पुण्यातले पूल (Bridges in Pune)

Submitted by bhatkyajoshi on 10 February, 2011 - 09:51

पुण्यातले पूल, भलतेच Cool,
कधी Z ब्रिज, कधी राजाराम पूल,
संपर्क प्रस्थापित करणारे,
दोन टोकांना जोडणारे...

पुण्यातले पूल, भलतेच Cool,
संध्याकाळ झाली की, सगळेच Full...
संध्याकाळी हे पूल तरुण होतात,
दोन तीरच नव्हे, दोन जीवही जोडतात..

पूलांचे कट्टे भरू लागतात,
दुचाकींचे नंबर वाढू लागतात,

आडोशाआड गप्पा फुलतात अन्
गर्दीच्या चेहऱ्यात माणसे हरवून बसतात..

अंधारात डोळ्यात डोळे घालून, काहीतरी शोधायचा प्रयत्न करतात..

मध्येच Long Drive चे खूळ निघतं,
पल्सर, डिस्कवरचं चाक फिरतं,
क्षणात कात्रज बायपास दिसू लागतो,
भन्नाट वेगात रस्ता सरत जातो...

वाढत्या अंधाराबरोबर गर्दीही वाढत जाते,पूलांचे कठडे अजून तरुण होतात,
खाजगीतल्या गोष्टी, हळूच ऐकत राहतात....
वाट बघत असतात, संध्याकाळ होण्याची,
जल्लोषी उत्साहात, भन्नाट तारुण्याची..

शब्दखुणा: