पीडीएफ मध्ये इमेज असेल (स्कॅन्ड टेक्स्ट) तर त्याचे एडिटेबल टेक्स्ट करता येते का ?

Submitted by तृप्ती आवटी on 1 May, 2011 - 22:25

पीडीएफ मध्ये इमेज असेल (स्कॅन्ड टेक्स्ट) तर त्याचे एडिटेबल टेक्स्ट करता येते का ? कसे ? मी पीडीएफ कन्वर्टर वापरुन वर्ड डॉक बनवले आहे. पण त्यात इमेज कॉपी होतेय.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्युमेंट एडिट करता येऊ नये म्हणून पिडिएफ बनवले जाते. विशेषतः कॉन्ट्रॅक्ट वगैरे सारखी डोक्युमेंटस जेव्हा ते दोघांमधील कायदेशीर काँट्रॅक्ट असते, तेव्हा ते त्यातील एकानेच बदल करू नये म्हणून पिडिएफ इमेज असे सेव केले जाते. तशा प्रकारचे डॉक्युमेंट आपण इतर मार्गाने एडिट केले तर ते कायदेशीर रहाणार नाही. तुम्हाला नुसतेच मोठ्या फाँटमधे प्रिंट करायचे असल्यास प्रिंटर प्रॉपर्टीजमधे १००% हून जास्त झूम किंवा इफेक्ट्स वापरून ते मोठ्या साईजमधे प्रिंट करता येईल.

डॉक्युमेंट एडिट करता येऊ नये म्हणून पिडिएफ बनवले जाते. >>> नाही. PDF means Portable Document Format. म्हणजे हे Document कुठेही उघडता येईल(अर्थात PDF Reader असेल तरच).

हे जरा डेंजरस नाही? जर फाईलमधे प्रोप्रायटरी इन्फो असेल तर?>>> अहो, त्या साईट्ला कित्येक Documents पाठवली जात असतील, ते कुठे प्रत्येक Document पाहत बसणार?? दुसरा उपाय म्हणजे PDF Editor वापरणं.

अहो, त्या साईट्ला कित्येक Documents पाठवली जात असतील, ते कुठे प्रत्येक Document पाहत बसणार?? >> document compliance policy मूळे problem येऊ शकतो म्हणून असे करू नये असे माझे मत. PDF editor trial versions मिळतात ती वापरून बघा.

ही चर्चा यापूर्वीच झालेली आहे. सगळी एकाच धाग्यावरची चर्चा असल्याने माहिती शोधायला अवघड जाते म्हणून वेगळे प्रश्न तयार केले आहेत.

सिंडरेला, Abby FineReader सॉफ्टवेअरने तुम्ही Text extract (OCR - Optical Character Recognition) करू शकतात. यात Text, Table and Graphics (images) असे तीन ऑप्शन सिलेक्ट करू शकतात आणि output वर्डमध्ये सेव्ह करू शकतात. यात extract केलेल्या Text वर स्पेलचेक करू शकतात. बर्‍याच वेळा OCRed टेक्स्टमध्ये स्पेलिंग मिस्टेक होतात (उदा. ० ला O किंवा I साठी 1).

मला हाच प्रश्न पडला होता वेगळ्या कारणासाठी :-
पेपरातील मजकुराचा फोटो पाठवला तर झूम केल्यावर वाचणाय्रास अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत. image to pdf आणि scan to pdf दोन अॅप( विंडोज ) घेऊन पाहिली पण ती कशी वापरायची ते कळलं नाही. वर लिहिल्याप्रमाणे डॅाक्युमेंटमध्ये फेरफार हा उद्देश नसून स्पष्टपणा यावा यासाठी. जिप्सीचा उपाय करून पाहतो विंडोजचे स्वत:चे 'office lense' आहे परंतू वनड्राइव मार्गे जावे लागते.

>>>> पीडीएफ मध्ये इमेज असेल (स्कॅन्ड टेक्स्ट) तर त्याचे एडिटेबल टेक्स्ट करता येते का ? कसे ?<<<<
अ‍ॅक्रोब्रॅट प्रो व्हर्जन असेल, तर त्यातिल सुविधा वापरुन एडिटेबल टेक्स्ट तयार करता येते, (पूर्वी मी केले आहे) पण यालाही मर्यादा आहेत.
अन्यथा, पाने कमी असतील, तर सरळ प्रिंट काढून परत "सर्चेबल पीडीएफ" या ऑप्शनने पुन्हा स्कॅन करुन नविन पीडीएफ बनविणे हाच एक उपाय रहातो. हे मला बरेचदा करावे लागते.

>>>> मी पीडीएफ कन्वर्टर वापरुन वर्ड डॉक बनवले आहे. पण त्यात इमेज कॉपी होतेय. <<<<
याचा अर्थ कळला नाही. वर्ड मधे फाईल तयार केली असेल, व ती नंतर पीडीएफ मधे कन्व्हर्ट केली तर सहसा इमेजफॉर्ममधिल पीडीएफ तयार होत नाही, प्रोव्हाईडेड, तुम्ही कोणता कन्व्हर्टर वापरता आहात. मी प्रायमोपीडीएफ वापरतो.
पण तुम्ही जर पीडीएफ वरुन कॉपी/पेस्ट वा कन्व्हर्ट करुन वर्ड फाईल बनवु पहात असाल, तर मात्र मूळ पीडीएफ जशी बनली असेल त्याप्रमाणे वर्डमधे इमेज येणार की एडिटेबल अक्षरे हे ठरते.

तेव्हा, अ‍ॅक्रोब्रॅट प्रो उपलब्ध झाले, तर तेथे इमेजमधिल अक्षरे एडिटेबल करुन नविन पीडीएफ बनवुन मग तेथुन ते वर्ड मधे घेता येणे हा एक उपाय ( या कृतीची सुविधा नेटमार्फत आहे वा नाही माहित नाही)
अन्यथा प्रिंट काढून नव्याने स्कॅन करणे हा दुसरा उपाय.

ऑल दि बेस्ट....

तृप्ती आवटी,
अडोबे अ‍ॅक्रोबॅट एक्स प्रो, नावाचे एक सॉफ्टवेअर आहे, मी माझ्या कंपनी मधे ते वापरतो.
पीडीएफ मध्ये इमेज असेल (स्कॅन्ड टेक्स्ट) तर त्याचे एडिटेबल टेक्स्ट करता येते ह्या सॉफ्टवेअर ने. अर्थात नॉर्मल पीडीएफ सारखी उत्तम कन्व्हर्‍ट होत नाही, पण कमीत कमी एडिटेबल टेक्स्ट तयार होते, मग आपण ते फॉर्मॅट करुन घेउ शकतो.
एकच तापदायक म्हणजे ह्या अडोबे अ‍ॅक्रोबॅट एक्स प्रो ची किंमत काही च्या काही आहे.

नेहमीच्या (स्वस्त / फ्री ) सॉफ्टवेअर मध्ये नाही होत convert. जेव्हा टेक्स्ट न राहता केवळ एक फोटो म्हणून जर मूळ डॉक्युमेंट मध्ये save केली आहे तर सॉफ्टवेअर त्याचे पुन्हा Text मध्ये conversion नाही करू शकणार. काही हाय एंड सॉफ्टवेअर करू शकतात conversion पण ते देखील अचूक नसते.

एकच तापदायक म्हणजे ह्या अडोबे अ‍ॅक्रोबॅट एक्स प्रो ची किंमत काही च्या काही आहे.>>>>> म्हणूनच तर आपण इथे मदत मागतो. Happy
२५०००-३०००० खरंच काहीच्या काही किंमत आहे.