गोळीबाराच्या खुणा... अश्या आणि तश्या.

Submitted by ललिता-प्रीति on 30 May, 2011 - 23:19

आत्ता चाळीशीत प्रवेश करणारे माझ्यासारखे अनेकजण ऐंशीच्या दशकातील पंजाबमधील हिंसाचाराच्या बातम्या ऐकत, वाचत मोठे झालेले आहेत. एकमेव दूरदर्शनचं चॅनल असण्याच्या त्या काळात संध्याकाळच्या प्रादेशिक किंवा रात्रीच्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये खलिस्तान, भिंद्रनवाले, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, लोंगोवाल, अकाली दल, सुवर्ण मंदीर, ऑपरेशन ब्लू-स्टार या संज्ञाच सतत कानावर पडायच्या. इंदिरा गांधींची हत्या, नंतर (चक्क पुण्यात) जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या, त्याबद्दलच्या बातम्या, त्यामुळे काहीसे सटपटलेले घरातल्या मोठ्यांचे चेहरे हे सर्व अजूनही माझ्या चांगलं लक्षात आहे. तेव्हा शाळेत येता-जाता रस्त्यात एखाददुसरा फेटेवाला शीख दिसला तर त्याला बावरल्या नजरेनं निरखलं जायचं. इंदिरा गांधींच्या हत्येच्या दुसर्‍या दिवशी सकाळी त्याबद्दलच्या मोठ्यांच्या सर्व चर्चा ऐकल्यावर, ताजं वर्तमानपत्र घरच्या सर्वांचं वाचून झाल्यावर, मी पुन्हा गुपचूप हातात घेतलं होतं आणि त्यातलं सतवंतसिंग आणि बियांतसिंगचं वर्णन दोन-तीनदा वाचलं होतं. एका सुरक्षारक्षकानेच हत्या करण्यातला विरोधाभास आणि त्या सुरक्षारक्षकाचं शीखधर्मीय असणं मनावर नक्की काय परिणाम करून गेलं ते माहित नाही; पण कधीही विसरता येणार नाही असा परिणाम झाला एवढं नक्की.
पर्यटनासाठी म्हणून जेव्हा आम्ही अमृतसरला पोहोचलो तेव्हा किंवा दुसर्‍या दिवशी सुवर्णमंदीर संकुलात प्रवेश करताना माझ्या डोक्यात सगळे हेच विचार होते.
अमृतसर शहराचं अस्तित्त्व आणि महत्त्व आहे तेच मुळी सुवर्णमंदिरामुळे. ते एक सोडलं तर बाकीचं शहर लौकिकार्थाने शहर म्हणण्याच्याही लायकीचं नाही. पण एकदा मंदीर-संकुलात प्रवेश केला की सगळा नूरच पालटतो. संकुलात संगमरवराचा सढळ हाताने वापर झालेला आहे. तरीही बिर्ला मंदिरांप्रमाणे तिथे कोपर्‍या-कोपर्‍यात श्रीमंती ठिबकत नाही; तर नजरेत भरते ती कमालीची शिस्त, स्वच्छता आणि साधेपणा. सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेली मंदिराची मुख्य वास्तू आणि साधेपणा ही द्वयी गमतीशीर वाटेल पण ते तसंच आहे खरं! मध्यभागी पवित्र तळं, पाण्यात उभी असलेली मुख्य वास्तू आणि तळ्याच्या सभोवताली पांढर्‍या संगमरवरात बांधलेल्या एक आणि दुमजली इमारती. इमारतींत असंख्य दालनं. दालनांमध्ये लोकांच्या वास्तव्याची सोय आहे, सामानसुमान ठेवण्याची व्यवस्था आहे, लंगरासाठी लागणारं धान्यधुन्य साठवलेलं आहे.
मंदीर चोवीस तास उघडं असल्यामुळे भक्‍तांची सततची रीघ लागलेली असते. माणसांची जितकी जास्त वर्दळ तितका गलिच्छपणा, अस्वच्छता वाढत जाणार हे उघड आहे. पण तिथे मंदिराचे सेवेकरी सतत साफसफाई करत होते. अगदी पादत्राणे ठेवण्याच्या ऐसपैस ‘जूता-घर’पासून ते पार अंतर्भागापर्यंत सतत झाडलोट, धू, पूस सुरू होतं. तळ्याच्या पाण्यात आंघोळ करणं हे तिथे येणार्‍या भक्‍तांचं एक मुख्य काम. ते त्यांचं काम मनोभावे करत होते, तर सेवेकरी पाण्यात उतरून ते तळं अगदी तळापासून स्वच्छ करण्याचं काम सतत करत होते.

DSC02212.JPG

मंदिरात प्रवेश करताना सर्वांना आपलं डोकं झाकून घ्यावं लागतं हे ठाऊक होतं आणि तसा इशारा आमच्या हॉटेलच्या स्वागतकक्षानंही आम्हाला दिलेला होता. त्यामुळे मी एक ओढणी जवळ ठेवलेली होतीच. पण का कुणास ठाऊक, जोपर्यंत कुणीतरी आपल्याला त्या कारणावरून हटकत नाही, तोपर्यंत ती डोक्यावर घ्यायची नाही असं मी ठरवलं. नियमांची लोकांना कश्या प्रकारे आठवण करून दिली जाते ते पहायची सुप्‍त इच्छा (किंवा खवटपणा म्हणा हवं तर) त्यामागे असावी.
‘जूता-घर’मध्ये चपला ठेवून आम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी गेलो. तिथे एका छोट्याश्या, उथळ, स्वच्छ हौदात तितक्याच स्वच्छ, थंडगार पाण्याचा प्रवाह होता. त्या पाण्यात पाय धुवूनच सर्वांनी पुढे जायचं होतं. त्या नितळ पाण्यानं अमृतसरमधला सकाळी साडेसहालाही जाणवणारा मे महिन्यातला उकाडा काही सेकंद विसरायला लावला. पाय धुण्यापुरतीच कश्याला, मी त्या पाण्यात चांगली पंधरा-वीस मिनिटं उभी रहायला तयार होते. तेवढ्यात माझ्या मागून एक भक्‍त आला. हौदापाशी खाली बसला. त्या पाण्यात आधी त्यानं स्वतःचं तोंड धुतलं, मग त्यातलं थोडंसं पाणी तो तीर्थासारखं प्यायला आणि मग स्वतःचे पाय धुवून पुढे सरकला. मला ते पाहून एकदम शिसारीच आली. देवावरची, धर्मावरची (आंधळी?) श्रध्दा मूलभूत स्वच्छतेसारख्या बाबींबद्दलच्या लोकांच्या जाणीवा इतक्या बोथट कश्या काय करून जाते त्याचं स्वतःशीच नवल करत मी पण पुढे सरकले. तर कुणीतरी हातवारे करून माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं मला जाणवलं. मी त्या दिशेला पाहिलं तर एक केश-कंघा-कच्छेरा-कडा-कृपाणवाला नखशिखांत शीख स्वयंसेवक आपल्या उजव्या हाताची तर्जनी सरसावून माझ्या उघड्या डोक्याकडे इशारा करताना दिसला. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रामाणिक जरब होती. त्याला विरोध वगैरे करायचा माझा मानस नव्हताच. मी ओढणी डोक्यावर घेतली आणि आत शिरले.

आत शिरल्यावर पहिलं काय आठवलं तर ऑपरेशन ब्लू-स्टारच्यावेळी दूरदर्शनवर पाहिलेली काही कृष्णधवल पुसट चलचित्रं. डोळ्यांसमोरचा माणसांच्या गर्दीनं फुलून गेलेला मंदीर-संकुलाचा परिसर तेव्हा ओस पडलेला होता. उजव्या हाताच्या लांबवरच्या कोपर्‍यातल्या कुठल्याश्या खोलीतून पळत बाहेर आलेले एकदोन दहशतवादी मंदिरात ठिकठिकाणी लपून बसलेल्या भारतीय सैन्याच्या जवानांच्या गोळ्यांच्या टप्प्यातच होते. पुढच्या काही क्षणातच ते जमिनीवर निष्प्राण पडलेलेही दूरदर्शनच्या कॅमेर्‍यानं टिपले होते. ते काही सेकंदांचं अतिशय धूसर, आताच्या तुलनेत सदोष ध्वनिचित्रमुद्रण पुढे कित्येक दिवस बातम्यांमध्ये वगैरे दाखवलं गेलं होतं. सुट्टीच्या, पर्यटनाच्या मनःस्थितीत असूनही तेव्हाची ती दृष्यं माझ्या डोळ्यांसमोरून हलेनात.
आम्ही डाव्या हाताची दिशा पकडून तळ्याच्या भोवती चालायला सुरूवात केली. प्रदक्षिणा किंवा परिक्रमा करणे यापेक्षाही संपूर्ण परिसर नजरेखालून घालणे हे आमचं मुख्य उद्दीष्ट होतं. ठिकठिकाणी गुरूमुखी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत सूचनाफलक, माहितीफलक लावलेले होते. ते एकएक वाचत चाललो होतो. मुख्य वास्तूत दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग लागलेली होती. तो मगाचचा हौदातलं पाणी पिणारा भक्‍त त्या गर्दीतच कुठेतरी स्वतःचं अस्तित्त्व हरवून, तिष्ठत उभा असावा...

DSC02214.JPG

आमची प्रदक्षिणा जवळजवळ पूर्ण होत आली. चालताचालता डावीकडे एक दुमजली इमारत इतर इमारतींपेक्षा वेगळी, जरा जास्त सुशोभित केलेली, घुमटाकार छप्पर असलेली अशी दिसली.

DSC02219.JPG

त्या इमारतीत भक्‍तगण प्रवेश करताना दिसत नव्हते. पण येताजाता इमारतीसमोर एका जागी थबकून, खाली वाकून ‘मत्था टेकके’ जात होते. इमारतीच्या तळमजल्याचा भाग असलेली कमी उंचीची खोलीवजा अशी ती जागा दर्शनी भागाकडून लोखंडी गजांनी बंद केलेली होती. म्हणजे त्या खोलीत आत काय आहे ते बघता येत होतं पण प्रवेश निषिध्द होता. मी जरासं खाली वाकून आत काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. आतल्या अंधारी जागेत मला आधी काहीच दिसलं नाही. तिथेच शेजारी असलेला मोठा माहितीफलक मग मी वाचायला सुरूवात केली. ऑपरेशन ब्लू-स्टारच्या वेळेस या इमारतीचं सर्वात जास्त नुकसान झालं होतं, नंतर भक्‍तांच्या अर्थसाहाय्यातून आणि स्वयंसेवकांच्या कष्टांतून ती इमारत पुन्हा बांधली गेली... इतपतच माहिती त्या फलकावर असती तर ठीक होतं. पण तिथे ‘जुलुमी भारत सरकारने केलेल्या कारवाईत...’ अश्या आशयाचा एक आख्खा परिच्छेद होता. ‘ते विरुध्द आपण’, ‘त्यांचं विरुध्द आपलं’ असा त्यातला सूर पाहून मी सर्दच झाले. मान वळवून मी आजूबाजूच्या गर्दीकडे पाहीलं. ती गर्दी आणि आम्ही एकाच देशाचे नागरिक नव्हतो? त्या गर्दीवर त्या क्षणी काही संकट ओढवलं असतं तर भारत सरकार त्यांच्या मदतीला धावून येणार नव्हतं? तरीही ‘त्यांच्यात’ या मुद्द्यावर इतकी एकजूट होती की फलकावरच्या मजकुराच्या आशयाबद्दल कुणालाच काहीच गैर वाटू नये??
काहीश्या सैरभैर अवस्थेतच मी पुन्हा त्या लोखंडी गजांपलिकडे वाकून पाहिलं. आता आतल्या अंधाराला नजर सरावली होती म्हणा किंवा त्या माहितीफलकानं सगळं स्वच्छ करून दाखवलं होतं म्हणा, पण आत मला एक जुनाट, गिलावा न केलेली, विटाविटांची भिंत दिसली आणि त्या भिंतीवर जुनाट, काळपट रक्‍ताचे मोठमोठे ओघळही दिसले!! अंगावर क्षणभर काटा आला, डोकं सुन्न झालं. आधुनिक भारताच्या इतिहासातील एका दुर्दैवी कालखंडाच्या तितक्याच दुर्दैवी आणि क्लेषकारक खुणा तिथे सन्मानाने जपण्यात आल्या होत्या. शीख समुदायातील लोक तिथे नतमस्तक होत होते, मनातल्या मनात श्रध्दांजली वाहत होते.
काही कळेनासंच झालं. मी तश्याच बधीर अवस्थेत चार पावलं पुढे असलेल्या अजून एका माहितीफलकाच्या दिशेनं सरकले. तो फलक केवळ गुरूमुखी भाषेत होता. काय लिहिलं असेल त्यात? इतरभाषिकांना सहजगत्या वाचता येऊ नये यासाठी ते जाणीवपूर्वक केलं गेलं होतं का? असा प्रश्न पडला. ती अनाकलनीय लिपी आपल्याला वाकुल्या दाखवतेय असा भास झाला.
आता तिथून मला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं...

----------

सुवर्णमंदिरापासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर असलेल्या जालियनवाला बागेत मात्र तुलनेनं अगदीच कमी गर्दी होती. एक बर्‍यापैकी प्रवेशद्वार, एकदोन सुरक्षारक्षक इतपत काहीतरी दिसेल अशी अपेक्षा होती. पण एका अरुंद गल्लीवजा रस्त्यावरूनच आम्ही आत गेलो.

DSC02241.JPG

प्रवेशद्वार नसण्याचं कारण थोड्याच वेळात लक्षात आलं.
मुळात ही बाग ‘उद्यान’ या अर्थाने बाग नाही. ‘जलियाँवाला बाग’ या गुरुमुखी संज्ञेचा अर्थ आहे सभोवतालच्या अनेक घरांची कुंपणं न घातलेली परसदारं एकत्र होऊन बनलेला, काहीएक विशिष्ट आकार-उकार नसलेला, उंचसखल असा भाग. (तिथे असलेल्या छोटेखानी संग्रहालयात ही माहिती वाचायला मिळाली.) साहजिकच त्या भागात आवर्जून कुणी जाणार नाही. म्हणूनच तिथे पूर्वीही प्रवेशद्वार नव्हतं आणि आताही नाही.
आतला बागेचा परिसर बर्‍यापैकी प्रशस्त आहे. मध्यभागी एक स्मारक आहे. ज्या जागेवरून जनरल डायरच्या आदेशाने सैनिकांनी निरपराध लोकांवर गोळ्या झाडल्या ती जागा निर्देशित केलेली आहे.

DSC02223.JPG

त्याच्याच शेजारी एक अमर-ज्योत पण आहे. (जनरल डायर हा नुसता जनरल नव्हे, तर ब्रिगेडियर-जनरल होता ही माहितीही त्या संग्रहालयात मिळाली.) बागेच्या डावीकडच्या भागात एक जुनी विहीर आहे. त्या विहिरीला कठडे नव्हते. त्यामुळे हत्याकांडाच्या वेळी आपापले जीव वाचवून पळणारे अनेक लोक नकळत त्या विहिरीत पडले आणि बुडून मेले. त्या विहिरीला आता लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त केलं गेलं आहे. त्या जाळीवर रेलून मी आत डोकावून पाहिलं. विहिरीतल्या पाण्याचा काही भाग दिसला. तेव्हा किती लोकांचे आकांत, किंकाळ्या, आक्रोश त्या पाण्यानं ऐकले असतील! विहिरीतून जेव्हा एकशेवीस मृतदेह बाहेर काढले गेले तेव्हा त्यांच्या नातेवाईकांच्या शोकाला पारावार राहिला नसेल! किती विदीर्ण करणारी दृष्यं असतील ती सगळी...!
बागेच्या प्रवेशमार्गाच्या विरुध्द बाजूच्या भिंती आतल्या बाजूनं गिलावा, सुशोभिकरण न करता तश्याच विटांच्या बांधकामाच्या स्वरूपात राखल्या आहेत. ते जुनं, त्याकाळचं बांधकाम म्हणून तसंच्यातसं जपलं गेलं असावं हे लक्षात आलं. भिंतींवर ठिकठिकाणी तेव्हा झाडल्या गेलेल्या गोळ्यांच्या फैरींच्या अनेक खुणा निर्देशित केल्या गेल्या आहेत. काहीकाही खुणा तर १५-२० फूट उंचीवरच्याही आहेत.

DSC02231.JPG

ज्या-ज्या भिंतींवर खुणा आहेत त्या भिंतींच्या अगदी जवळ पर्यटकांना जाता येत नाही. पण पहिल्या भिंतीला काटकोनात एक अगदी तशीच भिंत होती. मी त्या भिंतीच्या अगदी जवळ गेले. नकळत त्या जुन्या विटांवरून हात फिरवला. मान वर करून पाहिलं. जीव वाचवण्यासाठी म्हणूनही त्या भिंतीवर चढणं निव्वळ अशक्य कोटीतलं वाटत होतं. तरीही त्यावेळेस अनेकजणांनी तसा प्रयत्न केला असेल आणि त्यात ते असफल झाले असतील, हकनाक प्राणाला मुकले असतील या विचारानं डोळ्यांत टचकन्‌ पाणीच आलं...
एकाच शहरातली हाकेच्या अंतराच्या फरकानं गोळीबार झालेली दोन ठिकाणं... प्रसंग, काळ वेगवेगळा असला तरी गोळीबाराच्या वेळच्या घटना विस्मृतीत जाऊ नयेत म्हणून दोन्ही ठिकाणी त्याची साक्ष देणार्‍या उद्‍ध्वस्त बांधकामांची जपणूक झालेली... नतमस्तक व्हावंसं वाटणारी माणसंही दोन्ही ठिकाणी... पण एके ठिकाणचं नतमस्तक होणं देशभक्‍ती, राष्ट्रभक्‍तीची जाणीव करून देणारं, तर दुसर्‍या ठिकाणी फुटीरतावादाचं आता शमलंय असं वाटणारं वादळ अजूनही निमालं नसल्याच्या खाणाखुणा...

अश्यावेळी पर्यटक म्हणून आपण काय करायचं? केवळ फोटो काढून, असले चार शब्द खरडून सगळं विसरून जायचं?
काय करायचं?
जगातली सर्वात महान अशी आपली संसदीय लोकशाही या अश्याच असंख्य विरोधाभासांच्या आधाराने उभी आहे, तरीही तिचा पाया डळमळत नाही याचा अभिमान बाळगायचा...?
का कधीतरी असल्या विरोधाभासांपायी तिचा पाया डळमळूही शकतो याची चिंता बाळगायची?
काय करायचं?

गुलमोहर: 

चांगला लिहीलाय लेख. खर तर 'ते' आणि 'आपण' हे सापेक्ष आहे, स्थळ/काळ/वेळ याप्रमाणे ते बदलते. या सगळ्या घटकांत धर्म अपवाद आहे का? हो religion is not a function of space and time, it is independent. म्हणून तर जगात एवढी उलथापालथ.

यु. एस मधे येऊन १० वर्षं झाली, बे एरीयात ऑलमोस्ट साडे आठ वर्षं घालवली.
तिथे आलेले हे काही अनुभव आणि फ्रिमाँट च्या माझ्या एका सीख मैत्रीणी कडून मिळालेली ही माहिती ( तिचे वडिल आर्मी ऑफिसर आहेत, ब्लु स्टार चा ही पार्ट होते बहुदा, त्या वेळी जर खलिस्थान झाले तर आर्मीतल्या सीख लोकांचे पुढे काय अशी वेगळीच चिंता होती त्यांना हे ही समजलं तिच्या बाबां कडून, दोन्ही देश हाकलून देणार का ही त्यावेळी असलेली मोठी चिंता होती सीख आर्मी ऑफिसर्स ना.)

* १० वर्शा पूर्वी यु.एस ला आल्यावर पहिल्यांदा देशभक्ति वगैरेनी भारावून जायचा दिवस होता तो म्हणजे फ्रिमाँट ला पाहिलेली भली मोठी पहिली इंडिया डे परेड, तिथेच मोठा इंडिया फेस्टिवल , वरून हेलिकॉप्टरही फिरत होते ' इंडिया सेलिब्रटिंग इंडिपेन्डन्स डे' ची पताका फडकवणारं.. कसं अभिमानानी कॉलर ताठ करावी , रोमांच उभे रहाव्ं असं वातावरण..
पण हे काय, त्याच हेलिकॉप्टर च्या मागे (शेपूट वाटावं इतक्या मागे) अजुन एक हेलिकॉप्टर फिरत होतं दुसरी पताका फडकवणारं ' इंडिया किल्स मयनॉरिटिज- सीख्स फॉर खलिस्तान' !!!
मग प्रत्येक वर्षी परेड ला सवय च झाली या २ हेलिकॉप्टर्स ना एकत्रं पहायची :(.

* बे एरीयतलं आमचं अत्यंत आवडतं फ्रिमाँट आणि आजुबाजुची युनियन सिटी, नेवार्क या ट्राय सिटिज म्हणजे मिनि इंडिया ..खरं तर मिनि पंजाब म्हंटलं तरी चालेल.. जितकी सॉफिस्टिकेटेड नॉर्मल पंजाबी क्राउड आहे तेवढीच खलिस्तानी लोकांचीही आहे !
पहिल्यांदा हे सीख मित्रा कडूनच कळलं कि फ्रिमाँट चे काही नेहेमी दिसणारे चेहरे ( ग्रोसरी वाले, रेस्टॉरंट्स वाले, व्हिडिओ लायब्ररी वाले, गुरुद्वारा मधे सेवा करणारे इ.) हे तडीपार खालिस्तानी नेते आहेत!
बे एरीयातले सगळेच गुरुद्वारा अति भव्य, scenic !
फ्रिमॉन्ट गुरुद्वारा मधला लंगर फार प्रसिध्द .. टेस्टी आणि ते ही २४ तास ओपन , मैत्रीणीं बरोबर किती तरी वेळा गेलीये, त्यात दिवाळी आणि गुरु नानक जयंती ला तिथलं फायर वर्क्स , देशी ड्रेस परेड बघण्या सारखं त्यामुळे खूपदा जाणं होत असे बे एरीयात असताना..तिथला भव्य लंगर हॉल म्हणजे २-३ मंगल कार्यालयांच्या डायनिंग हॉल पेक्षा मोठा , अतिशय स्वच्छ, लहान मुलां पासून म्हातार्‍यां पर्यंत मनापासून 'सेवा' करतात, जेवण बनवण्या पासून ते पंगतीत गरम गरम फुलके, भाज्या, दाल वाढणे, ते खरकटं ताट उचलण्या पर्यंत, इतकी मनोभावे सेवा कि जेवणारा माणुस अगदी दबून जावा ( जनसेवा हिच इश्वरसेवा चं मूर्तिमंत उदाहरण!
पण ..............................त्या अति भव्य लंगर हॉल भरून अनेक बंदुकधारी सीख पुरुष आणि बायकांचे फोटोज आहेत(फोटोतल्या त्या बंदुकधार्‍यांच्या चेहर्‍या वरचे भाव पण खुन्नस देणारे, डोळ्यात रक्त आणून चिडून बघणारे वगैरे), किती तरी वेळा इतर मैत्रीणींना विचारलं त्यांना कोणाचे फोटोज आहेत नवह्तं माहित, आधी वाटलं हे कोणी डोनेशन देणारे असतील पण असे बंदुकधारी का, हा प्रश्न होताच मनात..अंदाज होताच पण जेंव्हा खुद्द माझ्या सीख मैत्रीणीनी सांगितलं तेंव्हा समजल्ं, हे सगळे खलिस्तानी नेते , बरेचसे शहिद, काही शिक्षा झालेले !!
ही माझी मैत्रीण ( तीच वर उल्लेख केलेली जिचे वडिल आर्मी ऑफिसर आहेत) , ती म्हणे गुरुद्वारा मधे आम्ही रेग्युलर्ली जातो खरं पण या खालिस्तानी अ‍ॅक्तिव्हिटिज मुळे त्यांना पवित्रं वाटत नाही तिथे !
त्यातून तिने सांगितलेले काही किस्से.. इथलय सगळ्या गुरुद्वारां मधे बरेचदा नवीन जनरेशन ला भडकवण्या साठी लहान मुलांना ८४ च्या व्हॉयलेंट व्हिडिओ टेप्स, भारता बद्दल द्वेष निर्माण करण्या साठी दाखवल्या जातात.
काही वर्षां पूर्वी ( हे अता अबंद झालं म्हणे) या गुरुद्वारां मधे लहान मोठे, स्त्री पुरुष सगळ्यांनाच सामुहिक व्हिडिओ दाखवून सांगत कि सीख लोकांवर कसे अत्याचार होतायेत, मग गुरुद्वाराचय त्या अति भव्य हॉल भर गालीचे पसरले जायचे , डोनेशन साठी अवाहन केलं जायचं.. गालिच्यांवर कॅश टकायचेच लोक पण बायका वेड्या सारखे भावनेच्या भरात दागिने काढून टाकत त्या गालिच्यावर , मग या गालिच्यांची भली मोठी पोती जायची खलिस्तानी चळवळीला मदत म्हणून ( कि अजुन कुठे काय माहित!)
लहान मुलांना हेच शिकवल्म जातय हे फार अस्वस्थं करणारं आहे :९.
गेल्याच वर्षी फ्रिमॉन्ट बुलेव्हाड-वॉलनट च्या वाहत्या गर्दीच्या वेळी संध्याकाळी सीख लहान मुल् आणि तरुन तरुणी समुदाय भारता विरुध्द कँडल प्रोटेस्ट करून डोनेशन जमा करत होते , सगळ्या भारत विरोधी पाट्या , ८४ च्या हिंसेचे फोटो हातात घेतलेली लहान मुलं :(.
* बे एरीया पासून १५० मैलावरचं (५ - ९९ हायवेनी )जोडलेलं युबा सिटी हे तर ऑफिशिअल पंजाब नाव द्यावं असं टाउन.. अमेरिएक्तली सर्वात मोठी सीख कम्युनिटी इतेह आहे अस्म वाचल्म होत्म मागे.
हे पूर्णहे शेतकर्‍यांच टाउन .. एब एरीया आणि इथल्या क्राउड मधे जमिन आसमानाचा फरक पण हे टाउन तर खलिस्तानीम्नी भरलय अस्म मैत्रीण सांगते.
माझा नवरा त्याचय मित्रा बरोबर तिथल्या गुरुद्वारा मधे गेला होता ( मित्र् पंजाबी सिंगर्स चा एक शो ऑरगजाइझ करत होता त्याची माहिती पत्रक् द्यायला), तिथे तर एक समुदाय ' डोन्ट फरगेट ११८४' चे टि शर्ट घालून आला होता !
अ‍ॅल सोब्रान्टे, सेन होजे मधेही असा प्रचार करणारे लोक आहेतच !
अर्थात सगळेच पंजाबी असे नाही, माझ्या मैत्रीणी सारखे अनेक 'अस्सल भारतीय' पम्जाबीही एब एरीयात आहेत पण लहान मुलां मधे ही हेट्रॅड पोचवणारा एक समुदाय आहेच हे मात्र बघून फार विचित्रं वाटतं :(.

"गुरमित सिंग औलख" नावाचा मूळचा भारतीय शीख असलेला व १९९० च्या दशकापासून अमेरिकेत असलेला व स्वतःला "कौन्सिल ऑफ खलिस्तानचा प्रेसिडेंट" अशी स्वयंघोषित पदवी देणारा कट्टर खलिस्तानवादी अजून अमेरिकेत खलिस्तानचा प्रचार करतो का?

सगळंच विचार करायला लावणारं Sad
आधी वाचला लेख तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी कळेना म्हणून काहीच न लिहिता परत वाचला आज. पण अजूनही तसंच! Sad

डिजेची पोस्ट वाचून आठवलं की उत्तर जपानमध्ये होक्कायदोच्यावर लगेच लागून रशिया येतं. त्यातल्या काही भागावर जपानने आक्रमण केलेलं आहे. त्यामुळे भडकलेले रशियन्स जपानमध्ये काळी गाडी फिरवत त्यांच्या भाषेत घोषणा देत प्रोटेस्ट करत असतात.

लेख आवडला.
जालियनवाला मी पण पाहिले आहे. अत्यंत अस्वस्थ करुन टाकते. सुन्न करुन सोडते. पुन्हा एकदा ती घटना आपल्यासमोर घडत आहे असे भास व्हायला लागतात.

दिपांजली, असे काही असेल हे स्वप्नातपण वाटले नव्हते Sad

सुनिधी,
मलाही जबरी धक्का होता तो, अता सवय झाली !
भारतात असे पर्यंत जे शीख लोक प्रत्यक्षात पाहिले ते कट्टर देशभक्त, सगळे एन डी ए मधले किंवा फक्त आर्मी ऑफिसर्स !
ते ब्लु स्टार वगैरे प्रकरण झाल् तेंव्हा अग्दीच लहान होते, आठ्वत नाही एवढ् काही पण जे पाहिल् ते टी.व्ही. वर किंवा न्युज पेपर मधे , प्रत्यक्षात पाहिलं ते इथे आल्यावर!

शीखांत अलगपणा आणला तो ब्रिटिशांनी. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ब्रिटीशांना शीखांनी मदत केली. त्याची बक्षिसी म्हणून अधिकृत ब्रिटीश इतिहासात शीख हा वेगळा धर्म (=रिलीजन) मानला गेला. खरंतर गुरु ग्रंथसाहिबाच्या पानापानावर राम आणि बिठल (=विठ्ठल) आहेत. उर्वरित हिंदूंहून शीख कोत्याही प्रकारे वेगळे नाहीत. शीखांच्या लढाऊपणाचा उगम खालसा पंथात आहे. दाढी, फेटे, कृपाणवाले आहेत त्यांना तांत्रिकदृष्ट्या खालसापंथी म्हंटले पाहिजे. हिंदूंची प्रतिकारक्षमता क्षीण व्हावी म्हणून खालसापंथीयांना ब्रिटीशांकडून फितवण्यात आले.

वास्तविक पाहता इ.स. १७६१ साली मराठ्यांना अर्धा भारत पार करून उत्तरेत अब्दालीशी लढायला यावे लागले. तेव्हा खालसावाले कुठे होते? अब्दालीला पानिपताहून पार अफगाणिस्थानात मागे रेटल्यावर जी राजकीय पोकळी निर्माण झाली तीत शीख उपसत्तांचं (मिसल) फावलं. यात रणजितसिंहांना कमी लेखण्याचा कोणताही हेतू नाही. अब्दालीने पानिपताहून परत जातांना शीख जनतेची बेसुमार कत्तल करून हरमंदिरसाहिबाजवळील तळं (ज्यावरून शहराला अमृतसर नाव पडलं ते) प्रेतांनी भरून टाकलं. शीख नेतृत्वाला जनतेच्या जीवाची किंमत कळलीच नाही असं खेदानं म्हणावं लागतं. पुढे रणजितसिहांनी सार्‍या मिसली एकत्रित करून भक्कम शीख साम्राज्य उभारलं.

मात्र त्यांच्या मृत्युनंतर (इ.स. १८४०) त्यांच्या वारसदारांमध्ये भांडणे लागली आणि फाटाफूट झाली. त्यामुळे इ.स.१८५० पर्यंत शीख राज्ये ब्रिटिशांनी आपल्या नियंत्रणात घेतली. पुढे इ.स. १८५७ च्या उठावात मराठ्यांनी दिल्लीवर बहादूरशाह झफरला राजा म्हणून बसवले. मात्र तो नामधारी होता आणि खरे सत्ताधारी मराठे होते ही अक्कल रणजितसिंहांच्या वारसदारांना अखेरपर्यंत आलीच नाही. अर्थात इंग्रजांनी शीखांना फितवले की एक मुसलमानाच्या बाजूने का लढता म्हणून. अशा रीतीने शीखांची मदत इंग्रजांना मिळाली, इंग्रजांनी उठाव मोडून काढला आणि शीख फुटीरतावादाचा उगम झाला. पुढे नाभा पतियाळा संस्थानाचे पितापुत्र महाराजा राजिंदरसिंग (१८७२ - १९००) आणि भूपिंदरसिंग (१९०० - १९३८) यांनी देशीपरदेशी जे रंगढंग उधळले त्याची वर्णने किती म्हणून सांगावीत! असल्या इंद्रियगामी राजांची काय लायकी आहे?

ललितादेवी, तुम्ही विचारलंय ना की काय करायचं म्हणून? तर मग काय करायचं नाही ते आधी बघूया! पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुणालाही घाबरत नाही. महाराजा रणजितसिंह सोडल्यास इतर कोणीही गुरुगोविंदसिंहांचा वारसा समर्थपणे चालवला नाहीये. जे लोक श्रीगुरुंचे नाव घेतात आणि केवळ पैसा गोळा करतात असल्यांना आम्ही फुटक्या कवडीइतकीही धूप घालीत नाही. आम्ही मर्‍हाटा आहोत! पानिपतावर मरू घातलेला दत्ताजी शिंद्या जोरकसपणे ओरडतोच ना की बचेंगे तो और भी लडेंगे? तोच आमचा आदर्श!!

एव्हढा सामर्थ्यशाली आणि प्रेरणादायी वारसा असतांना महाराष्ट्रीय सारस्वत मलूल आणि हतप्रभ का होऊन बसलंय?

आता आपण एकेक प्रतिक्रिया बघूया.

१. पक्का भटक्या :
मैमुना बेगमेने (जिला इंदिरा गांधी असेही म्हणतात तिने) ऑपरेशन ब्ल्यू स्टारची कारवाई केली हे योग्यच होते. मात्र कार्यवाहीवर अनेक आक्षेप घेता येतात. अधिकृतरीत्या कारवाई संपली ६ जूनला. मात्र पहिली बातमी बाहेर आली १४ जूननंतर. काय झालं असेल मधल्या ८ दिवसांत कोणास ठाऊक! शिवाय कारवाई सणासुदीच्या दिवशी गर्दी असते तेव्हा का केली? जनरल वैद्यांनी नकार का दिला नाही? मैमुना बेगामेचा सल्लागार कोण होता तेव्हा? भिंद्रनवाल्या सुवर्णमंदिरात मुळी घुसलाच कसा?

तुम्ही म्हणता की एकाचा क्रांतिकारक तो दुसर्‍याचा दहशतवादी, ते अगदी बरोबर आहे. त्यातला पहिला म्हणजे भारतीय जनता आणि दुसरा आहे कॉंग्रेस सरकार. ते नेहमीच भारतद्रोही राहिले आहे.

२. मास्तुरे :
तुमचा प्रश्न अगदी समर्पक आहे. हरकिशनलाल भगत, टायटलर, ललित माखन, सज्जनकुमार, धरमदास शास्त्री, कमलनाथ इत्यादी लोक अजूनही जिवंत कसे? खरंतर हा प्रश्न फ्रिमाँटच्या खलिस्तानी औलादीला आणि त्यांच्या पाठीराख्यांना विचारला पाहिजे. एव्हढा गडगंज पैसा गोळा करून काय दिवे लावलेत तुम्ही? श्रीगुरूंचे नाव घ्यायला खलिस्तानी भिकार्‍यांचं काय जातंय? तसंच पैसे देणार्‍यांना जाणीव नको? त्यांची काहीच जबाबदारी नाही? भावनेच्या भरात कार्य विसरले? की तेही अति सोफिस्टिकेटेड असल्याने गुंडांना घाबरून असतात? जाब विचारायला हवा त्यांना. निदान प्रेमाने जाणवून तरी द्यायला हवं.

३. ठमादेवी :
माझ्या माहितीप्रमाणे शिवाजीमहाराज अखिल भारतभर सर्वमान्य आहेत.

४. रणजित चितळे :
तुम्ही म्हणता ते एका अर्थी बरोबर आहे. खलिस्तानचे बीज पाकने रोवले. मात्र त्यात एक तरतूद होती की खलिस्तानमध्ये पूर्व तसेच पश्चिम दोन्ही पंजाब असतील. साहजिकच पाकिस्तानचा पण तुकडा पडणार. आपण म्हणायचं की पहले पाकी तुकडा लाव. बादमे हिंदुस्थानी पंजाबका देखेंगे. हा संदेश ठामपणे पोहोचवला पाहिजे.

५. श्रीकांत :
हिंदू आणि शीख असा शब्दप्रयोग अनाठायी आहे. शीख आणि शीखेतर हिंदू असं म्हणणं योग्य ठरेल.

६. दीपांजली :
लहान मुलांमध्ये द्वेषभावना रुजवणारे लोक नक्की कुठला साचा (पॅटर्न) चालवीत आहेत? हा कराचीतल्या मदरश्यांचा आहे हे अनेकांनी ओळखलं असेलंच. यांना काय घाबरायचं? त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून सांगितलं पाहिजे की आम्ही तुम्हाला ओळखून आहोत. तुम्ही कोणाच्या तालावर नाचताय ते आम्हाला चांगलं माहीत आहे.

असो.

आता एक सत्य घटना पाहूया. अविनाश धर्माधिकारी यांच्या 'एक अस्वस्थ दशकाची डायरी' या पुस्तकात त्यांनी दिली आहे. ते एका शीख नेत्यासोबत (बहुतेक मनजीतसिंग बिट्टा) चर्चा करायला (अमृतसरात?) गेले होते. त्यांनी थोडे खोलवर प्रश्न विचारले आणि वातावरण लगेच गरम झालं. बाजूच्या रक्षकांचे हात बंदुकांच्या चापावर स्थिरावले. पण अविनाश मागे हटले नाहीत. आपल्या मतावर एव्हढे ठाम राहिले की शेवटी तो नेता म्हणाला की पाकिस्तानलाही परत भारतात विलीन व्हावंच लागेल. गोष्ट मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

बंदुकी काय भेकडकसाबच्या पिलावळीकडेही असतात.

ललितादेवी, तुम्ही विचारलेलं होतं ना, की काय करायचं म्हणून? सांगतो....सांगतो! आपल्याला जुलमी भारत सरकारला जाब विचारायला हवा की १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतले गुन्हेगार अजूनही उजळ माथ्याने कसे वावरतात म्हणून!

एकाच दगडांत एव्हढे पक्षी मारायची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले कितीही आभार मानले तरी थोडेच आहेत. Happy
कळावे लोभ असावा.

६. दीपांजली :
लहान मुलांमध्ये द्वेषभावना रुजवणारे लोक नक्की कुठला साचा (पॅटर्न) चालवीत आहेत? हा कराचीतल्या मदरश्यांचा आहे हे अनेकांनी ओळखलं असेलंच. यांना काय घाबरायचं? त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून सांगितलं पाहिजे की आम्ही तुम्हाला ओळखून आहोत. तुम्ही कोणाच्या तालावर नाचताय ते आम्हाला चांगलं माहीत आहे.
<<
निनाद,
मी कुठे लिहिलय असं ?
ही दुसर्‍या कोणाची तरी पोस्ट दिसतेय.

दीपांजली,

हे काय इथे.
>>>लहान मुलां मधे ही हेट्रॅड पोचवणारा एक समुदाय आहेच हे मात्र बघून फार विचित्रं वाटतं अरेरे.

क.लो.अ.

ओह अच्छा, गॉट इट !
मला वाटलं ती ४ वाक्यं माझी समजून रिप्लाय केलाय, पण नंतर लक्षात आलं कि माझ्या पोस्ट ला कोट करून तुम्ही लिहिलेली वाक्यं आहेत ती :).

>>> अधिकृतरीत्या कारवाई संपली ६ जूनला. मात्र पहिली बातमी बाहेर आली १४ जूननंतर. काय झालं असेल मधल्या ८ दिवसांत कोणास ठाऊक!

कारवाई ३ व ४ जूनला झाली व पहिली बातमी वर्तमानपत्रात व दूरदर्शनवर ६ जूनला दिली होती. कारवाईत सहभागी झालेल्या एका कर्नल किंवा मेजरने दूरदर्शनवर ६ तारखेला सविस्तर निवेदन देऊन या कारवाईचे तपशील सांगितले होते.

>>> शिवाय कारवाई सणासुदीच्या दिवशी गर्दी असते तेव्हा का केली?

कारवाईच्या आदल्या दिवसापासून सुवर्णमंदीराच्या आजूबाजूच्या गल्ल्या बंद करून ठेवल्या होत्या व वेढा घालून आत कोणालाही जाऊन दिले जात नव्हते. माध्यमांना शहरात प्रवेश न दिल्यामुळे कारवाई झाल्यानंतर २ दिवसांनी कारवाईची बातमी अधिकृतरित्या बाहेर दिली.

>>> जनरल वैद्यांनी नकार का दिला नाही?

नकार कशाला द्यायचा? अतिरेक्यांना सुवर्णमंदीरातून हुसकून काढण्यासाठी केलेली ही योग्य कारवाई होती. जरी ही कारवाई खूप उशीरा केली आणि कारवाई करण्यामागे राजकीय हेतू सुध्दा होता (त्याच वर्षी डिसेंबर मध्ये लोकसभेच्या निवडणूका होत्या) तरीसुध्दा ही योग्य कारवाई होती.

>>> मैमुना बेगामेचा सल्लागार कोण होता तेव्हा?

ही मैमुना बेगाम कोण?

>>> भिंद्रनवाल्या सुवर्णमंदिरात मुळी घुसलाच कसा?

भिंद्रनवालेवर १९७९ मध्ये एका निरंकारी नेत्याच्या हत्याप्रकरणी पकडवॉरंट निघाले होते. अटक टाळण्यासाठी तो सुवर्णमंदीरात जाऊन बसला. सुवर्णमंदीराची मालकी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडे असल्याने तिथे कोणी रहायचे हा निर्णय या संस्थेकडे होता. तिथे पोलिसांना प्रवेश करण्याची बंदी होती (भारतात हिंदूंची मंदिरे वगळता इतर सर्व धर्मस्थळांमध्ये पोलिस अथवा सैन्याला जायला बंदी आहे. कारण त्यांच्यामुळे म्हणे तिथले "पावित्र्य" भंग पावते !).

भिंद्रनवालेने बंदूकीच्या धमकीवर तिथे मुक्काम ठोकला होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिस पाठविण्याची कॉन्ग्रेस व अकाली दल सरकारची हिम्मत व इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळे तो तिथे सुखात रहात होता. १९८० ते १९८४ दरम्यान शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. सरकारच्या निष्क्रीयपणामुळे इतर राज्यांतील जनता संतप्त झाली होती. त्यामुळे व ५-६ महिन्यांनी होणार्‍या निवडणुकात फायदा मिळविण्यासाठी इंदिरा गांधींनी सुवर्णमंदीरात सैन्य पाठवून भिंद्रनवालेला मारले. पण झाले ते योग्यच झाले.

मी वर उल्लेख केलेला फ्रिमोन्ट गुरुद्वारा मधला लंगर हॉल (पूर्ण गुरुद्वाराही असेल तरी नवल नाही) भिद्रनवालाच्याच नावाने आहे :(.
स्मृति प्रित्यर्थ कार्यक्रम ही असतात तिथे बघा इथे अपकमिंग इव्हेंट्स जुन ६ मधे
http://www.fremontgurdwara.org/events/default.asp?Day=June&Topic_Random_...
या फेसबुक पेज वरही दिसतील काहीबाही पोस्ट्स
http://www.facebook.com/GurdwaraSahibFremont
हे खुद्द भिद्रन्वाला साठी फेबु पेज, गुरुद्वर तर्फेच बनवलय बहुदा
http://www.facebook.com/GurdwaraSahibFremont#!/pages/Sant-Jarnail-Singh-...

मास्तुरे,

१. कारवाई केली हे योग्यच आहे. पण वेळ विचित्र का निवडली? कारवाई मुद्दामहून गर्दीच्या वेळी का केली? केवळ हिंदूंचा अपमान करावा म्हणून की काय? कॉंग्रेस सरकारने रेडक्रॉसला आत जायला परवानगी नाकारली. किती लोक मेले गणतीच नाही. बरेच निरपराध लोक मेले असणार हे उघड आहे! जनरल वैद्यांना याची कल्पना असायला हवी.

२, मैमुना बेगम हे इंदिरा गांधीचं खरं नाव आहे.

३. भिंद्रनवाल्या अकाल तख्तात घुसला ते मैमुना बेगमेच्या पाठिंब्यावर. त्याला मोठा तिनेच केला. आठवतंय तिला जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रवेश नाकारला होता ते? तिथल्या पुजार्‍याला बरोबर माहीत होती तिची पार्श्वभूमी. भिंद्रनवाला जर स्वत:ला थोर संतबिंत म्हणवून घेतो, तर इंदिरा गांधीचं खरं रूप त्याला ठाऊक नव्हतं? म्हणजे भिद्रनवाला खोटारडा आहे, केवळ धाकदपटशा दाखवतोय. सांगण्याचा मुद्दा काय आहे की एक मुस्लीम बाई शीख बांधवांना भडकावते आणि त्याची जबाबदारी मात्र भारत हिंदुबहुल सरकारवर म्हणजे हिंदूंवर येते. हा तमाशा उघड करायला हवा.

क.लो.आ.
-निनाद

मैमुना बेगाम कोण? Happy Rofl

मैमुना की मैमुनिसा बेगम असे इंदिरा गांधींचे फिरोज खान यांच्याबरोबर लग्न झाल्यावर नाव बदलले होते म्हणे.

त्यानंतर राजीव गांधीनी लग्न करताना ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांची मुलं राहूल आणि प्रियांका.. खरी नावे रॉल आणि बियांका आहेत. नावात बदल फक्त हिंदुसदृश्य नाव दिसावे म्हणून केला आहे म्हणे.

बराच गोंधळ आहे त्यात...
http://www.vepachedu.org/Nehrudynasty.html

आज ऑपरेशन ब्लू स्टारला बरोबर ३० वर्षे पूर्ण होतील, त्या निमित्ताने हा लेख आठवला आणि परत तितकाच आवडला. गेल्या डिसेंबरात सोलापूर-औरंगाबाद हायवेवर माझ्यापुढे चाललेल्या एका ट्रकवरचा हा फोटो, अजून काय लिहावे?photo0239.jpg

आज ऑपरेशन ब्लू स्टारला बरोबर ३० वर्षे पूर्ण होतील, त्या निमित्ताने हा लेख आठवला आणि परत तितकाच आवडला. गेल्या डिसेंबरात सोलापूर-औरंगाबाद हायवेवर माझ्यापुढे चाललेल्या एका ट्रकवरचा हा फोटो, अजून काय लिहावे?photo0239.jpg

जेह्वा सुवर्णमंदिराला आणि जालियनवाला बागेला सद्ध्याच भेट दिली होती, तेह्वा मला तुझा हा लेख फार आठवला होता.

Pages