कंपासपेटी

Submitted by मंदार-जोशी on 24 January, 2011 - 01:19

ही २२/७ आणि मी एक स्वतंत्र वर्तुळ वाचून सुचली.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

तू मोज त्रिज्या,
पण फार आक्रसू नकोस परीघ
असं का बघते आहेस आश्चर्याने
फिरव की तुझा हात पटापट
तुझ्या वहीवर लिहून थांबू नकोस
नाहीतर मी राहीन घुटमळत
तुझ्यापाशी तो पर्यंत
माझ्याही वहीवर उमटत नाहीत
तुझी अक्षरे जो पर्यंत
चल लवकर मोज व्यास
दे उत्तर चटकन्
उशीर करू नकोस
फार वेळ नाही राहीलाय
कारण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गधडे, मी कंपासपेटी घरीच विसरलोय.

Rofl

मंद्या.... !किती रे रडवशील? भावनांनी ओतप्रोत भरलेली कविता!! भिडली रे खुप :मुसमुसणारी भावली:

Proud

Rofl

Biggrin

मंदार, चावट माणसा........ असं कसं रे सगळं घरीच विसरतोस????

आणि वर्गात एवढी मुलं असताना तू बरा रे "तिच्याकडेच" ज्जातोस??? Proud Rofl

मंदार,
आंतर्बाह्य ढवळून काढणारी आहे रे तुझी कविता! Wink

कंपासपेटी घरी विसरल्यामुळे शालेय परीक्षेत ऐन मोक्याला होणारी धावाधाव आणि घालमेल समर्पक शब्दात रेखाटली आहेस. Wink स्वानुभवातून आलेले बोल कधीही हृदयाला भिडतातच. Proud