होऊ शकेल कधी निचरा सार्या वाईट गोष्टींचा ???

Submitted by Diet Consultant on 29 May, 2011 - 13:31

हे जीवन सुंदर आहे ....... ! हे स्मिता तळवलकरच किती सुंदर गाणे ! कधीतरी याच नाण्याची दुसरी बाजूपण दिसते. माणूस मोठा होतो ; घरापासून शाळेपासून ऑफिसातल्या कामात गुंततो. आजुबाजूच वातावरण बदलत , आजूबाजूचे लोक बदलतात. मित्र -मित्र म्हणणारा कधी पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याच गुपित आई ला सांगतो, कधी ऑफिसात चुगल्या करतो. कटकटी असतात ; सगळीकडेच. पण वयाबरोबर , आपल्या यशाबरोबर हि कटकटीनची तीव्रता वाढत जाते.
गम्मत आहे ! आपले आई बाबा , आप्तजन, आपल्या शाळेतल्या बी सारे जण असताना आपल्याला जपले जाते हळुवार तळहाताच्या फोडासारखे. आणि नाण्याच्या दुसर्या बाजूची सुरुवात होते ; so called " मोठ झाल्यावर " .. !
तस म्हणलं तर प्रत्येकाला एकमेकांची गरज असते. कोणीतरी कोणालातरी त्रास देत असत. कोणीतरी कोणाचा तरी खांदा शोधत असतं. मग त्रास देणारेच खांदा देणारे का नाही होऊ शकत ? त्रास देणार्यांना असा वागण्यास कोण प्रवृत्त करते? यशाची अतिरिक्त हाव , सौज्ञा हरविलेले यश शोधण्याची व्यर्थ धडपड , चुरस , इगो, पायखेची मनोवृत्ती, दडपण , एकाकी पण , व्यसनाधीनता , सारासार विचार करण्याची क्षमता हरविणे, गैर मार्गाने विचार करणे.... आणि बस ! चक्र सुरु !
केवळ मनातून स्वच्ह राहिल्याने जगातील कित्येक हृद्य विकार टाळतील, माणूस मन्सासची माणसासारखा वागल्याने तणाव, दडपण आणि कित्येक मनोविकार टाळतील. काम करणे आनंदमय होईल , एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद द्विगुण करता येईल.
तम वृत्तीच्या , वाम मार्गाला लागून आपण स्वतः आपल्या आयुष्याचे नुकसान करीत आहोत. कोणी वाचलच हे लिखान , पटलच यातलं काही, तर सुरुवात करावी स्वतः पासून.
मनाशी म्हणून नका, असा वागला तर आमचा टिकाव कसा लागणार ! Define your definition of Success . कोणी वाईट वागल्यास आपण टिकाव धरू शकणार नाही असे वाटले , तर तोलावे स्वतःला आणि अपेक्षांना. बघावे समाधान . योग्य मार्गांनी मिळविलेले अमुक एक माझ्यासाठी समाधान कारक आहे ; हे जर कोणाला वाटलं तर मला नक्की कळवा.
असा एक प्रामाणिक रिप्लाय ; हे खरे यश असेल.

- केतकी इतराज

गुलमोहर: 

छान. अजुन लिहा. आहार , आरोग्य सेक्शनमध्ये लिहाल तर लेख एकत्र राहतील.

पण तुकोबारायाने सागितलय..."नाठाळ्याच्या माथी हाणावी काठी" त्याचे काय ?.... उत्तर अपेषित....

@ जगमोहन : धन्यवाद आपल्या सजेशन बद्दल. मधुमेह आणि आहार नामक एक सधर मधुमेह ग्रुप मध्ये लिहिले आहे. प्रतिसाद स्तुत्य असेल.
@ त्रीमुती : आपली तत्व आपल्याला श्रेष्ठ बनवितात. आपण इतका उंचीवर असावं; कि कोणाला हिम्मत होता नये वाईट मार्गे आपल्या वाटेला जायची. उदा.
मोठ मोठ्या अधिकारपदी वाईट माणसांच्या जागी चांगली माणसे असावीत ; आणि त्यांच्या चान्गुल्प्नापुढे वाईट करण्याची हिम्मत च न व्हावी... !

- केतकी इतराज

http://aayushyaa-ketkiitraj.blogspot.com/

केतकी छान लिहिलेय्..आहाराबद्दल अजुन माहिती वाचायला आवडेल. असो आपल्या विपूत एक निरोप टाकला आहे...

** सर्व वाचकांना नम्र विनंती : मी गुगल मराठी लिंक वरून लिहिते. त्यात शुद्ध लेखनाच्या बर्याच चुका असतात. याची मला जाणीव आहे. तरीकृपया समजून घ्यावे.
- केतकी

चांगला लेख. पुलेशु Happy

मी गुगल मराठी लिंक वरून लिहिते. त्यात शुद्ध लेखनाच्या बर्याच चुका असतात. याची मला जाणीव आहे. तरीकृपया समजून घ्यावे.>>>>

त्यापेक्षा इथेच लिहायचा प्रयत्न करुन पाहा. गुगल मराठीपेक्षा ड्रुपल / गमभन हे खुप सोपे आणि चांगले आहे. Happy

@ विशाल .... इथे मुळीच चं लिहिता येत नाही. धन्यवाद सजेशन बद्दल आणि अभिप्रायाबद्दल.

माणूस मन्सासची माणसासारखा वागल्याने तणाव, दडपण आणि कित्येक मनोविकार टाळतील. काम करणे आनंदमय होईल , एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद द्विगुण करता येईल.>>>>
छान विचार आहेत !:स्मितः:

@ आश्विनी मामी : प्रुफ रीडिंग म्हणजे नक्की काय करणार ? मी माझ्या स्वतःच्या आयुष्यातील काही अनुभवांबद्दल चे माझे विचार आणि माझ्या मनाचा आवाज लिहिते !
तुम्ही संगाच आपण अजून कस- काय करणार अजून प्रुफ रीडिंग !

@ अनिल ७६ : खूप धन्यवाद ! मला जाणवले खरचं ; मोठी माणसे > कचेरी>कामाचा तणाव ... आपला असो किंवा दुसर्याचा ; याला हेच महत्वाचे कारण आहे. ज्या अर्थी तुम्ही विशेष करून हे हाय-लाईट केलेत ; तुम्हाला हे पटले असणार थोडेफार. पुन्हा धन्यवाद !