त्याचा घामेजलेला तणावग्रस्त चेहरा...
आणि मांडीवर आखरी साँसे गिननारा रक्तबंबाळ इसम...
बॅकग्राऊंडला कारूण्याची परिसिमा गाठलेली म्युजिक...
मृत्यूच्या दारी उभा असलेला (परंतू आता मात्र त्याच्या मांडीवर आडवा झालेला) तो इसम काही रहस्यभेद करू पाहतोय. (केवळ तेवढ्यासाठीच 'दिग्दर्शक' नावाच्या परमेश्वराने त्याच्या शरीरात प्राण फुंकलेत.)
उत्सुकता टिपेला पोहोचलीय.
आणि......
जसा सिनेमात अचानक पाऊस सुरू होतो, तसा "बदले की आग" असल्या भयंकर नावाच्या या चित्रपटातील प्रसंगादरम्यान जाहीरातींचा पाऊस सुरू झाला.
उत्सुकतेने प्रसरण पावलेला माझा चेहरा कमालीचा आकुंचन पावला.
वास्तविक तेव्हा माझा हात रिमोटकडे वळणारच होता.... पण म्हटलं, दूसरं चॅनल पाहता पाहता तो इसम करणार असलेला रहस्यभेद चूकला तर...
परिणामी मी रिमोटला शेजारीच तिष्ठत ठेवत जाहीराती पाहण्याचा निर्णय घेतला.
जाहीराती तर काय वर्णाव्या?
गाडी बंद पडल्यामुळे त्या तरूणाच्या घरी राहण्याची विनंती करणारी तरूणी आणि एकच रूम असल्यामुळे त्या तरूणाच्या मनात फुटणारे दोन लाडू.. ती डेरी मिल्क शॉटची जाहीरात.
एक सेल्सगर्ल लावा मोबाईल वापरणार्या "बाप्या"ला चेंज म्हणून कंडोमचं पाकीट च्युईंगम द्यावे, इतक्या निर्विकारपणे देते. ती 'सेप्रेट मेन फ्रॉम द बॉईज' म्हणणारी लावा मोबाईलची जाहीरात.
रेस्टारंटमध्ये 'गधे का भर्ता' म्हणून गुडांना पुरता चोपणारा अक्षय कुमार "खाना काफी अच्छा बना लेते हो" या त्या तरूणीच्या प्रश्नावर "होम डीलीव्हरी भी करता हुं" असलं दादा कोंडके शैलीतलं आचरट उत्तर देतो.. ती 'फीट है बॉस' म्हणणारी डॉलर क्लबची जाहीरात.
या असल्या जाहीराती पाहून मी त्या "बदले की आग"वर पाणी सोडण्याच्या निर्णयाप्रत पोहोचलो.
कहर म्हणजे...
एक बिकनीतली पाण्याने चिंब भिजलेली तरूणी समुद्रातून बाहेर येते.
त्याक्षणी मला 'हाऊसफुल्ल' या हिंदी सिनेमातला तो सिन आठवलाच..
त्यात समुद्रातून बिकनीतली जिया खान बाहेर येतेय.
अक्षय कुमार : लाज... शरम.... गहना...
चंकी पांडे : इन तीनोंमे से उसने कुछ नही पहना..
मी गेस करू लागलो की, ही जाहीरात कसली असावी? साबणाची, कुठल्या क्रीमची की त्या बिकनीची तर नाही?
पण जेव्हा कळालं तेव्हा मात्र माझ्या 'गेस'चा 'भडका' उडाला. ती जाहीरात जे के नामक सिमेंटची होती.
ओ "माटी के पुतले"
इतना ना कर तू गुमान
या रफीसाहेबांच्या गाण्याला छेद देत त्या जाहीरातील "सिमेंट की मुरत" असलेली ती तरूणी आणि त्या सिमेंटचं असं काहीसं संबंध जोडून मी मोकळा झालो.
प्रत्येक जाहीरातीत एखादी तरी सुंदर तरूणी असावीच, असा जाहीरातकर्त्यांचा अलिखित नियमच असावा बहूधा.
बाथटबात बसून अंगावर मोरपीस फिरवावे इतक्या हळूवारपणे साबण लावणे असो, चेहर्यावर वासनिक अविर्भाव आणून 'ये तो बडा टॉईंग है' म्हणणे असो, फेअर अँन्ड लव्हली किंवा गार्निअर असल्या तत्सम क्रीम लावून सात दिवसांत गोरं होणं असो, मोटरसायकलवर मागे बसून आपल्या प्रियकराचा लाडीकपणे कान चावणे असो, किंवा अगदी दाढी केलेल्या तरूणाच्या गालावर हात फिरणे असो. जाहीरातीत सुंदर तरूणी नसेल तर "माला"चा खप होणारच नाही, असा प्रोडक्ट मालकांचा "ग्रह" असावा आणि तरूणी असाव्यातच असा "आग्रह" देखील असावा.
अॅक्से, झटॅक असल्या डिओ/बॉडी स्प्रे च्या जाहीराती तर 'शौकीन" टिव्ही प्रेक्षकांचे डोळे सुखावण्याचं काम यथासांग करीत आहेत.
मी तर गोरं होण्यासाठी नव्हे पण कधीतरी आपल्याला सोन्याचं नाणं मिळेल या एकाच आशेवर लक्सची डझनभर साबणे वापरतो. पण आजतागायत खांबातून नरसिंहाने दर्शन द्यावे, त्याप्रमाणे एकाही साबणातून मला सोन्याच्या नाण्याने दर्शन दिलेलं नाही.
एखादं सोन्याचं नाणं सापडलं असतं तर माझा चेहरा सात दिवसांत नाही तर क्षणांत "उजळला" असता.. आणि लक्सच्या त्या जाहीरातील सात दिवसांत उजळण्याचा संदेशही साध्य झाला असता.
परवाच आमच्या ऑफीसातील मिसेस सिन्हा तिच्या 'जवळच्या' मैत्रिणीला सांगत होती, "अगं काल तर हद्दच झाली बाई..!"
"काय झालं?" मैत्रीणीच्या तोंडाचा झालेला चंबू पाहण्याजोगा.
"अगं काल ते मला चक्क हडळ म्हणाले..!" हे म्हणताना त्याक्षणी मिसेस सिन्हानी असा चेहरा केला की 'हडळ अशीच दिसत असावी' याबद्दल माझी खात्रीच झाली.
"काय सांगतेस?" दूसर्या हडळीची कंपल्सरी वाटावी अशी प्रतिक्रीया.
"हो ना..! जेव्हा ते देशी पिऊन यायचे तेव्हा मला 'पारो' म्हणायचे. अलीकडे बीयर पिऊन येतात तेव्हा मला 'डार्लिंग' म्हणतात." मिसेस सिन्हाने आपल्या दारूड्या नवर्याकडून होणार्या कौतूकाचा पाढा वाचला.
"मग काल ते तूला हडळ का म्हणाले?" मैत्रीणीने दोन्ही खांदे उडवत प्रश्न केला.
"काल ते स्प्राईट प्यायले असावेत. स्प्राईट... सीधी बात नो बकवास. क्लियर है..!" मी जाहीरातींबद्दलचं माझं ज्ञान पाजळलं.
यावर मिसेस सिन्हा आपले मोठ्ठाले डोळे आणखी वटारून आणि बुब्बूळे डोळ्यांच्या ऊर्ध्व दिशेला नेवून माझ्याकडे पाहू लागल्या. त्या नजरेतील निखार्यांनी जळून खाक होण्याआधी मी तिथून पळ काढला.
शेवटी "पार्ले"कर म्हणतात ना... "जी" माने 'जीनीयस'..!
अवांतर : जाहीरातींचा प्रेमी-युगूलांच्या प्रेमसंवादावर झालेला प्रभाव..
तो : प्रिये, कोको कोला प्यायल्यावर मला काहीतरी करावसं वाटतं...
ती : मग कर ना...
.
.
.
.
.
.
तो : बर्रर्रर्रर्रर्र...~~~
* * *
मस्त लेख हे असं आपल्याला
मस्त लेख
हे असं आपल्याला अजिबात आवडत नाही ...म्हणून सरळ फ वाहीनी लावून बसतो
कालच आमच्या गॄपमधे आचरट आणि
कालच आमच्या गॄपमधे आचरट आणि फालतु जाहीरातींवर भलं मोठं चर्चासत्र झालं आणि आज हा लेख... काय योगायोग आहे...
..
..
तो : प्रिये, कोको कोला
तो : प्रिये, कोको कोला प्यायल्यावर मला काहीतरी करावसं वाटतं...
ती : मग कर ना...
.
.
.
.
.
.
तो : बर्रर्रर्रर्रर्र...~~~<<<
बर्रर्रर्रर्रर्र...~~~
बर्रर्रर्रर्रर्र...~~~
मस्ताय रे
छान लिहिलंय. एखाद्या अॅडसाठी
मीही खूप वर्षांपासून हाच
मीही खूप वर्षांपासून हाच विचार करायचो की च्यायला सिमेंट, पंखे, टू व्हीलर, मोबाईल, प्रत्येक जाहिरातीत एखादी बाई अशीच का दाखवतात?
फारच आवडला हा लेख! अनेक विनोद उत्तम वाटले. धन्यवाद!
^^^^^^ मीही खूप वर्षांपासून
^^^^^^
मीही खूप वर्षांपासून हाच विचार करायचि की......
चुकून आयडी चुकला का ?
ओ आणि आय शेजारी असतात. सपादीत
ओ आणि आय शेजारी असतात. सपादीत केले.
निर्जंतुक जंतु, ते 'बाई' वाचून झालं असावं बहुधा!
जाहिरात कोणतीही असो बाईविना
जाहिरात कोणतीही असो बाईविना (मॉडेल) अपुर्ण आहे
कारण त्या काहीही करायला तयारच असतात
बाकी भन्नाट
सेम हिअर अॅक्च्युअली.. टायपो
सेम हिअर
अॅक्च्युअली.. टायपो का असं मला विचारायचं होतं
छान आहे.. आवडला.. अजून
छान आहे..
आवडला.. अजून बर्याच जाहिराती राहिल्या पण.. मध्यंतर लहान होता का.. 
लक्स मधलं सोन्याचं नाणं
लक्स मधलं सोन्याचं नाणं ..इथपासुन पुढे भन्नाट आवडलं. आधीचा धावता आढावा वाटला.
(No subject)
भारीय.
एकंदरीत तुझा प्रश्न जाहिरातीत
एकंदरीत तुझा प्रश्न जाहिरातीत एकच बाई का? हा असावा!
भारी..
भारी..
मस्त जमलाय हा लेख.
मस्त जमलाय हा लेख.
काही जाहिराती म्हटलं तर छान
काही जाहिराती म्हटलं तर छान म्हटल तर जरा वात्रट अशा असतात उदा. ती मोबाइल ची जाहिरात " ...एक सोल्जर की नजरे कभी नीचे नही झुकती."
आभार चिमण
आभार
चिमण
आवडले.
आवडले.
अमित.
अमित.

मला घरातले म्हणतात, ''हा
मला घरातले म्हणतात, ''हा जाहीरात सुध्दा मन लावुन पाहतो."
मस्तच लिहीलय आवडलं
मस्तच लिहीलय आवडलं
दोन वेळा पोष्ट.
दोन वेळा पोष्ट.
पिक्चरमध्ये .. पुढे काय झालं
पिक्चरमध्ये .. पुढे काय झालं हो पण?
छान लेख!
अमित, मस्तच रे
अमित, मस्तच रे !
बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र....
भारी
भारी
सहीच
सहीच
अम्या साल्या शीर्षक वाचुनच
अम्या साल्या शीर्षक वाचुनच खोखो हसलो

छान लिहलंयस
Pages