डिजिटल पेंटिंग : माझी बाग

Submitted by अवल on 1 February, 2011 - 08:56

माझ्या मनातली बाग Happy
हे संपूर्ण चित्र फोटोशॉपमध्ये रंगवले आहे.
खरं तर एक फोटो बघितला एका बागेचा; अगदी माझ्या मनातल्या बागेसारखा, तो फोटो बघून बघून हे संपूर्ण चित्र फोटोशॉपमध्ये रंगवले. खाली मूळ फोटो.

काढलेले चित्र :
1Garden.jpg

मूळ फोटो :
garden origanal.jpg

गुलमोहर: 

>>हे संपूर्ण चित्र फोटोशॉपमध्ये रंगवले आहे.

विश्वास बसत नाहीये Happy

हे संपूर्ण चित्र फोटोशॉपमध्ये रंगवले आहे.>> हे लिहलं नसतं तर त्या जांभळ्या फुलांचं नाव विचारणार होते Happy

अवल __/\__ जबरा कलाकार! फोटो काढल्यासारखं वाटतंय!

>>हे संपूर्ण चित्र फोटोशॉपमध्ये रंगवले आहे.

विश्वास बसत नाहीये >>> त्या झुडुपा मागे जो दगडी चौकोन दिसत आहे (घरासारखं), ति कल्पना अशक्यप्राय वाट्ण्याला वाव देणारी आहे..... पण छान आहे.

धन्यवाद मित्रमैत्रिणींनो Happy
चातक >>>ति कल्पना अशक्यप्राय वाट्ण्याला वाव देणारी आहे..... <<< अहो, नाही हो ... सॉरी एक गोष्ट सांगायची राहिलीच... हे चित्र काढताना एक फोटो होता डोळ्यासमोर.
त्यामुळे त्यातल्या चित्रकलेचे कौतुक मी स्विकारते Happy पण "त्याच्या कल्पने" चे श्रेय नाही माझे.... ती बाग ज्याने डिझाईन केली त्या आर्किटेक्चरचे ते कौशल्य !
पण धन्यवाद!
ती पायर्‍यांची बाजूची भींत दिसली तुम्हाला.... तुम्हाला खरं वाटणार नाही पण त्या भिंतीने अन या चित्रात जो चढ दिसतोय तो फिल द्यायलाच मला सर्वात जास्त कष्ट घावे लागले. आधी मी ती भिंत काढली नव्हती, पण त्या उताराचा फिलच येईना, मग जरा विचार केला अन प्रयत्न केला ती काढायचा. पण तुमच्या बारीक नजरेला माझा सलाम Happy

मस्तच जमलंय. Happy
एक प्रश्न, पहिला फोटो जो तुम्ही फोशॉ.मधे रंगवलाय, तो ट्रेस करून रंगवलाय की अजून काही??

सुंदर.