पिडीफ च्या फाईल मध्ये बदल कसे करायचे?

Submitted by हसरी on 1 May, 2011 - 22:46

पिडीफ च्या फाईल मध्ये बदल करायचे असल्यास कसे करायचे?
(font, size असे बदल करुन प्रिंट घ्यायची असल्यास)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

pdftoword.com या साईटला भेट द्या. तुमची फाईल ईथे अपलोड करुन तुमच्य मेल मधे .doc मधे रुपांतरीत फाईल मागवा (फुकट सोय आहे). या .doc मधे हवे ते बदल करा आणि cutepdf च्या सहायाने पुन्हा pdf बनवा. मोफतचा pdf editior माझ्या पहाण्यात नाही, कुणाला माहित असेल तर ईथे जरुर कळवा.

तुमची फाईल ईथे अपलोड करुन तुमच्य मेल मधे .doc मधे रुपांतरीत फाईल मागवा (फुकट सोय आहे).
-------------------------------------------------------------------------------------------------------------
भ्रमर,

हे जरा डेंजरस नाही? जर फाईलमधे प्रोप्रायटरी इन्फो असेल तर?

त्यांचे ऑटोमेटेड प्रोग्राम्स असतात कन्व्हर्जनसाठी. कन्व्हर्जन होऊन इमेल सक्सेसफुली पाठवला गेला की लगेच टेम्प फाइल्स डीलीट होतात.

वर्ड २००७ मधे सेव्ह अ‍ॅज पीडीएफ करता येतं...

यूट्यूब एचडी डाऊनलोडर इथे मिळेल...
http://www.youtubedownloaderhd.com/

रियलप्लेयर अथवा बरीच ऑनलाईन टूल्स डाऊनलोडेड फाईल ही एफएलवी किंवा डब्ल्यूएमवी फॉर्मॅट मधे देतात... त्यात एचडी क्वालिटी मिळत नाही...

हे पाहा - http://www.foxitsoftware.com/pdf/editor/
फक्त या सॉफ्ट्वेअर चा एक तोटा म्हणजे, आपण फाईल एडिट केल्यावर त्यांचा लोगो येतो त्या पानावर. तो पण काहीतरी करून घालवता येतो. मला आत्ता आठवत नाहीये कसा तो लोगो घालवला होता ते.
त्यांचे foxit reader पण चांगले आहे PDF viewing साठी.

हे पण एक सापडले - http://www.nitropdf.com/professional/trial.asp पण माहिती नाही कसे आहे ते.

PDF तयार करण्यासाठी हे चांगले आहे - http://www.bullzip.com/products/pdf/info.php.

मी मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऐवजी ओपन ऑफिस वापरते, त्यात "Export Directly as PDF" असा पर्याय आहे. त्यात मूळ डॉक तशीच राहून एक पीडीएफ कॉपी तयार होते. पण त्यात एक अडचण अशी, की पीडीएफ एडिट नाही करता येत. मूळ वर्ड डॉक एडिट करून पुन्हा एक्स्पोर्ट टू पीडीएफ करावी लागते, म्हणजे मग केलेला बदल पीडीएफ मधे दिसतो.

Use Nitro PDF Professional for this. It converts Doc to PDF and vice versa. I regularly use this software. It is nice and wise. Trial version is also available.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये पण Save As PDF करता येते. त्यासाठी एक अ‍ॅड ईन ईन्स्टॉल करावे लागते.
ईथे ते अ‍ॅड ईन मिळेल http://www.microsoft.com/downloads/en/details.aspx?familyid=4d951911-3e7...