पुण्यात घर (भाडेतत्वावर्/विकत) घेण्यासाठी मार्गदर्शन

Submitted by mnp on 27 March, 2011 - 22:55

नमस्कार मंडळी,
'पुण्यात घर घ्यायचय?' या धाग्यावर पुण्यातील घरांवर चर्चा झाली आहे. पण माझा प्रश्न अगदी वेगळा होता, त्यामूळे तिथेच लिहू की वेगळा धागा काढावा हे कळत नव्हते. शेवटी मनाचा कौल घेतला. पण घराबाबत हे नाही करु शकत कारण, मला पुणे नवीन आहे.
आम्ही सध्या उसगावात आहोत कामानिमित्त. पण लवकरच मायदेशी परत जाणार आहोत. पण परतल्यावर नवरोबाचे काम कंपनीच्या पुण्याच्या शाखेत सुरु होतय (सध्या मगरपट्टा, काही काळाने कदाचीत हिंजेवाडीला जावे लागेल).
माझा सुध्दा नोकरी करण्याचा मनसुबा आहे, पण ती पुण्यात कुठे मिळेल ते सध्या माहित नाही. घरात आमचे २ वर्षाचे चिरंजीव आहेत.
आम्हाला पुण्याबद्द्ल काहीही माहीती नाही. (नाही म्हणायला २००० साली बहीणीच्या मैत्रीणींबरोबर फिरायला गेलेले तिच ओळख Happy )
तरी मुलासाठी उत्तम सोय (पाळणाघर्/नर्सरी, उद्यान) असणारा, घरातील वृध्दांना सुरक्षीत असणारा, मगरपट्टा व हिंजेवाडी दोन्ही पासून सोयीस्कर अंतरावर किंवा उत्तम वाहतुक सोयी असणारा असा परिसर कृपया सुचवा व घर (भाडेतत्वावर्/विकत) घेण्यासाठी मार्गदर्शन करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मगरपट्टा व हिंजेवाडी दोन्ही पासून सोयीस्कर अंतरावर
----------------------------------------------------------
मगरपट्टा आणि हिंजेवाडी ही पुण्याची दोन टोके आहेत. उदा. (पुणे हे अमेरिका मानले तर न्युयॉर्क आणि कॅलिफोर्निया जितके लांब तितके मगरपट्टा आणि हिंजेवाडी लांब आहेत). या दोन्हीपासुन सोयीस्कर म्हणजे तुम्हाला सेंट्रल पुणे किंवा कोथरुड या भागात पहावे लागेल.

उत्तम वाहतुक सोयी असणारा
---------------------------------
त्यातल्या त्यात सेंट्रल पुणे, कोथरुड या भागात वाहतुक सोयी आहेत. (पी एम टी). त्याला उत्तम म्हणावे की नाही हा वादाचा मुद्दा आहे. स्वतःचे वाहन अस्ल्यास उत्तम. रस्ते बरेच बरे आहेत.

घर विकत घ्यावे का भाड्याने
-------------------------------
एक पर्याय असा की जिथे नोकरी दीर्घकाळ असेल त्याच्या जवळपास विकत घ्यायचा विचार करावा. जर शॉर्ट टर्म असेल तर भाड्याने पहावे. (आयडीयली ज्या भागात चांगल्या सोयी आहेत आणि आपल्याला आवडले आहे अशा भागात घर घ्यावे मग नोकरीला जायला लांब पडले तरी चालेल)

हिंजवडीच्या आसपास बाणेर, बालेवाडी, वाकड या भागात चांगले काँप्लेक्सेस आहेत,

जाता जाता..
पुलंचे "तुम्हाला कोण व्हायचय मुंबईकर, पुणेकर का नागपुरकर" हा लेख्/ऑडीयो वाचला/ ऐकला नसल्यास ऐका.. म्हणजे पुणेकर व्हायला लागणारे गुण अंगी बाणवायला पण बरे पडेल Happy

पुण्यात स्वागत!

धन्यवाद मनस्मी.
मला मुख्यत्वे मुलासाठी उत्तम पाळणाघर्/नर्सरी, उद्यान असणारा व सुरक्षीत असणारा परीसर हवा आहे.
कुणीतरी मॉडेल कॉलनी सुचवले आहे. त्याबद्द्ल काय मत आहे.

एक पर्याय असा की जिथे नोकरी दीर्घकाळ असेल त्याच्या जवळपास विकत घ्यायचा विचार करावा. जर शॉर्ट टर्म असेल तर भाड्याने पहावे.>>
हो सुरुवातीला भाड्यानेच रहावयाचा विचार आहे.

पुलंचे "तुम्हाला कोण व्हायचय मुंबईकर, पुणेकर का नागपुरकर" हा लेख्/ऑडीयो वाचला/ ऐकला नसल्यास ऐका.. म्हणजे पुणेकर व्हायला लागणारे गुण अंगी बाणवायला पण बरे पडेल >>
हो पारायण झाली आहेत त्याची, पण ते गुण अंगी बाणावयाला थोडं मुळा-मुठेच पाणी (??)प्यावे लागेल. पण सुरुवात केली आहे Happy

कुणीतरी मॉडेल कॉलनी सुचवले आहे. त्याबद्द्ल काय मत आहे.
------------------------------------------------------------------
मॉडेल कॉलनी चांगले आहे. भाडे थोडेसे जास्त पडेल पण वर्थ इट.

घर भाड्याने घेण्याचा विचार असेल तर मगरपट्टा आणि हिंजेवाडीचा मध्य काढु नका. वरती म्हणल्याप्रमाणे ती दोन टोकं आहेत. त्यापेक्षा ऑफिसजवळ घर घ्या. बाकिच्या सुविधा आजकाल सगळीकडे उपलब्ध आहेत. पुलंचे पुणेकर आता बहुतेक कोथरुड, कर्वे रोड भागातच सापडतील त्यामुळं तिथुन लांब असाल तर चिंता नसावी :-).

सध्यातरी तिकडे गेल्यावर मगरपट्टा वसाहतीतच भाड्याने घर घेता येईल. तिथे आतच सर्व सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतात ट्रांझिशन करणे सोपे जाईल. तसेच प्रवासातील वेळ वाचेल आणी अडीअडचणीला उपयोग होईल.

पुणे २००० नंतर प्रचंड बदलले आहे. त्याच तुम्हाला पुण्याची माहिती नाही त्यामुळे नविन गावात एकदम घर विकत घेण्याऐवजी २-३ वर्षे भाड्याने राहून सगळे भाग नीट बघून तुम्हाला कुठे जास्त कंफर्टेबल वाटते अश्या ठिकाणी घर घेता येईल.

तुमचे बजेत माहीत नाही पण मॉडेल कॉलनी सुंदर असली तरी किमतीही सुंदर आहेत तिकडे. तसेच तिथुन मगरपट्टा जरा लांब पडेल (ट्रॅफिकमध्ये १ तास तरी). मॉडेल कॉलनीत सध्या १० ते १२ हजार रुपये स्क्वेअर फीट असा जागांचा भाव आहे.

भाड्याने घर घेण्याबद्दल आणि घरांच्या किमतीबद्दल वरील पोस्ट्स ना अनुमोदन.

सध्या हिंजेवडी, बालेवाडी, वाकड भागातः
२ बीएच के - भाडे - ८०००-१००००
३ बीएच के - १२०००-१५०००
(जसेजसे मध्य पुण्याकडे जाता भाडे वाढते).
मगरपट्टा भागातही जवळपास असेच रेट्स आहेत.

सकाळचा इपेपर आहे (पुणे सकाळची इमेज). त्यात जागाविषयक जाहिरातीमधुन भाड्याचा अंदाज येइल.