ओझी मणाची -ओझी मनाची?

Submitted by नोरा on 17 February, 2011 - 19:19

बप्पाशेठ्च्या किराणा मालाच्या डिल्वरीचा टरक आला तसा तो उठला, हातातलं बिडिचं थोटुक फेकलं,फाट्क्या चपला परत पायात अडकवल्या,डुईवरची टोपी पुर्व पश्चिम केली. लगालगा फुढं हून त्यानं टरकाचं टोपाण उगडलं. गव्हा ज्वारिच्या गोण्पाटाच्या ह्या एवढाल्यापोत्यांच्या थप्प्या बघून्,त्यानं मनातल्या मनात एकांदी शिवि हासडली.मग गुमानं एकेक पोतं उचलून शेठ्च्या गोदामात रचलं.

बगता बगता संद्याकाळ झाली.आज पग्गाराचा टायम हुता.सगळी मंडळी घाम पुसत भितिला टेकून हुबी.कवा शेठ येतो आनी कवा पैसं मिळत्यात? आसं झाल्यालं..

नोटा मोजून घेत्,त्यानं खुषीत यून एक शिळ मारली.आन सायकल घ्युन तो बाजाराच्या दिशेनं निगाला. दे.दा.दु. पुढे सायकल टेकवून तो आत शिरला.

बर्‍याच वेळाने त्याची भ्र्म्हानंदी टाळी लागली.आता बाहेर यून त्यानं आपली सायकल घेतली् हलत डुलत्,हेलपाटत तो घराची वाट चालायला लागला.चालता चालता आपल्याशीच बोलायला लागला.मधीच रागाला यून लाथा झाडायला लागला.विस पंच्विस मिंटात गडी घरी बरूबर पोचला!

तिनं चुलीतला निखारा लाकडानं ढोसत भाकरी थापायचं क्षणभर थांबवून त्याच्या कडे बघितलं,"हाआआ..आला का परत ढोसून" ती जोरात कावदारली.तसं ह्ये फुडं आलं,चुलीतलं लाकूड खसकन बाहेर काढलं आनी तिच्या टक्कुर्यात घातलं.तिला ते जोरात लागलं,भाजलं,कळवळून ती जोर जोरात रडायला ओर्डायला लागली.पोरं घाबरून कोपर्यात जाऊन बसली.तशी म्हातारी पुढं आली,शिव्या देत तिनं आपल्या सुनेची सुटका केली.एव्हाना त्याला इतकी चढली होति कि तो स्वतःला सावरू नाही शकला आणी लोळायला लागला. म्हातारीनं मग नातवंडाना भरवावं तसं त्याच्या तोंडात भाकरी कोंबली.पण तवर्..हा बरळत ओरडत झोपून गेला.

सकाळ उगवली,तिनं पोराना शाळेत धाडलं आणि आपण लोकांची धुणी भांडी करायला ती बाहेर पडली.तिच्या कपाळावर्चा भाजलेला डाग आणी सुजलेले डोळे रात्रीची चित्तर कथा सांगून गेले.असं कसं ग बई तुझं म्हणत चार बायानी तिला सहानुभूती दिली. तिनं नेहमी सारखी कामं आटपली आणी घरी जाणार एव्ह्ढ्यात वहिनिनि तिला उरलेलं घेऊन जाण्याची आठवण केली.तिनं पदराला हात पुसले आणी गंजातलं ताक उगीचच ढवळून घेतलं.पातेल्यावरचं झाकण उघडून बघितलं आणी तिचा चेहरा तरारला.
"बरं झालं बगा आमच्या ह्यास्नी लई आवडत्यात तुमच्यातली कालवणं, गूळ घालता न्हवं का तुमी?"
कालच्याला जेवलंच न्हायती !"

धन्य हो! वहिनी पुटपुटली!

गुलमोहर: 

मनाचे ओझे हलके झाले कि, मणाच्या ओझ्याचे काय वाटणार? मन आणि मण यांचा नातेसंबंध उलगडताना, अस्सल ग्रामीण भाषेचा ढंग जपत, सहज लिखाण केले आहे. आवडली गोष्ट.

नोरा छान लिहीले आहे आपण ..... स्त्री मग ती कोणत्याही आर्थीक स्तरातील असो, असेच नातेसंबंध जपते आणि नवर्‍यासोबतच नाही तर अगदी सर्वांसोबतच Happy

प्.ले.शु.

छान!