सावधान मायबोलीकरांनो (रिलोडेड)

Submitted by पल्लुप्रेमी on 27 May, 2011 - 21:22

मी काही लेखक नाही. पण तरी एक छोटासा प्रयत्न.
चाफा माफ करा, पण मी सुद्धा तुमचा फॅन आहे. बर्‍याच दिवसां पासुन तम्ही मायबोली वर दिसला नाहित. त्यासाठिच तुम्हाला ही एक हाक.
त्यासाठी तुमचिच कथा मटेरिअल म्हणुन वापरतोय.
****
वाचकांनी हलकेच घ्यावे ही विनंती.
****

"चायला काय कटकट आहे?" म्हणत मी लॅपी शट डाउन केला आणि सहज फेर फटका मारावा म्हणुन मी रात्री ११:४५ ला बाहेर पडलो. खुप दिवसां पासुन मी मायबोली मधिल कथा वाचतोय. पण प्रतिसाद देणे जमत नव्हते. म्हणुन मायबोली वर अकाऊंट उघडन्याचा प्रयत्न चालु होता. पण इन्टरनेट साथ देत नव्हते.

मस्त फेरा फटका मारुन रात्री १२:१० आलो आणि कुलुप उघडलं. समोरचे द्रुश्य बघुन मी हादरलो. रूम मधे कुणिच नसतांना लॅपटॉप सुरु केला कुणी? मी रूमचे निरीक्षण केले. पण कूणिच दिसे ना. आता माझी पाचावर धारण बसली. तरी मी मनाची समजुत काढली की लॅपटॉप चालुच राहिला असेल. झोपायचे म्हणुन बंद करण्यासाठी लॅपटॉप कडे नजर वळविली. स्क्रिन वर मायबोलीची साईट ओपन होती व त्यावर एक मानवासारखे पण पाया च्या जागी शेपटा सारखे असलेले छायांक दिसत होते. आता माझी घाबरण्याची पाळी होती. अचानक त्याने मानवी रुप धारण केले. पण तेही भितिदायक होते. त्याचे ते लाल चमकणारे डोळे बघुन मला माझे मरण जवळ दिसु लागले. मग विचार केला की एवी-तेवी मरायचे आहेच तर धिटपणे मरणाला सामोरे जावे.

तोच त्याचा एखाद्या स्त्री सारखा आवाज आला "मायबोली वर प्रवेश करु नकोस."

त्याचा तो आवाज एकुन मलला ते वेताळ गंमतिदार वाटले
"का बरं? मी तर खुप वेळचा प्रयत्न करतोय." मी जारा धिर धरुनच विचारले

"कारण इथे आता आमचे राज्य आहे. नवीन आय डी ना इथे प्रवेश घेउच देत नाही."

"का?"

"कारण आता ते आमच्या मर्जीत आहे."

"क क क का?" माझा थरथरलेला आवाज

"कारण तो आता आमच्या असतित्वाचा प्रश्न आहे."

"असतित्वाचा प्रश्न?"

"होय असतित्वाचा प्रश्न."

"तो कसा?"

"आयला तो चाफा आय. डी. आहे ना तो तर घाबरतच नाही कोणत्याच भुता बिताला."

"बिताला?"

"हो बुताला आय मिन भुताला. लेकाने भुतांची कॉमेडी सिरियलच चालु केली होती. कोणीच आम्हाला घाबरायला तयार नाही." तो आवेगाने बोलत होता.

"होय चाफ्या ने त्याविषयी लिहिलं होतं, मी वाचलय. पण काय हो लोक तुम्हाला घाबरत नाही त तर तु तुमचं काय जातं हो?"

"लेका ज्या गोष्टीसाठी मेलो तिच गोष्ट साधली नाही तर काय फायदा? तेव्हा बरयाच मिटींग्स घेतल्या. आणि या आय. डी. ना घाबरवण्यासाठी आमच्यातिल मेंबर्स पठविले. पण सगळी अपयशी. मग ठरलं की ह्या चाफ्यालाच त्याच्या न घाबरवण्या कथा बंद करायला लावायचे. त्यासाठी त्याच्याकडे एक ब्रम्हराक्षस पाठवलं. तर तो त्याला चहा, कॉफ़ी कोल्डींक्स वगैरे चं विचारु लागला. ब्रम्हराक्षसाला मुळिच घाबरला नाही. का तर म्हणे--'घाबरायच काय त्याच्यात, भुतांसारखी भुतं तुम्ही. झपाटण्याशिवाय काय करणार?' बरिच भूते भ्रमिष्ट, झपाटल्या गत झाली."

"अनेक भुतांचे हाल झालेत म्हणे." मी हसायला लागलो

"आता हसुन काहि उपयोग नाहि. कारण तुमच्या लिडरला 'चाफ्यालाच' ताब्यात घेतलय. त्याच्याकडे एकाचवेळी ४ भुते, २ हडळी, १ ब्रम्हराक्षस आणि २ वेताळ पठविले होते. तो तर त्यांचाही पाहुनचार करायला निघाला होता. पण एका बेसावध क्षणी त्याला पकडले आणि एका जादुइ दिव्यात कैद केले. आता काम सोफे झाले होते. आम्ही बाकिच्या आय डी ना झपाटायला निघालो. पण झाले उलटेच.

भुतेच भुतांमधे राहिली नाही. कुणी शायर झाले, कुणी चित्रकार झाले, कुणी कुक झाले, कुणी प्रेमकवि झाले, कुणी चक्क जिम इनस्ट्रकटर झाले. पण एकही आय डी घाबरली नाही.

त्या ‘प्रिंसेस’ कडे या वेळी मला पाठविले होते. तिच्या चायनिज फ़्राईडराईस च्या चिकट गोळ्या बद्दल माला ठाउक होते. यावेळी तिने मला एक सरबत दिले. मी तिला सागिंतले की मला तुझ्या रेसिपी घेउन माझा गाळा बंद करायचा नाही. तर ती म्हणाली 'ह्या सरबताने गळा साफ होतो.'
चायला त्या सरबताने माझ्या गळ्यातला आवाजच साफ केला. आता चांडाळ हडळी चा आवाज उधार घेउन बोलावे लागते."

"म्हणुनच तुमचा आवाज बाई सारखा आय मिन हडळी सारखा येतो." मी

"ते जाउ दे.आता समजले का नवीन आय डी ना इथे प्रवेश घेउच देत नाही ते? आरे लेका जुन्याच आय डी आम्हाला भारी पडतायेत. पण चाफा आता जादुइ दिव्यात बसला असेल कथा लिहित. लिहित बस म्हणा किती लिहायचय ते. पण जर निघाला तर आम्हा भुतांची खैर नाही. चल मी जातो उजेडनार आहे आता." असे म्हणुन निघाला.

इतक्या वेळात मी मायबोली वर प्रवेश केलेला होता, हे त्याला काळलेच नाही

तेव्हा सावधान मायबोलीकरांनो भुतांचा मायबोली वरिल वावर वढलाय.

आता एक नजर कवठीचाफा यांच्या वाटेकडे लागलेली आहे, जादुइ दिव्यातुन परत मायबोलीवर केव्हा परत येतिल? आशा आहे येतिल तेव्हा सोबत खुप कथां/कादंबरीं चा साठा असेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आता एक नजर कवठीचाफा यांच्या वाटेकडे लागलेली आहे, जादुइ दिव्यातुन परत मायबोलीवर केव्हा परत येतिल? आशा आहे येतिल तेव्हा सोबत खुप कथां/कादंबरीं चा साठा असेल.>>>>>>>> अनुमोदन Happy

आता अशीच मोहिम बाकीच्या आय्डीसाठीसुद्धा काढा... Happy

प्रयत्न आवडला...

आता एक नजर कवठीचाफा यांच्या वाटेकडे लागलेली आहे, जादुइ दिव्यातुन परत मायबोलीवर केव्हा परत येतिल? आशा आहे येतिल तेव्हा सोबत खुप कथां/कादंबरीं चा साठा असेल.>>>>>>>> अनुमोदन Happy

चिमुरी, सांजसंध्या, जिप्सी

धन्यवाद

चिमुरी,

मोहिम! बापरे, मराठीत टाइप करतांना किती हात दूखतात.आणि मोहिम. तस करायला मजा आली असती. पण
एक अक्षर टाइप केला तर तेच अक्षर ३ वेळा टाइप होतो.
हे बघा हे असे.

हहेए बबबघघा हहेे अअसससे.

आता एडीट करुन लिहायला किती त्रास.
एक वाक्य लिहायला ३० ते ४० सेकंद आणि कधी तर १ मिनीट लागतोय
मराठी टायपिंग चे काही चांगल सॉफ्टवेअर आहे का? असेल तर सांगा हो.