"मन डोह" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ

Submitted by अ. अ. जोशी on 30 April, 2011 - 01:50

कवी - लेखक श्री. अरूण वि. देशपांडे यांच्या
मन डोह या दुसर्‍या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ

दिनांक ८ मे २०११ रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होत आहे.

स्थळ : छत्रे सभागृह, गणेशनगर, एरंडवणे, कर्वे रस्ता, दशभूजा गणपती व कर्नाटक हायस्कूल यांना जोडणारी गल्ली, पुणे.

हस्ते : पं. डॉ. विकास कशाळकर

पं. विकास कशाळकर हे शास्त्रीय संगीताशी निगडीत आहेत. ग्वाल्हेर घराण्याशी संबंधीत पं. विकास कशाळकर उत्तम गायक व संगीतकार आहेत. त्यामुळे मन डोह या काव्यसंग्रहातील काही कवितांना त्यांनी संगीत दिले आहे.

या कवितांचे संगीतमय सादरीकरण करणर आहेत...
प्रीती भट, रजनी श्रोत्री, आनंद चिकटे आणि आनंद असोदेकर.

अध्यक्षस्थानी डॉ. शंतनु चिंधडे असतील.

काव्यसंग्रहाचे रसग्रहण करताना कवितेतील गाणे या विषयावरही पं. विकास कशाळकर आपले मनोगत मांडणार आहेत.

तेंव्हा आपण या समारंभास उपस्थित रहावे अशी विनंती.

** प्रकाशक - सुचेतानंत प्रकाशन, पुणे.

गुलमोहर: