ज्ञानकण

Submitted by मी_आर्या on 19 April, 2011 - 01:40

ज्ञानकणः

संत गोरा कुंभारः जन्म शके ११८९ मधे तेरढोकी येथे
संत नामदेव: कार्तिक शु. ११ रविवार शके ११९२
संत निवृत्तीनाथः जन्म शके ११९५ मधे
संत ज्ञानेश्वरः जन्म शके ११९७ मधे
संत सोपानदेवः जन्म शके ११९९ मधे
संत मुक्ताबाई: जन्म शके १२०१ मधे

मराठीतील साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे

दत्तात्रय घाटे: दत्तकवी

डी.व्ही. गद्रे: काव्यविहारी

शंकर केशव कानेटकरः गिरीश
दिनकर दत्तात्रय भोसले: चारुता सागर

शंकर गर्गे: दिवाकर

व्ही.सी.गुर्जरः चंद्रगुप्त

सौ. मालतीबाई बेडेकरः विभावरी शिरुरकर

भाऊसाहेब सोमणः किरात

मुरलीधर नारायण गुप्ते: बी

वि.वा. शिरवाडकरः कुसुमाग्रज

प्र.के.अत्रे: केशवकुमार

माणिक गोडघाटे: ग्रेस

कृ.के.दामले: केशवसुत

रा.गो. देशमुखः लोकहितवादी

वि.ग.करंदीकरः विनायक

राम गणेश गडकरी: गोविंदाग्रज

त्र्यंबक बापुजी ठोंबरे: बालकवी

दिनकर ग. केळकरः अज्ञातवासी

अ.ब.कोल्हटकरः संदेश

न. रा. फाटकः अंतर्भेदी

मराठीतील पहिली साहित्य कृती: "विवेक सिंधू" (११८८) लेखक- मुकुंदराज (११२८-१२००)
मराठीतील पहिली कादंबरी: "यमुना पर्यटन"
मराठीतील पहिली स्त्री नाटककारः सोनाबाई चिमाजी केरकर
सोनाबाई केरकरांचे पहिले नाट्यलेखनः "छत्रपती शिवाजी"- १८९६
बाबुराव अर्नाळकरांचे मूळ नावः चंद्रकांत सखाराम चव्हाण
मराठी वाड्मयाच्या इतिहासातील कोश-युगाचे प्रणेते: डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर
टारझनचा मराठीत प्रथम अनुवाद करणारे: कृष्णकुमार शेरतुकडे
उमर खय्यामचा रुबाया प्रथम मराठीत आणणारे: माधव ज्युलियन
शाहिर अनंत फंदी यांचे आडनावः घोलप

(परवा जुनी डायरी सापडली. मोकळी झालेली पाने रद्दीत देण्यापेक्षा इथे सेव्ह करुन ठेवाविशी वाटली म्हणुन हा खटाटोप)

गुलमोहर: 

धागा चांगला आहे. पण अपुर्ण आहे
यात याच धाग्यावर ईतरांकडुन माहीती गोळा करुण वर घेत जा परिपुर्ण होईल.

जसे आद्यकवि----मुकुंद (जाटदेवळेकर) आडनांव नक्की माहीत नाही धन्य्वाद

सौ. मालतीबाई बेडेकरः विभावरी शिरुरकर (कळ्यांचे निश्वास)
नारायण गुप्ते: बी
मला वाटतं मुरलीधर नारायण गुप्ते =बी.(चाफा बोलेना)

डॉक्...'बनगरवाडी" व्यंकटेश माडगुळकरांची म्हणत असाल तर ती १९५४ मधली आहे. "विवेक सिंधु" संत ज्ञानेश्वरांच्याही जन्माआधीची आहे.

आठवणीतल्या कविता या संग्रहात आढळलेले हे टोपणनाव :
सरस्वतीकंठाभरण : दिनकर नानाजी शिंदे

माधव जूलियन = माधव त्रिंबक पटवर्धन

>> मला वाटतं मुरलीधर नारायण गुप्ते =बी.

नारायण मुरलीधर गुप्ते असं आहे.

संत गाडगेबाबांचं नाव- डेबूजी झिंग्राजी जाणोरकर असं होतं असं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. Happy

छत्रपती संभाजी महाराजांनी ४ पुस्तके लिहिली:
"बुधभूषणम" - संस्कृतमधे
"सात शतक"- ब्रीजभाषा/ हिन्दीमधे
"नखशिखा"- हिन्दी
"नायिकाभेद"- हिन्दी

यापैकी: "बुधभूषणम" या पुस्तकावरील मराठीत भाष्य डॉ. प्रभाकर ताकवले यांनी केलं आहे.
अधिक माहितीसाठी इथे पहा
http://groups.yahoo.com/group/jainsamachar/message/1549

आर्ये संतांची पूर्ण नावे का लिहीत नाहीस, जसे

संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुळकर्णी
संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले(मोरे)
संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर

इ.इ.

"वारा फोफावला...दर्या उफाळला"- कवी बाबुराव गोखले
चित्रकार रावबहादुर धुरंधर यानी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या आठवणींवर लिहिलेल्या पुस्तकाचे नावः " कला मंदिरातील ४१ वर्ष"
भावार्थ रामायण- लेखकः संत एकनाथ
"आता उठवु सारे रान" - कवी: साने गुरुजी
"आला खुशीत समंदर"- कवी: अनंत काणेकर
"घनःश्याम सुंदरा..."भूपाळी- होनाजी बाळा
"व्यंकटेश स्तोत्र"- रचनाकारः देवीदास
"पडु आजारी मौज हीच वाटे भारी"- कवी- भानुदास( कृष्णाजी विनायक पोटे)
"राय क्लब उर्फ सोनेरी टोळी- कादंबरीकार- नाथ माधव
"राधा-माधव विलास चंपू- लेखकः वि.का.राजवाडे
'गाडी आली गाडी आली, झुक झुक झुक"- कवी: वि.म.कुलकर्णी