११ मारुतींना कसं जाता येईल?

Submitted by नानबा on 26 March, 2011 - 23:36

आई आणि तिच्या काही मैत्रिणींना ११ मारुती करायचे आहेत.
सातार्‍यातून निघून कसं जाता येईल ह्यासंदर्भात माहिती हवी आहे.
राऊट, अंतरं, लागणारा वेळ, रहाण्याची/जेवणा खाण्याची सोय - ह्यासंदर्भातली माहिती असेल तर प्लीज द्या ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे कोणतेही ११ मारुती कि अष्टविनायकांसारखे ११ प्रसिद्ध मारुती आहेत? वेगवेगळ्या ठिकाणी?

नुसते ११ मारुती करायचे असतील, तर आमचे पुणे आहेच की, प्रत्येक गल्लीत एक मारुती. २ तासात ११ मारुतींचं दर्शन होवुन जाईल, फार जीवाला त्रास न देता.

सातारा एस्टी स्टँड होउन स्पेशल एस्टी असतात.... ११ मारुती दर्शन!
एस्टी स्टँड ला फोन करुन विचार टायमिंग वगैरे....

ओह ..खरंच ११ मारुती असतात? वाचून वाटलं मारुती कारविषयी काही असेल ? पण नाही... तेही नाही पटलं!

११ मारूतीचं देऊळ हा सगळ्यात उत्तम उपाय... (नुसत्या ११ मारूती या उल्लेखानंच कसलं सही वाटलंय. सगळं बालपण आठवलं आणि ११ मारूतीच्या गल्लीत ही पत्ता लिहितानाची ओळ!).

रामदासांनी स्थापन केलेल्या किंवा महात्म्य वर्णन केलेले वेगवेगळ्या ठिकाणचे मिळून ११ मारूती आहेत.
त्यांचं एकत्रित देऊळ पुण्यात शुक्रवार पेठेत आहे. याच देवळात दगडूशेठ गणपतीची उत्सवाची मूर्ती वर्षभर ठेवलेली असते/ असायची (माझ्या लहानपणी तरी)

बाकी नानबा या खालच्या लिंकेची मदत होईल.
http://www.11maruti.com/

त्याच मारुतीकडे डोळे उघडमीट करत अकरा वेळा पहायचे. >>> Happy आपल्या श्रद्धास्थानाच्या मुर्ती/फोटोकडे बघून पूर्ण श्रद्धेने एकदा डोळ्यांची उघडझाप म्हणजे पापणी बंद करुन परत उघडून जो नमस्कार केला जातो (हातही न जोडता) त्याला निमिषाकार नमस्कार म्हणतात.

पुण्याची एक यात्रा कंपनी ११ मारुतींची यात्रा नेते इतकेच माहिती आहे. सविस्तर माहिती काढून टाकेनच. पण आम्ही ही यात्रा स्वतःच केली आहे मागच्याच वर्षी Happy