एकाच भाडेकरुला दिर्घकाळ घरात राहु देण्याबद्दल..

Submitted by mansmi18 on 28 February, 2011 - 15:26

नमस्कार,

आमचे एक अपार्टमेंट (पुण्यात) रेंट वर दिले आहे. या वर्षी दुसर्‍यांदा लीज रीन्यु केले आहे. (११ महिन्यासाठी).

आमच्या एका मित्राने असा सल्ला दिला आहे की पुढच्या वर्षी जरी त्या भाडेकरुची इच्छा असली तरी लीज रीन्यु करु नये. एकाच भाडेकरुला जास्त काळ राहु देणे जरा धोक्याचे आहे. ते निघायला गडबड करु शकतात. पुढच्या वर्षी या भाडेकरुला निरोप देउन नवीन भाडेकरु पहावा.

कृपया आपले मत्/अनुभव सांगावे.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसा काही प्रॉबलेम नाही यायला पाहिजे कारण नवीन माणूस आला काय किंवा त्याच माणसानी नवीन लीज साईन केली काय सारखच आहे. खुप वर्ष एकाच ठिकाणी राहून नंतर ते घर बळकावण्याच्या वगैरे केसेस ऐकू येतात पण त्यात भाडेकरू खुपच वेळ तिथे राहिलेला असतो (२० वर्ष बहुतेक).
असो, मध्यंतरी सासू-सासरे घर घेत असताना, घराचा मालक खुपच घाई करत होता. अ‍ॅडवान्स ताबडतोब मागत होता आणि म्हणायचा घराचे खरेदी खत तुम्हाला देतो. आम्हाला शंका आली म्हणून माझ्या रियल इस्टेटचाच धंदा असलेल्या मित्राच्या कानावर घातले. तो व्यवहार आजिबात करु नका म्हंटला. तुम्हाला खरेदी खत देऊन नंतर तो माणूस स्वतःचे खरेदी खत हरवले असं सांगून लगेचच खरेदी खताची कॉपी आणू शकतो आणि खरेदी खत तुमच्या हातात दिले म्हणजे येवढी काही मोठी गोष्ट नाही.
तुमच्या बाबतीत तुम्ही मालक आहात त्यामुळे हा प्रश्न येत नाही पण भाडेकरु कितीही भरवशाचा असला तरी आपण आपले लूपहोल्स तपासून तयारीत रहावं ह्या दृष्टिनी तुमच्या मित्राची शंका रास्त आहे. ११ महिन्यांची लीज आणि लिव अ‍ॅन्ड लायसन्स अग्रीमेंट जर रेजिस्टर्ड असेल तर काही प्रॉबलेम नाही यायला पाहिजे.
भाडेकरू नोकरदार माणूस वगैरे असेल तर उत्तम, सहसा सरळ मार्गी असतात पण त्याचीही गॅरंटी नाही. तुम्ही स्वतः पुण्यात राहता म्हणजे भाड्यानी दिलेल्या फ्लॅट वर तुमची ये जा असेलच. थोडक्यात तुम्ही मालक आहात ह्याची माहिती आजुबाजुच्या ४ लोकांना असलेली बरी. जरा अती वाटेल पण माझ्यामते भाडेकर्‍याला ही जाणीव राहते की ह्यांचे लक्ष आहे आणि त्याचा उपयोग होतो असं माझं प्रामाणीक मत आहे. Happy

धन्यवाद स्नेहा, वैद्यबुवा.

म्हणजे पुढच्या वर्षी नवीन भाडेकरु शोधायला हवा.

वैद्यबुवा यांचे बरोबर आहे. आमच्या शेजार्‍यांच्या अनुभवावरून दीर्घकाळ कुणालाही राहू देऊ नये. पुण्यात अगदी दर अकरा महिन्यांनी नवीन भाडेकरू मिळायला अजिबात अडचण येत नाही इतकी गरज आहे सद्ध्या घरांची.

जर भाडेकरु चांगला असेल तर continue करा. दर ११ महिन्यानी घर बदलणे पण त्रासदायक असते भाडेकरुंना. आणि नवा आलेला बेकार निघाला तर. लिज असताना, गुंड सोडुन, कोणी घर बळकावेल असे वाटत नाही.

>>>> ११ महिन्यांची लीज आणि लिव अ‍ॅन्ड लायसन्स अग्रीमेंट जर रेजिस्टर्ड असेल तर काही प्रॉबलेम नाही यायला पाहिजे. <<<<<
कायदा बघता नाही आला पाहिजे, पण कायद्याची प्रक्रिया येवढी किचकट आहे की भाडेकरुला काढणे असल्यास तितके सहज शक्य नाही हे देखिल लक्षात असू द्यावे.
माझ्या मते तर मूळात "घी देखा मगर बडगा नही देखा" अशी घरमालकाची परिस्थिती होऊ शकते.
सबब, माझ्यापुरते, मी लिज /रजिस्टर्ड वगैरेवर देखिल फारसा विश्वास ठेऊ शकत नाही. कारण एखाद्याने ठरवलेच की ठिय्या देऊनच बसायचे, तर सध्याच्या "काय-द्याच्या" राज्यात ब्रह्मदेव देखिल त्याला उठवु शकत नाही. सबब, मूळात भाडेकरू, त्यातुनही कुटुम्बवगैरे, ठेऊच नये, तशीच आर्थिक गरज असेल, तर ठेवताना सदर भाडेकरू "आपल्या टप्प्यातला" आहे की नाही ते बघुन मगच ठेवावा. अन्यथा नाकापेक्षा मोती जड होतो. ज्या भागात फ्लॅट आहे तेथिल "दादा" लोकान्शी तसेच स्थानिक पोलिसचौकिशी "ठरवुन" चान्गले सम्बन्ध ठेवले पाहिजेत, म्हणजे ऐनवेळेस अडचण उभारल्यास मग तहान लागल्यावर विहीर खणण्याचे कारण उरत नाही. वाईट घडू नये ही अपेक्षा असली तरीही, प्रतिकुल ते तेच घडेल हे मनाशी गृहित मात्र धरुन त्याप्रमाणे तजविजा करुन ठेवाव्यात.
भाडेकरुस कोणत्याही परिस्थितीत, बान्धकाम्/बदल्/दुरुस्ती वगैरे त्याचे खर्चाने/त्याचे नावाने करु देऊ नये. लाईटबील्/पाणीपट्टी/घरकर/सोसायटीचा हप्ता इत्यादी स्वतः जाऊन भरावे. अन्यथा, जरी लीज असले तरी दीर्घमुदतीचे अन्ब्रेक्ड वास्तव्य सिद्ध करण्यास वरील बाबी तसेच, नविन सुनेचे वगैरे गृहप्रेवेशादीक धार्मिक कृत्यान्चे फोटोचे पुरावे पुरेसे होतात.
भाडेकरू देखिल माणसेच अस्तात, गरजु अस्तात, तरीही निवडक काहीन्च्या मेन्दूत कलीचे वास्तव्य देखिल असू शकते हे गृहित धरुन सर्व सावधानता बाळगावी.
महत्वाचे म्हणजे,भाड्यातुन येणारे उत्पन्न, कोणाच्या ना कोणाच्या इन्कमट्याक्स रिटर्न मधे दाखवायची तजवीज करुन ठेवावी, नाही तर पुढे कोर्टबाजी करताना नेमकी हीच बाब लन्गडी ठरू शकते व भाडेकरु त्याचा पुरेपुर गैरफायदा उठवू शकतो.

(मी अनुभव अन अनुभुती याशिवाय काहीही लिहीत/बोलत नाही. आजवर मी एकही लिजडिड केलेले नाही, केवळ शब्दावर [अन अर्थातच समोरील दृष्य माणसावर] "विश्वास" ठेऊन [आणि माझे उपद्रवमूल्याची पूर्वकल्पना देऊन] भाडेकरुन्शी व्यवहार केले आहेत. स्थानिकास हे शक्य होते, परगावी वा लाम्ब राहुन भाडेकरु ठेवताना बरीच जास्त काळजी घ्यावी हे उत्तम, मात्र माणसे "विश्वासार्ह" वाटली तर उगाच काढून टाकण्याची घाई देखिल करू नये कारण नव्याने आलेले भाडेकरु आधीच्या पेक्षा सवाई नालायक असू शकतात अन आगीतुन उठून फुफाट्यात पडलो अशी अवस्था होऊ शकते! मी या सर्व अनुभवातून गेलेलो आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, भाडेकरू ठेवताना केवळ "उत्पन्नाचा स्त्रोत" म्हणून व्यावहारिक नजरेने न बघता, जर सावधपणेच पण "परोपकाराच्या" पारमार्थिक नजरेने व्यवहार केला, तर सहसा अपयश पदरात पडत नाही. जग हे दिल्याघेतल्याचे आहे हे लक्षात ठेवून द्यावे तसेच (अन तेवढेच) घ्यावे, कमी वा जास्तीची अपेक्षा कराल तर फसाल हे लक्षात असू द्यावे)
मन्दारच्या वरील मताशीदेखिल सहमत! Happy

स्थानिक वजनदार agent कडुन भाडेकरी शोधुन agreement register केले तर तो agent जेव्हा पाहिजे तेव्हा घर खाली करायला मदत करु शकतो किवा तो मधे असल्याने बरेचसे issues येनार पण नाहीत. अर्थात असे विश्वासु agent मिळणे फार अवघड आहे.

आमच्या घरात एक भाडेकरु १२ वर्षे होते. काही प्रॉब्लेम नाही आला.. रेन्यु करताना मध्ये ७-८ दिवसांचा गॅप ठेवला तर मला वाटते प्रोब्लेम नाही येणार.

नवीन भाडेकरू ठेवल्यास त्यांची सर्व आवश्यक माहिती जवळच्या पोलिस चौकीत द्यायला विसरू नका. सध्या पोलिसांचाच तुम्ही शक्यतो परराज्यातील भाडेकरू न ठेवण्यावर जोर असतो. जर तसा, खास करून उत्तरेकडील राज्यांतील मूळ निवासी असलेला भाडेकरू ठेवलाच तर त्याला त्याच्या शहरातील पोलिसांचे क्लिअरन्स सर्टिफिकेट, पत्त्याचे व्हेरिफिकेशन इत्यादी लागते. ह्या बाबतीत कोणतीही हयगय नको.

संपूर्ण कागदपत्र वरच्या प्रमाणे योग्य केलेली असतील, त्या भाडेकरूचे कुठल्याही राजकीय वा इतर प्रकारच्या गुंडाशी लागेबांधे नसतील आणि त्याच्या भाडेकरू म्हणून राहण्याबद्दल सोसायटी, पोलिस स्टेशन इत्यादी नोटिफाय केले असेल तर नवीन लीज जरूर करा.
नवीन लीज आणि आधीचे रिन्यू यात फरक आहे.
नवीन अ‍ॅग्रीमेंट ज्यात भाड्याची रक्कम, इतर क्लॉजेस (जसे की दर वर्षाला किती भाडेवाढ इत्यादी) हे सगळे परत नव्याने चर्चिले जाते. याला आधीच्या माणसाची तयारी असेल तर त्याच्याबरोबर लीज अ‍ॅग्रीमेंट करणे आणि नवीन भाडेकरूबरोबर करणे यात काहीच फरक नाही. अ‍ॅग्रीमेंट रजिस्ट्रेशनचा तेवढाच खर्च येतो. सगळी प्रोसिजर परत करावीच लागते.

मी सध्या भाडेकरू आहे आणि दर ११ महिन्यांनी नवी जागा शोधा, सामान हलवा याचा काय त्रास असतो ते पुरेपूर माहितीये. आता आमचं लीज २ वर्षाचं आहे ज्यात एका वर्षाने भाडे वाढून इतके होईल असे स्पष्ट केलेले आहे. २ वर्षांनी तिथेच रहायचे असल्यास आम्हाला परत भाड्याबद्दल निगोशिएशन आणि त्याप्रमाणे लीज, अ‍ॅग्रीमेंट रजिस्ट्रेशन करावे लागेल.

नवीन भाडेकरुचे police station registration येथे नोएडात तर बरेच घर मालक करतात. पण मुळ राज्यातले police verification पोलिस पण मागत नाहीत येथे.
खास करून उत्तरेकडील राज्यांतील मूळ निवासी असलेला भाडेकरू ठेवलाच तर त्याला त्याच्या शहरातील पोलिसांचे क्लिअरन्स सर्टिफिकेट, पत्त्याचे व्हेरिफिकेशन इत्यादी लागते.>> असा काही कायदा आहे का महाराष्ट्रात. मला नाही वाटत कोणी हे करत असेल. कारण उत्तर म्हणजे यु.पी. बिहार, पंजाब, हरयाणा, राजस्थान इ बरीच राज्ये आली. हे म्हणजे पोलिसांची हजार रु. ची सोय झाली.

हाच विचार करून आपण टाळतो आणि फसतो.
प्रोसिजर साठी जाउदेत ना पैसे तुमचा जीव गेला तर खुनी सापडायला, चोरी झाली तर मुद्देमाल मिळायला, कुठल्या काळ्या कारवायात तुमची जागा अडकलीच तर तुम्हाला सहिसलामत सोडवायलाच ती सगळी माहिती उपयोगाला येणारे ना?

@मंदार, हा नुकताच आलेला अनुभव आहे. कायदा तसा सांगतो की नाही हे माहित नाही, परंतु पुण्यात गेल्या काही वर्षांमधील दहशतवाद इत्यादीच्या पार्श्वभूमीवर पोलिस चौकीतील इन्स्पेक्टरने दिलेली ही प्रेमळ सूचना आहे. Happy

धन्यवाद..फार छान माहिती मिळत आहे.

आमचा भाडेकरु पुर्वेकडचा आहे. फॅमिली आहे. त्याचे पोलिसांकडे माहिती देणे इ. पहिल्या लीजच्या वेळेस केले आहे.
यावेळेस लीज एक्स्टेंड केले आहे (वाढीव भाड्यासह). तसा तो सरळ वाटतो पण एक किडा डोक्यात आला तेव्हा म्हटले इथे आधी विचारुन पाहुया.

एक प्रश्नः दोन वर्षानंतर परत नवीन लीज करावे लागते का? म्हणजे आता या वेळेस (दुसर्‍या वर्षी) आम्ही लीज एक्स्टेंड केलेय तर ते पुढे समजा परत वाढवायचे असेल तर परत एक्स्टेंड करण्यापेक्षा नवीन करणे चांगले आहे का?
(या वेळेस लीज एक्स्टेंड केले तेव्हा त्यात आधीच्या सगळ्या अटी कायम ठेवल्या आहेत आणि फक्त भाडे अमुक असणार आहे असे लिहिलेय)

धन्यवाद.

अ‍ॅग्रीमेंट नवीन आणि परत रजिस्ट्रेशन केलेत ना बदललेले भाडे आणि क्लॉजेस सकट?
या रजिस्ट्रेशन बरोबर पो. स्टे. ला परत रजि. ची कॉपी आणि इतर माहिती दिलीत का?

तर ते नवीन लीज होईल. आत्ता असे केले नसल्यास पुढच्या वेळेला हे करा.

शक्यतो २-३ वर्षांनंतर नवीन केलेले चांगले.

अ‍ॅग्रीमेंट नवीन आणि परत रजिस्ट्रेशन केलेत ना बदललेले भाडे आणि क्लॉजेस सकट?
या रजिस्ट्रेशन बरोबर पो. स्टे. ला परत रजि. ची कॉपी आणि इतर माहिती दिलीत का?
-------------------------------------------------------------------------------------------
नाही या वेळेस हे नाही केले पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवीन. सो थंब रुल इज दर दोन वर्षानी सगळी प्रोसीजर नवीन केलेली चांगली. रजिस्ट्रेशन सकट.
थँक्स.

मी सध्या भाडेकरू आहे आणि दर ११ महिन्यांनी नवी जागा शोधा, सामान हलवा याचा काय त्रास असतो ते पुरेपूर माहितीये. आता आमचं लीज २ वर्षाचं आहे ज्यात एका वर्षाने भाडे वाढून इतके होईल असे स्पष्ट केलेले आहे. २ वर्षांनी तिथेच रहायचे असल्यास आम्हाला परत भाड्याबद्दल निगोशिएशन आणि त्याप्रमाणे लीज, अ‍ॅग्रीमेंट रजिस्ट्रेशन करावे लागेल.>> अनुमोदन!!!

Bhadekaru jar changale asatil tar 11 mahinyani badalayahci garaj padu naye asa mala vatata. navin bhadekaru kase asatil yacha nem nasato.

मला ही माझा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे. कोणी नीट अशी सविस्तर पायरीने (स्टेप बाय स्टेप) माहीती देइल का?

वरचे वाचले तरी नीट कळले नाही.

रजिस्ट्रेशन कुठे व कुणाला , काय अटी ठेवाव्यात, भाड्याचा भाव साधारण कसा ठरवावा वगैरे वगैरे.. माहीती हवी आहे.

जागा पुण्यात आहे १ बेडरूम किचन.

मीरा ह्या अ‍ॅग्रीमेन्टचे टिपिकल मसुदे असतात. साधारण जे लोक लिगल डॉक्युमेन्ट्स टाईप करून देतात त्यांच्याकडे हे मसुदे उपलब्ध असतात. त्यात पुरेसे मुद्दे कव्हर केले असतात तथापि आपल्याला काही स्पेसिफिक मुद्दे टाकायचे असतील तर त्यात ते क्लॉज टाकता येतात. उदा. सकाळी १०.४७ ते १०.५३ या वेळेत भाडेकरूनी सतार वाजवू नये, भाडे पन्नासच्या नोटातच द्यावे, इत्यादी. कायद्यात कुठल्याही अटी मेन्शन केलेल्या नसतात. कायद्यात फक्त रजिस्ट्रेशनची विहित पद्धत अपेक्षिलेली असते म्हणजे स्टॅम्प ड्युटी ,साक्षीदार , प्रत्यक्ष जाऊन फोटो काढणे इत्यादि.

माझ्या एका मैत्रिणिचा प्रश्न आहे कि - जुन्या भाडेकरु विषयी काय कायदा आहे?
तिचि सासु गेलि ३७ वर्ष एका फ्लॅट मधे भाडेकरु आहे हिचा नवरा, दिर सगळेच लहानाचे मोठे ह्या घरात झाले. सासरे नाहित ( जवळ जवळ २७ वर्षा पुर्वी वारले) मुले बाहेरगावी आहेत. इथे मुलाची वेगळि घरे आहेत, ते ह्या घरात रहात नाहित. सासुहि मुलाक्डे असते. घराला वर्षभर कुलुप असते पण वर्षाचे भाडे एकदम देवुन रीतसर पावत्या आहेत. लाईट ची बिल + घर आणि पाणि पट्टी पण भरलेली असतात. पण फक्त घर कायम बन्द असते म्हणुन मालक घर परत मागत आहेत. मुलाना, सुनाना काहिच हरकत नाहिये. पण सासु घर सोडायला तयार नाहि. आणि मालक ठेवायला तयार नाहि. ह्यात कायदा काय करु शकतो? म्हणजे कुणाच्या बाजुनी कायदा आहे.

झम्पी यांच्या प्रश्नावर -
तुमचा पुण्यामध्ये flat असल्यामुळे पुण्यातील कोणत्याही दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात तुम्हाला नोंदणी करता येईल. पुण्यात १४-१५ अशी कार्यालये आहेत. आपल्या सोयीप्रमाणे निवडावे. एखादा चांगल्या वकिलाकडून agreement करून घेता येईल. भाडे हे तिथल्या मार्केट प्रमाणे तुम्हालाच ठरवावे लागेल.

अन्जली यांचा प्रश्न- कायदा घरमालकाच्या बाजुने आहे. "नॉन युजर" या सदराखाली ते आपले घर परत मागु शकतात?

कायदेशीर तरतुदी न तपासता एक सूचना कराविशी वाटतेय.. बघा बरोबर आहे का ?

लीव्ह अ‍ॅण्ड लायसेन्स / लीज / भाडेकरार सही करतानाच ठरलेल्या मुदतीनंतरची तारीख टाकून घर खाली करून दिलं आहे अशा आशयाचे पत्र सही करून घ्यावे. पुढचा करार करताना तारीख एक महिन्यानंतरची टाकावी.

अन्जली यांचा प्रश्न- कायदा घरमालकाच्या बाजुने आहे. "नॉन युजर" या सदराखाली ते आपले घर परत मागु शकतात?------पण व्यवहारात भाडेकरू जागा सोडत नाही. मालकाचा कोर्ट-कज्जे यांत बराच कालावधी,वेळ व पैसा

व पैसा जातो. कायदा पुस्तकात रहातो

एका ख्यातनाम वकिलांना मी हाच प्रश्न विचारला होता. अग्रीमेंट ११ महिन्यांचे करा वा २२ महिन्यांचे करा , पण कराराचा कालावधी स्पष्ट्पणाने म्हणजे या तारखेपासुन त्या तारखेपर्यंत लिहावा.त्यांनी पुढे म्हटले की करार हा नेहमीच रजिष्टर करणे आवश्यक असते, कारण नोटरी केलेला करार , कोर्टात , न्यायाधिश हातात घेत सुद्धा नाही. थोडक्यात थोडे पैसे अधिक गेले तरी चालतील, पण करार नेहमीच रजिष्टर करणे योग्य.कोर्टात फक्त त्याचीच दखल घेतली जाते.
दोन करारामध्ये काही दिवसांचे अंतर ठेवावे काय ? असाही प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी कालावधी स्प्ष्टपणे नोंदणे योग्य असे सांगीतले होते.
मी एकास २२ महिन्यांच्या कराराने फ्लॅट दिला होता. त्याला पुन्हा २२ महिन्यांच्या कराराने हवा होता. माझ्या सुदैवाने , मुदत संपल्यानंतर , त्याला एक महीना लेट झाला. ( त्याने प्रामाणिकपणाने एक महिन्याचे भाडे अगोदरच जमा केले होते . ) नंतरचा जो करार केला , तो त्याच्या पत्नीच्या नावे केला त्यामुळे एकालाच कायम केले असे झाले नाही.

या अकरा महिन्याच्या भानगडीला कंटाळून सदनिका विकत घेतात बरेच (मराठी) लोक.... वाढ्ती भाडी आणि दर ११ महिन्यानी एजंट्ला द्यायला लागणार दर तेवढाच ईएमआय जातो..........शिवाय परत दर ११ महिन्यानी सामान ह्ल्वा त्याचा त्रास वेगळाच

भाडेकरार व्हरसेस लीव्ह अ‍ॅन्ड लायसन्स, ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्ह. नॉर्मल रजिस्ट्रेशन ह्यातला फरक कोणी स्पष्ट करेल का? ३ मुलींना/मुलांना जागा भाड्याने देताना तिघांबरोबर अ‍ॅग्रीमेंट करतात का?

छान, आम्हालाही नुकताच हा अनुभव आला, घरी कुत्रा आहे हे आधी का सांगितले नाही म्हणून घरमालकाने कटकट केली, (बर्‍याच कटकटीत हीपण एक). आम्ही सोडलं लगेच ते घर.....

बाकी, कुत्रा आहे म्हणून घर नाकारणारांचे काहीच चुकत नाही. सोसायटीवाले घरमालकाला तक्रार करुन त्रास देतात. विकतचं दुखणं होतं ते....

आधीच सोसायटीवाले भाडेकरुंवर उगाच वैतागलेले असतात. (काय कारण आहे माहित नाही)

flat ownaer cha asel tar chalto . ase hi ahe kahi society madhe.
pan amhi adhich sangto tari pan pramanik panachi kahi kimat nahi konala.

आमचा अनुभवः
चांगला नोकरीवाला बॅचलर आणि त्याची शिकणारी बहीण.माणूस व्यवस्थित.नंतर हा माणूस काही काळ परदेशी गेला.बहिणीने कुत्रा पाळला.तो भुंकतो म्हणून सोसायटी चे फोन यायला लागले.बहिणीकडे मित्र याय्चे ते उगाच घाबरायचे.(म्हणजे कोणी सोसायटी तले आल्यास कार मागे लपणे वगैरे.)
मग बहिण नोकरी मिळून दुसरीकडे गेली आणि माणसाची बायको आली.ते घर तसे ओके टाइप्स चालवत होते.मग त्यांच्या नेटिव्ह प्लेस ला निघून गेले चांगली नोकरी मिळाली म्हणून.
घरात कुत्र्याने भिंतीवर सगळीकडे पंजे मारुन पेन्ट खरवडलेला.(३००० रु टच अप चा खर्च.)बाहेरच्या दाराच्या कुलपाची किल्ली हरवलेली.बाहेर ड्राय बाल्कनीत ड्रेन अगरबत्तीच्या असंख्य काड्यांनी तुंबलेले.
लोक 'अमक्या तमक्या धर्माचा माणूस चालेल का' विचारतात तेव्हा गंमत वाटते.घर अतीशय घाण करणारे प्रत्येक रिजन जाती धर्मात असतात.आणि एकटा बॅचलर असून अगदी मस्त स्वच्छ ठेवणारे पण.

आमच्या शेजारच्या बिल्डींग मध्ये कुत्रे लिफ्ट मधून घेऊन जाणे मना आहे,
कारण कुत्र्यांचा वास लिफ्ट मध्य एभारून राहतो आणी नंतर येणाऱ्या माणसाला तो आवडत नाही

पण कायद्याची प्रक्रिया येवढी किचकट आहे की भाडेकरुला काढणे असल्यास तितके सहज शक्य नाही हे देखिल लक्षात असू द्यावे.
माझ्या मते तर मूळात "घी देखा मगर बडगा नही देखा" अशी घरमालकाची परिस्थिती होऊ शकते.

खरं आहे. भाडेकरू फॅमिलीवाला ,स्वतःचे घर नसेलला असेल आणि घर खाली करण्याऐवजी कोर्टात गेल्यास मालकाला त्या घराची स्वतःला राहण्यासाठी गरज आहे हे कोर्टाला पटवून द्यावे लागते. मालकाच्या नावावर दोन घरे असतील तर अजून कठीण होऊन जाते. निकालास विलंब लागतो.

मार्मिक, यात चुकीचं काय आहे, नाही का? Wink

(सूचना: कोर्टात गेलेल्या भाडेकृमुळे वैतागलेल्यात माझे एक दोन मित्र आहेत, तेव्हा कोर्टकज्जे प्रकरणं जवळून पाहिलीत)

कोर्ट निकालात निवार्याच्या हक्काला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मालकाकडे हक्काचा पर्यायी निवारा असेल तर त्याच्या बाजूने निकाल लागण्यास अडचण येऊ शकते. बाकी ते ११ महिन्याचा भाडेकरार रजिस्ट्रेशन वगैरे धूळफेक आहे, सरकारी महसूल वाढविण्यापलीकडे त्याचा फार फायदा नाही.

बरोबर, माझा मित्र जो या कज्यात अडकला होता त्याच्याकडुन हीच माहिती मिळाली, कि करार हा फक्त नावाला असतो, (व्यवहाराच्या सुरुवातीला जी बोलणी होतात ती लिहून यादी बनवणे यापलीकडे त्याला लीगल अर्थ नाही) पाळला पाहिजेच असे कायद्यने बंधनकारक नाही,

जो राहतो त्याला काढू शकत नाही, अर्थात मसल पावर कोणाकडे आहे त्यावर डिपेंड करते

कुत्रे वल्यानी शक्यतो इंडिपेंडेंट हाऊस घ्यावे भाड्याने, बंगला टाईप.मोस्टली लोकांना नाही आवडत सोसायटीत कुत्रे, नुसता भुंकत राहतात.
कारण सोसायटी बाहेर भरपूर कुत्रं असतात, बेवारशी... सोसायटीत आल्यावर पण परत तेच नको असत लोकांना, हेमावेम।
यत्र तत्र सर्वत्र कुत्र !!!

च्रप्स >>>>> +१११११११११११११११११११

आमच्या ईथे एकाकडे होता कुत्रा, तसा तो त्रास नाहि द्यायचा पण मला खुप भिती वाटते.
जो पर्यंत त्यांच्याकडे कुत्रा होता लिफ्ट त्यांच्या मजल्यावर थांबुन पुढे आली की मी सरळ पायर्या वापरायची अन खाली त्या काकी लांब गेलेल्या पाहुन च बाहेर यायची.

सगळ्यात कहर म्हणजे त्या कुत्र्याचा मॉर्निगं वॉक संपुन तो परत यायचा अन माझा ऑफिसला निघायाचा वेळ एकच मग लिफ्ट ऊघडली की हा समोर.
त्यावर ऊपाय मी परत १ला मजला जायची अन रीकामी लिफ्ट खाली पाठवायची खास त्याच्यासाठी अन स्वःत चालत

शेवटी माझ्या मम्मीने केली तक्रार सोसायटीत, खुप चिडल्या होत्या त्या काकु तेव्हा
पण जेव्हा त्यांची सुनपण कुत्र्याला घबरणारी आली तर देऊन टाकला कुत्रा दुसर्याला