आणि मी हिंदू झालो !

Submitted by प्राक्तन on 4 June, 2011 - 03:26

आणि मी हिंदू झालो !

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र आहे - शब्बीर. मी येउन जाउन असायचो त्याच्याकडे. खूप बोलायचो एकमेकांशी. तसा मी लहानपणापासून secular आहे. secular या शब्दाचा अर्थ कळण्याच्या कितीतरी वर्षं आधीपासून मी असाच आहे. चांगले मित्र होतो आम्ही. त्याच्या घरच्यांशी बोलायचो. त्याच्या आईला ' अम्मी ' आणि मोठ्या बहिणीला ' आपा ' हाक मारायचो.
एकदा त्याच्या घरी गेलो होतो, रमजानसाठी. तर नेहमी प्रमाणे शीरकुर्मा घेउन आला तो.
मी विचारलं," अम्मी कुठे आहे ? बोलायचय मला."
तर म्हणाला, "आत आहे, बोल इथूनंच, जाईल आत आवाज."
मी म्हटलं, "समोरासमोर बसुन बोलायचय."
तर म्हणाला," तिने नकाब (बुरखा) नाही घातलाय."
मी म्हटलं,"त्याची काय गरज आहे ?"
तो," आमच्यात चालत नाही."
मी," म्हणजे ? काय चालत नाही ?" मला काही कळतंच नव्हतं.
तो म्हणाला," आमच्यात स्त्रियांनी काफिरांसमोर यायचं नसतं."
मी," अरे पण काफिर म्हणजे शत्रू ना ? मी कसा काफिर ? "
तो, " नाही. मुसलमान सोडून सगळेच काफिर. तू तर हिंदू आहेस. "
मी, " काय फरक पडतो त्याने ? मित्र तर भावासारखा असतो ना ? अम्मीला तर मी मुलासारखा असायला हवा ना. तरी पण मी काफिर कसा ?
तो, " असंच असतं."

इतक्या वर्षांत पहिल्यांदा कुणीतरी मला माझ्या हिंदू असण्याची जाणिव करुन दिली. प्रकर्षाने जाणवलं दोन धर्मांतलं अंतर.

आणि मी हिंदू झालो !

आजही मी secular आहे. पण आज मला दोन धर्मांतले फरकही माहित आहेत आणि उणिवाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असाच किस्सा माझ्याजवळ आहे. मी आणि कल्याणला रहाणारा माझा मित्र सुहेल याच्या घरी मी त्यांच्या तिसर्‍या मुलाप्रमाणे असायचो. शनिवारचा उपास मी त्याच्या घरी सोडायचो. सुहेलच्या लग्नात त्याच्या आईने मला काही शाली दिल्या आणि आम्ही दोघेच आलेल्या मुल्ला मौलवींना त्या शाली भेट देत होतो. मी त्या काळात दाढी राखायचो. एका मुल्लाने विचारले. फातिमाबी ये बच्चा कौन है ? अम्मा म्हणाली ये मेरा तिसरा बेटा.

ही गोष्ट १९८८ सालची. १९९० साली मी बजरंगदलाच काम करेन हे मलाच माहित नव्हत.

१९९२ साली वातावरण बदलल. सुहेलचा मुलगा त्याच्या हिंदु मित्राला शाळेत सांगत होता. पहले हम हिंदु थे. मस्जीद गिराने के बाद मुसलमान हो गये. हररोज नमाज अदा करनी पडती है.

या सर्व "सुहेल च्या मुलांना" कोणी तरी सांगायला हवे की अल्लाचे पूजक असलात तरी तुमचे रक्त हिंदूच आहे.तुमच्या कुणाचाही पूर्वज , आजा / पणजा / खापरपणजा अरब नव्हता.

secular चं मराठी भाषांतर काय? निधर्मी का सर्वधर्मसमभाव मानणारा?
>> आजही मी secular आहे.
छान. धर्म मित्रांमधेही दरी निर्माण करतो. तेंव्हा दुसरा धर्म अवलंबून तुम्हीही तिच चूक केली नाहीत हे वाचुन चांगलं वाटलं.

सेक्युलर - सर्वधर्मसमभाव मानणारा. मी दुसरा धर्म अवलंबून काय उपयोग?

आजही मी secular आहे कारण कोण काय विचार करतो त्यावर माझे विचार कसे अवलंबून राहतील?
हिंदू धर्म सर्वसमावेशकच होता आणि तसाच राहिल.

टग्या, मोहनप्यारे - हिंदू होण्यची गरज नाहिये, जन्मत:च आहोत आपण.

नितीन - बरेच किस्से आहेत असे. पण एकदा का धर्माचा पदर पकडला कि मग गोध्रा सारख्या घटनांचा खेद न होता अभिमान वाटतो. इथेच आपण माणूसकी हरवतो.

Rofl

>>पण एकदा का धर्माचा पदर पकडला कि मग गोध्रा सारख्या घटनांचा खेद न होता अभिमान वाटतो. इथेच आपण माणूसकी हरवतो.

गाडीत शिरून डबा पेटवुन दिलं हे काय होतं मग? त्याचाच उत्स्फूर्त बदला होता गोध्रा दंगल म्हणजे. आणि कुणाला वाटलाच असेल अभिमान तर गैर काय? अभिमान वाटायचं एकच कारण म्हणजे "एका गालावर थोबाडित मारली की दुसरा गाल पुढे करा" या मानसिकतेतून हिंदूंनी सुटका करुन घेतली हे.

एका अनुभवावरुन जनरलयाझेशन टाळलेत आणि सेक्युलरच राहिलात याबद्दल अभिनंदन.
हिंदू धर्म सर्वसमावेशकच होता आणि तसाच राहिल.>>> प्रचंड अनुमोदन

गाडीत शिरून डबा पेटवुन दिलं हे काय होतं मग? त्याचाच उत्स्फूर्त बदला होता गोध्रा दंगल म्हणजे.

मंदार जोशींचा नेम कसा चुकला हे सांगा रे त्यांना कोणीतरी ! Happy

--------------------

@प्राक्तन-

लेखात "आणि मी हिंदू झालो" म्हणायचे आणि प्रतिसादात "हिंदू होण्यची गरज नाहिये, जन्मत:च आहोत आपण" असे लिहायचे- यात विसंगती कशी नाही हे समजून घ्यायला आवडेल.