सर्कस

Submitted by bnlele on 25 May, 2011 - 21:42

सर्कस

आठवणीं उजळण्याला कांही निमित्त लागतेच असे नाही;सहजच येतात आणि ओघात गुंता सुटत जातो.

लहानपणी घराजवळ मोठ्ठ गोल मॆदान होते.कधीकाळी तिथे बाजार भरत असावा म्हणून गोलबाजार असे नांवच पडले होते. मॆदानाच्या परिघाचा गोल रस्ता आणि त्या भोंवती सुखवस्तू कुटुंबियांचे प्रशस्त बंगले. कुंपणाच्या भिंतींच्या आत रंगीबेरंगी फ़ुलांची रोप आणि वेली.दोन किंवा तीन बंगल्यांना विभागणारे सार्वजनिक रहदारीचे रस्ते.

भव्य लोखंडी प्रवेशद्वार येणार्या-जाणार्यांसाठी उजाडल्यापासून उशिरा रात्रीपर्यंत उघडेच असायचे.आजच्यासारखे चोराचिलट्य़ांचे भय नव्ह्ते.अधिक कुटुंबे मराठी - डॉक्टर,वकिल,प्राध्यापक इ.

मॆदानात एका बाजूला मोठ्ठ कवठाच आणि दुसर्या बाजूला कदंबाचे असे दोनच वृक्ष फळांनी आणि फुलांनी सदॆव बहरलेले. कांही भागात स्वॆर उगवणारे गवत. पण मधोमध एका सधन व्यावसायिकाने हॊशी मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी उदारपणे करून दिलेली खेळपट्टी होती. गवत कापणारे कुणी कधिच दिसले नाही.मुक्त चरणारी खेचर-गुरंच सहकार्य करायची. वृक्षांवरच्या घरट्यांतले कावळे अन् घारी उजाडताच आकाशात घिरट्या घेऊन दूर निघून जायची.उलटी लट्कलेली वटवाघुळंच हलका लालिमा पसरु लागला कि मिटल्या डोळ्यांनी ते दृष्य टिपायची.

त्या मॆदानात सकाळी अन् संध्याकाळी तात्पुरता भगवा रोवून शाखा लागायची. अधुनमधुन प्रदर्शन भरायचे. प्रवेश मुक्त ही सोय.विविध वस्तूं-खाद्यपदार्थांचे स्टॉल, आकर्षक रोषणाई,मॊतकाकुवांमधे गरगरणार्या फटफटीचा भेदरवून टाकणारा आवाज, जादूच्या आणि स्वस्त जुगार-खेळांचा स्टॉल असायचे. आणी, अंधार झाल्यावर, ऊंच शिडीवरून स्वतःला पेटवून खालच्या विहिरीत उडी टाकणारा शूरमर्द अजून स्मरणात आहे.

मॆदानात क्वचित सर्कसीचा तंबू पडायचा.तो उभा होई पर्यंत मुले मोकळ्या जागेत गिल्ली-दंडा खेळायची.तंबूच्या बाहेर शिकारखान्याचे पिंजरे आले कि खेळ बंद.तासन्तास प्राणीच बघत.प्रत्यक्ष खेळांत दिसलेल्यांची ओळख पटतेकां ते पाहण्याचाच छंद. डरकाळी ऎकून घ्रराकडे धूम ठोकायची.

दप्तर घेऊन शक्यतो आधिच शाळेला निघायच आणि शिकारखान्याशी रेंगाळायच असा नित्यक्रम. सायकल चालविणार्या माकडापेक्षा वाघ,सिंह,चित्ता आकर्षक.काय ते सॊष्ठव,शक्ती आणि ती आयाळ !

सहजच आठवलं म्हणालो ते खरं नसल्याचे आता उमगल. सर्कसीतले वाघ-सिंह कधितरी म्हातारे होणार हे नव्याने जाणवले. एकेकाळी शरीर-बुद्धीचे कमावलेल सॊष्ठव आणि सॊंदर्य उतार वयात हलके-हलके कमी झालेल पाहून मनांत उमटले ते आठवणींचे स्वर. आयुष्यभर केली सर्कस आठवणींच्या गुंत्यातून बाहेर पडली.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सर्कसीतले वाघ-सिंह कधितरी म्हातारे होणार हे नव्याने जाणवले. एकेकाळी शरीर-बुद्धीचे कमावलेल सॊष्ठव आणि सॊंदर्य उतार वयात हलके-हलके कमी झालेल पाहून मनांत उमटले ते आठवणींचे स्वर. आयुष्यभर केली सर्कस आठवणींच्या गुंत्यातून बाहेर पडली.

...................................................................!!

सिंह म्हातारा झाला म्हणुन त्याचा रुबाब कमी होत नाही काका !
सध्या कुठे असता ? बडोद्यातील माझ्या एका स्नेह्यांना तुमच्याशी ओळख करुन घ्यायची आहे ?

ही सर्कस फारच छोटी होती, वाचायला सुरुवात करतो न करतो तोच संपली सुद्धा, जरा मोठी पायजे बॉ. हवे तर संपादन करून नवा खेळ लावा. अन या सल्ल्या साठी मोफत पास तर मला तुम्ही द्यालच Happy

मला ही छान वाटली आयुष्याची सर्कस... वर्णन त्रोटक वाटतंय पण.. थोडं विस्तृत लिहिलंत तर अजून मजा येईल.. Happy