फँटसी वर्ल्ड

Submitted by अवल on 1 February, 2011 - 05:49

Ack1.jpg
मॅट पेंटिंग

गुलमोहर: 

आरती, शीर्षक 'फँटसी वर्ल्ड' असं हव आहे. चुकुन 'वर्ड' लिहिलयस.

एक भा.प्र. मॅट पेंटिंग म्हणजे काय? हे वरचं पेंटिंग कसं केलस ते डिटेलमध्ये कळून घ्यायला आवडेल.

मॅट पेंटिंग म्हणजे अनेक चित्र + फोटोशॉपमधील अनेक इफेक्ट्स यांचे एक काहीसे कोलाजसारखे पेंटिंग !

यात मुळच्या चित्रांमध्ये अनेक बदल केले जातात. जसे त्यांचे कलर्स, त्यांचे पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा इफेक्ट...

तसेच त्याला एक वेगळीच थीम देउन, नवी ट्रिटमेंट द्यावी लागते. ज्यामुळे हे नवे चित्र मूळच्या चित्रांहून फार फार वेगळे अन स्वतःचे असे व्यक्तिमत्व घेउन उभे राहील. अन ज्यातून कलाकारचे कला गुण दिसू शकतील.

वरच्या चित्रात मी खालचे पहिले चित्र (डावीकडचे पहिले) फोटोशॉपमध्ये तयार केले. अन बाकीची पाच चित्रे इथून तिथून घेतली आहेत. अन यासर्वांचे मिळून अगदी वेगळेच इफेक्ट देणारे चित्र बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

origanal.jpg

अवल...................फँटसी वर्ल्ड फँटास्टिक आणि अव्वल दर्जाचं आहे!!!!

Pages