गोखले इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅड इकोनोमिक्स

Submitted by नितीनचंद्र on 4 May, 2011 - 00:11

माझी मुलगी बी.टेक प्रॉडक्शन झाली आहे. तिला गोखले इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅड इकोनोमिक्स मधुन एम ए इकोनोमिक्स करण्याचा सल्ला मिळाला आहे.

या सल्याचे मुल्यमापन करण्यासाठी गोखले इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅड इकोनोमिक्स येथुन पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मायबोलीकराशी चर्चा करायची आहे.

आहे का कोणी असे मायबोलीकर ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मामाने तिथून एम ए इकोनोमिक्स केलं आहे. त्यांनी कोर्स पूर्ण केल्याला आता २० वर्ष झाली असावीत. पण तेव्हा तरी त्यांचा अनुभव फारच चांगला होता. आता ते पत्रकार आहेत. आणि एका कॉलेजमधे इकोनोमिक्स शिकवतात.

गोखले एकेकाळी भारतातील अग्रगण्य संस्था मानली जायची.
आत्ताची कल्पना नाही. त्यावेळेस गोखले मधून स्नातकोत्तर पदवी घेतलेले माझे मित्रमैत्रिणी आज वर्ल्ड बँकेत, आंतराष्ट्रीय नाणे निधीत, प्रशासकीय सेवेत, पत्रकारितेत, गुंतवणूक बँकांमध्ये कार्यरत आहेत.
अलिकडेच एका २००८ सालच्या गोखलेच्या विद्यार्थीनीशी गप्पा मारल्या. तिच्या मते अजूनही संस्था 'तशी बरी' आहे.