही अनुल्लेख साधण्याची अजून एक शक्कल म्हणजे ’सर्व प्रतिसादकांचे आभार’ हे वाक्य. याचा अजून एक फ़ायदा हा की पाघळायला सोपे (खरं तर उत्सुक!) लोक या प्रतिसादाचा अर्थ तुम्ही टीका/कौतुक समभावाने पाहणारे संत आहात असा घेतात आणि तुमचा कल्ट वाढतो. (हा समज साधारण दोन महिने टिकतो, पण त्याची फ़िकीर नसावी)
थोडक्यात काय तर अनुल्लेखदेखील उल्लेखनीय व्हावा अशी काळजी घेणे आवश्यक आहे.
२] कसले नविन बाफ़ सुरु करावेत?
सर्वप्रथम महत्वाचा सल्ला, माबोवर स्वत:ला एस्टाब्लिश करायची घाई असेल तरच नवीन बाफ़च्या नादी लागा. कारण नवा बाफ़ आणि कॉलेजात नवी पोरगी यात फ़ारसा फ़रक नाही, दोन्हीचा भाव आठवडाभरात उतरतो. आता तुम्ही स्वत:च्या बाफ़ला जगतसुंदरी समजत असाल तरी लोकांना त्याचे काय? तसं झालं की लोकांना फ़र्स्ट्रेशन येतं आणि चिडचिड माबोवर करतात.
लाँगलास्टींग बाफ़ हवे असतील तर तुम्हाला सकाळी उठल्यापासून पडलेला पहिला प्रश्न आठवा आणि बनवा त्याचा बाफ़ उदा. ’तुमच्या बाथरुममधल्या लकबी काय आहेत?’ किंवा ’तुम्ही गाडी कशी पार्क करता?’ किंवा ’तुम्ही मोजे कसे घालता?’ किंवा ’तुमची आवडती शिवी कोणती?’ किंवा...............मला वाटतं तुम्हाला मुद्दा कळला असेल!
दुसरा प्रकार म्हणाजे राजकीय/सामाजिक घटनेवरचे बाफ़. हे तत्कालिन असतात असा तुमचा समज असेल तर साफ़ चूक आहे. घटना कुठलीही असो, त्यावरील चर्चा काही संबंधीत स्टेशने घेउन हिंदुत्ववादी विरुद्ध सेक्युलर किंवा परंपरा-संस्कृतीवाले विरुद्ध शास्त्रीय-आधुनिकवाले (किंवा याचे कुठलेही परम्युटेशन- काँबिनेशन) याच ट्रॅकवर जाणार याची खात्री बाळगा. असे बाफ़ कित्येक महिने चालू शकतात पण त्यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. सर्वप्रथम बाफ़ सुरु करणार्याने चालू वादात सुरुवातीलाच काही एक ठाम भूमिका घेण्यास सक्त मनाई आहे. दुसरे म्हणजे त्याने पहिली किमान चार पाने अजिबात कसलीही प्रतिक्रिया देउ नये. यामुळे दोन गोष्टी साध्य होतात एकतर दोन्ही बाजूंना मैदानात उतरायला वाव मिळतो आणि दुसरे असे की ४-५ पानानंतर भांडाणार्यापैकि काही जणांना जाग येउन ते तुम्हाला शोधू लागतील आणि त्यात अजून १०-२० पोस्टी वाढतील (खरे तर हा पुढील महत्वाच्या प्रश्नाचा भाग आहे)
३] बाफ़ सतत पहिल्या पानावर कसा टिकवावा?
यात अनेक उपप्रश्न आहेत आपण त्यांचा एक एक करुन विचार करु
१. रिक्षा कशी फ़िरवावी?
रिक्षा न फ़िरवता तुम्हाला प्रतिक्रिया येतील या ’लेवल’ ला असाल तर हे वाचूच नका. तसं नसेल तर पहिली गोष्ट म्हणजे माणूस पाहून विपूत रिक्षा घाला, काहींनी नोएंट्रीचे बोर्ड लावलेत ते पहा. त्याहून महत्वाचे म्हणजे उद्या त्याची रिक्षा आली तर आपल्याला झेपणार का याचा अंदाज घ्या. शक्यतो एकगठ्ठा रिक्षा फ़िरवू नका. शुक्रवार संध्याकाळ, शनिवार रविवार पूर्ण हे रिक्षा फ़िरवायचे राहूकाळ समजा. यावेळेत रिक्षा म्हणजे पेट्रोलची नासाडी. वाहत्या बाफ़वर रिक्षा नेणे आणि लक्ष्मी रोडवर खरी रिक्षा चालवणे यात फ़ारसा फ़रक नाही. गर्दी फ़ार असेल तर गिर्हाईक मिळायच्या आतच लकडी पुलावर पोचाल.
२. किती प्रतिक्रिया नंतर आपली प्रतिक्रिया द्यावी?
हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे आणि तज्ञांची यावर वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मताप्रमाणे एकास एक हे प्रमाणदेखील योग्यच आहे तर १५ मागे एक जास्त बरोबर असे ही काहींचे मत आहे. प्रतिक्रियेच्या काय म्हटले आहे त्यावरुन ते ठरवावे असा अत्यंत घातक विचारही काही अल्पसंख्य तज्ञ मांडतात त्याकडे दुर्लक्ष करावे.
३. प्रतिक्रिया कशा द्याव्यात?
मूळ हेतू हा बाफ़ गाजवण्याचा आहे हे न विसरता काय जे लिहायचे ते लिहावे. नुसते धन्यवाद, आभारने फ़ार काही साध्य होत नाही. तुम्हाला कोणी काही प्रश्न विचारला असेल तर त्याचे उत्तर, अनेक प्रश्न तयार होतील असे देणे आवश्यक आहे. आपण बाफ़वर जे बोललेलोच नाही असा नवाच मुद्दा उकरुन काढावा, लोक डायव्हर्ट होतात काही हर्ट होतात आणि आपला हेतू साध्य होतो. ठरवून खुस्पट काढणारे काही आयडी आहेत त्यांच्याकडे रिक्षा फ़िरवल्यास याबाबतीत नक्की फ़ायदा होईल.
शक्यतो जे काय लिहिले आहे ते जे नाही त्या विभागात डकवावे म्हंजे चांगली, सॉरी नॉर्मल कविता 'काहीच्या काहीत' (काहीच्या काही रेग्युलरातच असतात त्यामूळे हे त्यांना लागू नाही!), अजिबात विनोदी नसलेले लिखाण त्या सेक्शनमधे (उदा. हे लिखाण विनोदी आहे असा गैरसमज होउ नये म्हणूनच ते विनोदी लेखन मधे टाकले आहे.). याचा प्रतिक्रिया वाढण्यावर फार उत्तम परिणाम होतो कारण 'हे इथे का टाकले' 'तिकडे हलवा' 'हलवू नका' इ.इ. गदारोळ उडतो, आपले काम झाले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
असो, ही प्रश्नावली अशी बरीच वाढवता येईल पण तूर्त याच लेखाचा टीआरपी वाढवायचे काम करावे लागत असल्याने आम्ही इथेच थांबतो. सूज्ञ व जाणकार माबोकर (म्हणजे सगळेच!) यात भर घालत राहतील अशी आशा आहे.
टीपः लेखात आलेली नावे व चर्चा पूर्णपणे काल्पनिक असून त्याबद्दल कसलीही तक्रार नंतर चालणार नाही.
छान आहे...रीक्शा फिरवायच्या
छान आहे...रीक्शा फिरवायच्या आधीच वाचले...
बागुलबुवा | 8 June, 2011 -
बागुलबुवा | 8 June, 2011 - 11:18
हाय लोक्स, नमस्कार!!! अ ओ, आता काय करायचं
भारी.
(No subject)
आपणास म्या पामराचा शि. सा.
आपणास म्या पामराचा शि. सा. न.
पण बाब्या खरंच कोकलत होता का त्यावेळी?? मला दिसलाच नाही तो.
ए काह्हे आगावा ! त्या
ए काह्हे आगावा ! त्या अनुल्लेखाच्या पहिल्या मुद्द्यात काय करुन ठेवलंयस?
नाय ग तो नव्हता कोकलत ते माझे
नाय ग तो नव्हता कोकलत ते माझे एडीटींग आहे
योडे, तू डोळे चोळत होतीस मग
योडे, तू डोळे चोळत होतीस मग कसं दिसणार तुला बाब्याचं लिखित कोकलणं? बादवे, अम्याचं ते पालुपद आगावाने घुसवलंय.
हे धमाल आहे .. हसुन हसुन
हे धमाल आहे .. हसुन हसुन डोळ्यात पाणी आल ..


खदाखदा हसणार्या स्माईली टाकणे हा अनुल्लेखाचा एक नामी प्रकार आहे. दुसर्या व्यक्तीला आपली प्रतिक्रिया आवडली म्हणून हसताहेत की उपहासाने ते कळत नाही. >> अगदी
सर्वप्रथम बाफ़ सुरु करणार्याने चालू वादात सुरुवातीलाच काही एक ठाम भूमिका घेण्यास सक्त मनाई आहे.>> हे पण भारी आहे !
शक्यतो जे काय लिहिले आहे ते जे नाही त्या विभागात डकवावे >>
मस्त !.. आवडल..
जबरी
जबरी
वाहत्या बाफवरील अनुल्लेख आणि
वाहत्या बाफवरील अनुल्लेख आणि चर्चा बाफवरील अनुल्लेख एकदम सहीच.
(No subject)
द्रुपाल कृपा
द्रुपाल कृपा
कारण नवा बाफ़ आणि कॉलेजात नवी
कारण नवा बाफ़ आणि कॉलेजात नवी पोरगी यात फ़ारसा फ़रक नाही, दोन्हीचा भाव आठवडाभरात उतरतो. >>>>
वाहत्या बाफ़वर रिक्षा नेणे आणि लक्ष्मी रोडवर खरी रिक्षा चालवणे यात फ़ारसा फ़रक नाही. >> :d
आगाऊ... नविन वोटबॅंकेचे आणि गटगचे बाफ कसे काय सुटले रे?
सहीये हे! आगाऊ मस्त जमलय.
सहीये हे! आगाऊ मस्त जमलय.
अनुल्लेखाची उदाहरणं जबरद्स्त
अनुल्लेखाची उदाहरणं जबरद्स्त एकदम
टी आर पी वाढवण्यासाठी पोस्ट.
टी आर पी वाढवण्यासाठी पोस्ट.
आगावा बाब्याला सोडते तुझ्या
आगावा बाब्याला सोडते तुझ्या अंगावर थांब
जबरदस्त
जबरदस्त
आगावा, लै भारी रे. तुझी
आगावा, लै भारी रे.
तुझी रिक्षा माझ्या अंगणात आली म्हणून मी त्यात बसले तर फायदा झाला की. भरपूर हसायला मिळालं. लगे रहो.
>>>>> शक्यतो एकगठ्ठा रिक्षा फ़िरवू नका. शुक्रवार संध्याकाळ, शनिवार रविवार पूर्ण हे रिक्षा फ़िरवायचे राहूकाळ समजा. यावेळेत रिक्षा म्हणजे पेट्रोलची नासाडी. वाहत्या बाफ़वर रिक्षा नेणे आणि लक्ष्मी रोडवर खरी रिक्षा चालवणे यात फ़ारसा फ़रक नाही. गर्दी फ़ार असेल तर गिर्हाईक मिळायच्या आतच लकडी पुलावर पोचाल.
>>>>>>
सूक्ष्म निरिक्षण ते हेच.
रच्याकने, आगावा, तुझ्या(ही)
रच्याकने, आगावा, तुझ्या(ही) 'फ' खाली तीळ कसा उमटला?
आगावा, लै भारी बे.
आगावा, लै भारी बे.
लै भारी आगावा
लै भारी आगावा
मामी, गल्ली चुकली की काय??
मामी, गल्ली चुकली की काय??
बागुलबुवा | 8 June, 2011 -
बागुलबुवा | 8 June, 2011 - 11:18

हाय लोक्स, नमस्कार!!! अ ओ, आता काय करायचं
(No subject)
भन्नाट जमलय........ वर तूच
वर तूच लिहिलेस म्हणून कळलं की बागुलबुवाचे "अनुल्लेखातले" संवाद तुझे एडिटिंग आहे.
निरिक्षण पण भारी....... अजून येऊ देत.
अनुल्लेख प्रकार सही जमलाय
अनुल्लेख प्रकार सही जमलाय
व्वा!
व्वा!
आगावा, हिमनगाचे टोक रे हे
आगावा, हिमनगाचे टोक रे हे फक्त !
पेपरं संपली क्काय तपासुन
पेपरं संपली क्काय तपासुन मास्तर?
Pages