माझी पण लव्ह इष्टोरी...

Submitted by सुनिल जोग on 27 May, 2011 - 05:11

मी नुकतात 'गावातून' शहरात आलो. चांगली नोकरी वगैरे लागली आणि ऑफिसमधे,नातेवाईकांच्यात चढाओढ लागली माझे २चे ४ हात करण्याची. मी पण हिंदी पिक्चर्स बघू लागल्यामुळे स्वतःला हिरो वगैरे समजू लागलो होतो.
आणि ऑफिसला जाण्यासाठी 'अलका' टॉकिज जवळ स्टॉपवर उभा असताना आसपास्च्या इतर कंपन्यांच्या 'हिरवळी' कडे उनाडपणे लक्ष जाउ लागले. एका लक्ष्यावर 'आखों आखोमे बात होने दो' इतपत मजल मारली. आणि आता आज विचारू - उद्या विचारू करत रात्र रात्र जागरणे होउ लागली. ती देखील नजरेने साथ देत होती हे आता स्टॉपवरील मेजॉरीटी च्या लक्षात येउ लागले होते पण प्रथम पाऊल कसे काय उचलायचे शिवाय परक्या शहरात वाचवण्यासाठी कोणीच नव्हते. शिवाय हे 'प्रताप' गावात कळले तर तिथेही 'दिवे लावले काय पोट्ट्याने ' हा शेरा ऐकावा लागणार होता या बॅकग्राऊंडवर धीर होत नव्हता. ती देखील ओठांच्या कोपर्‍यातून हसुन दाद देत होती.
आणि अचानक ती दिसेनाशी झाली. वाटले विकेट पडली. मग मी डिटेक्टीव्हगिरी केली. घराचा शोध लावला आणि कळले तिच्या कंपनीत लॉकआउट डीक्लेअर झाल्यामुळे ती येत नव्ह्ती. मी देवाचा धावा सुरु केला देवा लॉकआउट लवकर उठव. झाले १० दिवसानी तो उठला. ती ताज्या फुलासारखी येउ लागली मी देखील खुश झालो. शेवटी सारा धीर एकवटला आणी संद्याकाळी तिला रस्त्यात अडवून विचारणा केली. ... एक्स्यूज मी ... मला थोडं बोलायचं आहे...भेटू या का ?
ती: बोला
मी: इथं ?
ती : मग कुठं हॉटेलात ?
मी: हो
ती : तेव्हढा वेळ नाहिये
मी: मग..
ती: इथच काय ते सांगा ना
मी : अहो, मी.. म्हणजे... मला..
ती: अहो लवकर बोलाना
मी: म्हणजे मी तुमच्याशी लग्न करू इछीतो.. इफ यु डोण्ट माईंड
ती: ती खळाळून हसली.
अहो मी खूप दिवस वाट पाहीली तुम्ही विचाराल म्हणून शेवटी..लॉकआउट झाला म्हणून गावी गेले तर बाबानी ठरवून टाकले सारे.. थोडं आधी तरी विचारायचत?
मी: काँग्रॅट्स
ती: बाय
मी एकदम देवदास मूड पकडला.. दोन दिवस सिगारेट्स झाल्या आणि काही काळानंतर पुन्हा एकदा स्टॉपवर उभा राहू लागलो. ती आता येइनाशी झाली होती. एक लव्ह ष्टोरी खुलता खुलता बंद पडली होती.

गुलमोहर: