कोंकण - आठवडा बाजार

Submitted by भाऊ नमसकर on 22 January, 2011 - 02:13

bazaar2.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाऊ, तूम्ही इतर माध्यमांत पण नक्कीच चांगले काम करत असणार.
पण एक फर्माईश, आठवडी बाजार रंगीत पाहिजे बॉ.
आंब्याचे, अननसाचे, अबोलीच्या वळेसाराचे, कच्च्या पिक्क्या करवंदा/जांभळाचे, हातसडीच्या तांदळाचे, सुकवलेल्या बांगड्याचे, फणसाचे, काजीच्या बोंडाचे, ताज्या सोलांचे, वांग्या/भेंड्याचे, केळीच्या पानाचे, कुर्ल्या मूळ्यांचे, खाज्यांचे, खटखट्या लाडवांचे ... रंग, आकार आणि पोत हवेत..

भाऊ, _/\_

फार सुंदर..... बारीकसारीक खुब्या छान चितारल्या आहेत.

भाउंमुळे डिजिटल आर्ट विभाग बाजाराप्रमाणेच गजबजतोय.... Happy

सुरेख! भाऊ, तुम्ही ह्या डिजिटल आर्टची ग्रीटिंग्ज देखील मस्त बनवू शकाल! एक से एक आहेत सारी कोकणचित्रे!

सर्वांचे अभार.
<<तूम्ही इतर माध्यमांत पण नक्कीच चांगले काम करत असणार.>> दिनेशदा, तुमच्यासारख्या दर्दी रसिकाचा असा गैरसमज होणं हे मला व "पेंट"ला मिळालेलं सर्वोत्तम प्रशस्तिपत्र ! आपण कोंकणातल्या बाजाराचे रंग, आकार व पोत याचं इतकं नेमकं वर्णन केलंय कीं वाचून मला त्या सर्वाचा वास देखील जाणवला. पण ते चित्र साकारणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, याचीही तीव्र दु:खद जाणीव झाली.
पाटिल, मायबोलीवरचे तुम्ही याबाबतीत गुरू आहात; तुमचं "सुंदर" वाचून खास बरं वाटलं.
नीधप, वालावल- धामापूर परिसराशी माझ्या खूप हृद्य आठवणी निगडीत आहेत. नकळत उतरलेलं वालावलचं साम्य मलाही जाणवलं.
<<भाउंमुळे डिजिटल आर्ट विभाग बाजाराप्रमाणेच गजबजतोय>> डॉक्टरसाहेब,सध्या महागाईत बाजारात जायचं म्हणजे धडकीच भरते; त्याअर्थीं तर नाही ना म्हणत तुम्ही ? Wink

सुरेख !!! डिटेलिंग अशक्य आहे..
रंगीत करा ना हे.. अजून मजा येईल...
मी मागे पण लिहिलं होतं.. हे पेंटमध्ये करणं म्हणजे किती जास्त पेशन्सचं काम आहे !!!!! त्या बद्दल हॅट्स ऑफ Happy

काय जबरदस्त आहे हे पण चित्र...पेंसीलेने काढलंय असं वाटतं...इतके छान बारकावे टिपलेत...मस्तच! Happy

सुंदर.

भाउंमुळे डिजिटल आर्ट विभाग बाजाराप्रमाणेच गजबजतोय>> डॉक्टरसाहेब,सध्या महागाईत बाजारात जायचं म्हणजे धडकीच भरते; त्याअर्थीं तर नाही ना म्हणत तुम्ही ?

नाही हो भाउ.... Happy

धन्यवाद.
<<हे पेंटमध्ये करणं म्हणजे किती जास्त पेशन्सचं काम आहे >> परागजी, निवृत्तिनंतर पेन्शन कमी पडतं पण पेशन्सचा तुटवडा नाही जाणवत ! Wink
डॉ.गायकवाड - Wink

Pages