कथा चीन च्या नवर्षाची-२(राशीचक्र)

Submitted by वर्षू. on 23 February, 2011 - 23:51

चीन मधे हजारो वर्षांपासून प्रचलित असणारे, बारा प्राण्यांच्या नावावर आधारलेले राशीचक्र हे ,पाश्चिमात्य कॅलेंडरप्रमाणे बारा महिन्यात विभागलेले नसून बारा वर्षात विभागलेले आहे. तुम्ही जन्मलेल्या इसवी सन प्रमाणे तुमची राशी, त्या त्या प्राण्याचे सिंबल आहे.
यामागची कथा अशी सांगतात कि, निर्वाण करायच्या आधी बुद्धाने (ज्याला जेड सम्राट असे ही नांव आहे) सर्व प्राण्यांना भोजनासाठी आमंत्रित केले. या समारंभाला फक्त बाराच प्राणी उपस्थित झाले. हे प्राणी ज्या अनुक्रमाने आले त्याच अनुक्रमात त्यांचे नांव प्रत्येक वर्षाला देऊन बुद्धाने त्यांचा सन्मान केला.
ते प्राणी असे- १)उंदीर २) बैल ३) वाघ ४) ससा ५) ड्रॅगन ६) साप ७)घोडा ८) मेंढी ९) माकड १०) कोंबडा ११) कुत्रा १२) डुक्कर

खालील तालिका वाचून तुम्ही तुमचा बर्थ अ‍ॅनिमल कोणता ते जाणू शकता

उंदीर- १९१२-२४-३६-४८-६०-७२-८४-९६-२००८

बैल- १९१३-२५-३७-४९-६१-७३-८५-९७-२००९

वाघ- १९१४-२६-३८-५०-६२-७४-८६-९८-२०१०

ससा- १९१५- २७-३९-५१-६३-७५-८७-९९-२०११

ड्रॅगन- १९१६- २८-४०-५२-६४-७६-८८-२०००-२०१२

साप- १९१७- २९-४१-५३-६५-७७-८९-२००१-२०१३

घोडा- १९१८- ३०-४२-५४-६६-७८-९०-२००२-२०१४

मेंढी- १९१९-३१-४३-५५-६७-७९-९१-२००३-२०१५

माकड- १९२०- ३२-४४-५६-६८-८०-९२-२००४-२०१६

कोंबडा- १९२१- ३३-४५-५७-६९-८१-९३-२००५-२०१७

कुत्रा- १९२२-३४-४६-५८-७०-८२-९४-२००६-२०१८

डुक्कर- १९२३-३५-४७-५९-७१-८३-९५-२००७-२०१९

प्रत्येक प्राण्यांच्या स्वभावावरून मनुष्याच्या स्वभावाचे काही ठोकताळेही,मांडलेले आहेत
उंदीर- हाजिरजबाब,हुषार,विश्वासू,अभ्यासू,चिकित्सक प्रवृत्ती , ड्रॅगन किंवा माकडाशी कंपॅटिबल
बैल- परिश्रमी, विश्वासार्हक,सुदृढ,जिद्दीने ध्येय साधणारा, एकटेपणाला घाबरणारा,कुटुंब,मित्रपरिवारात
रमणारा, साप अथवा कोंबड्याशी कंपॅटिबल
वाघ- आकर्षक व्यक्तीमत्व, नायकत्व स्वीकारणारा,स्वाभिमानी,महत्वाकांक्षी,उदार्,मूडी, कुत्रा अथवा
घोड्याशी कंपॅटिबल
ससा- प्रामाणिक,मनमिळाऊ, कुटुंबप्रिय, अगत्यशील,संघर्ष टाळणारे,मेंढी अथवा डुकराशी कंपॅटिबल
ड्रॅगन- प्रभावशाली, आकर्षक, उदार, नॅचरल लीडर,माकड अथवा उंदराशी कंपॅटिबल
साप- उदार, मोहक, अंतर्मुखी,संपन्न, विश्लेशक,जेलस,स्मार्ट, परिश्रमी,बुद्धीमान, कोंबडा अथवा
बैलाशी कंपॅटिबल
घोडा- बंधने न आवडणारा, संपत्ती सांभाळून ठेवणारा, प्रवास आवडणारा, असहनशील, प्रेमळ,उत्साही
आत्मविश्वासी,आकर्षक,तीक्ष्णबुद्धी,कुत्रा अथवा वाघाशी कंपॅटिबल
मेंढी- एकांतप्रिय, भटके, सृजनात्मक, अव्यवस्थित, दुसर्‍यावर विसंबून राहणारे, अतिसंवेदनशील
स्वतःला असुरक्षित समजणारे,डुक्कर अथवा सश्याशी कंपॅटिबल
माकड- उत्साही, अनियंत्रित, आनंदी, चांगले श्रोता, ड्रॅगन अथवा उंदराशी कंपॅटिबल
कोंबडा- प्रामाणिक, दक्ष, ऑब्जर्वन्ट, विश्लेशक, स्पष्टवक्ता, विश्वासनीय, व्यवस्थित, थोड्या जुन्या
वळणाचा, साप अथवा बैलाशी कंपॅटिबल
कुत्रा- प्रामाणिक, रागीट, मूडी, दुसर्‍यावर सहज विश्वास न करणारा, थोडेसे खोटे बोलणारा,
मूडी, स्वतःचे सिद्धांत जिद्दीने पाळणारा, संवेदनशील, घोडा अथवा वाघाशीकंपॅटिबल
डुक्कर- चांगला स्वभाव, कलागुण प्रिय, उच्च आवड असणारे, थोडेसे गर्विष्ट, बुद्धीमान, मदतशील,
नेहमी ज्ञानाच्या शोधात असणारे, ससा अथवा मेंढीशी कंपॅटिबल

आता तुम्हा सर्वांना आपला(आणी इतरांचा ही Wink जन्मसाल माहित असेल तर) स्वभाव कोणत्या प्राण्याशी
जुळतोय ते कळेल..

गुलमोहर: 

@दक्षिणा..
घोडा- बंधने न आवडणारा, संपत्ती सांभाळून ठेवणारा, प्रवास आवडणारा, असहनशील, प्रेमळ,उत्साही
आत्मविश्वासी,आकर्षक,तीक्ष्णबुद्धी,कुत्रा अथवा वाघाशी कंपॅटिबल

दक्षे .. आता तुला ए घोडे अशी हाक मारायची का?? Light 1 घ्येच!!!
मी मुक्ता.. धन्स.. दक्षी ला समजलं असेल आता कुणाशी जुळेल तिचं Happy

कोंबडा- प्रामाणिक, दक्ष, ऑब्जर्वन्ट, विश्लेशक, स्पष्टवक्ता, विश्वासनीय, व्यवस्थित, थोड्या जुन्या
वळणाचा, साप अथवा बैलाशी कंपॅटिबल Proud आता 'नगिना' शोधायला हवी नाहीतर आ बैल मुझे मार !! Lol

Pages