सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by आशूडी on 27 June, 2008 - 01:56

मराठी सा रे ग म प लीटल चॅम्प्स.. झी मराठी वर सोम मंगळ रात्री ९.३० ते ११ असते. कालच पहिला भाग सुरू झालाय.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फायनलला मुग्धा नसेल तर मला खूप वाईट वाटेल.... मी तिचा जबरदस्त फॅन झालोय. एवढ्याश्या वयात किती अवघड गाणीसुद्धा काय सहजी गाते ती...

योगी तुझं खरंय, पण ती या स्पर्धेत फार लहान वयात उतरलीए, थोडी मोठी झाली की तिचा फॅन हो.

शाल्मलिचि गायकि साधारण असल्याने ति बाद ़जालि.. आता तिने दिलिप प्रभावळकर यांना गुरुस्थानि मानुन नकलात करियर करावे......

अहो अवि.अप्पा तोच तोच जोक परत परत मारला की हसू येईनासं होतं हो...

आता सगळेच लिटिल चॅम्प्स कंटाळल्यासारखे गातात... महाअंतिम फेरी लांबली आहे आणि लिटिल चॅम्प्सना गाण्यांचा ओव्हरडोस होतो आहे.

अरे, बरच काही मिसलेल दिसतय आम्ही... आता युट्युबवर पहावे लागेल. आणि हरीजी आले म्हणजे तर अगदी निवांत बसूनच ऐकावे/पहावे लागेल..
इथली आधिची चर्चा गायब झाली आहे का..? का गप्पांच पान म्हणून "नुकतीच" वहाती केली आहे..? Happy
गिरी,
मलाही अवधूत बद्दल आगदी तेच वाटते.. त्याचे पाय घट्ट जमिनीवर आहेत! वैशाली मात्र उगाच मुलांचा क्लास घेत असते. अशा प्रतिभावान मुलांन्ना सुध्धा जज करायला तीच्यापेक्षा मोठा (अनुभवाने, गुणाने, मेहेनतीने) कलावंत हवा हे सारख वाटत रहात. असो.

काल कोणी वसंतोत्सवात गेलं होतं का लिल चँप्स ची गाणी ऐकायला?
इथे आज दुपारी झी मराठी वर मस्ती की पाठशाला नावाचा कार्यक्रम पाहिला.. मस्त होता.. सगळी पोरं टिपी करताना दाखवली होती... रोहीत आणि प्रथमेश सगळ्यांच्या मागे लागले होते...
आणि नंतर सगळ्यांनी मिळून रोहित चं पाकिट लपवलेलं ते पण दाखवलं.. Happy

का गप्पांच पान म्हणून "नुकतीच" वहाती केली आहे..? >>>> योग, हो.. हे वहातं पान आहे..

पांशामो ऑन..
त्या तद्दन भिकार आणि टुकार हिंदी सारेगमप विश्व युद्ध साठी २-२ लेखनाचे धागे आणि त्यापेक्षा १००० पट वरचा दर्जा असलेल्या लिल चँप्स साठी वहातं पान.. Uhoh
मराठी वर अन्याय म्हणतात तो हाच... Proud
पांशामो ऑफ...

का गप्पांच पान म्हणून "नुकतीच" वहाती केली आहे..? >>>> योग, हो.. हे वहातं पान आहे..

अरे आधी नव्हत तस..म्हणून विचारल.. एक दोन दिवसापूर्वी बहुदा केल असाव. असो. मायबोलीची जागा जबाबदारीने वापरणे हे आपल काम आहे आणि कुठे किती सर्वर स्पेस द्यायची तो प्रशासनाचा निर्णय आहे. Happy

ऍडम, तो 'मस्ती की पाठशाला' हा सुद्धा एक 'दिग्दर्शित' कार्यक्रम असतो.

मंजू.. हो अर्थातच.. Happy
पण ते informal वातावरण बघायला छान वाटलं.. मी परवा पहिल्यांदाच पाहिला तो कार्यक्रम म्हणून लिहिलं..

पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

काय गायला हा मुलगा येशील येशील राणी वा वा
कार्तिकीचं दुसरं गाणं मस्त झालं..भुवई सहज आणि मस्त खरंच.
मुग्धा नारायणा जब्बरदस्त गायली
आर्या ग्रेटच
प्रथमेशच कोळीगीत ढींग्च्यॅक झालं Happy

पाचही मुलं अंतिम फेरीत... आज कुणीही एलिमीनेट झालं नाही. Happy

पण हे सांगण्यासाठी किती टाईमपास केला झी मराठी वाल्यांनी...

चला... झोपायला जातो आता... शुभरात्री!

टि आर पी कसा वाढेल मग. अवधुत आणी वैशालीचे ते बोलने पण लिहीलेच होते असे वाटतेय. त्यांना माहीती होत बहुदा.

हि सर्वच पोर लै भारी आहेत.

मुग्धा इज मनी मेकर मशीन ती कशी बाहेर जाईल???

शेवटच्या फेरीत तिला किमान ३/४ लाख एस एम एस...
१०-१२ लाख का सोडणार आयडीया???

पुनः प्रक्षेपण केव्हा असते? ई एस टी प्रमाणे??

धन्यवाद.

योग, ADM

हे पान सुरुवातीपासून वाहतंच होतं. बहुतेक सुरु करताना "लेखनाचा धागा" ऐवजी "वाहते पान" निवडले असेल.

आता नवीन लेखनाचा धागा तयार केला आहे. इथुन पुढले सर्व प्रतिसाद साठवले जातील.
http://www.maayboli.com/node/5235