नक्की हे काय आहे?

Submitted by तृष्णा on 20 January, 2011 - 04:28

कदाचित कालची जत्रा मी कधीच विसरु शकणार नाही. काल मिळालेली जख्म खुप मोठि होती, ती लवकर भरुन निघण अशक्य आहे.खरच मी विसरु शकेन हे सगळ, ते दिवस, त्या आठवणी, ते आकर्षण. ईतक सोप आहे का ते सगळ विसरण........................
पो पो पो............... ट्रेन आल्याचा भोंगा वाजला आणि मी भानावर आले.
अरे ९:०८ ची स्लो बोरिवली ट्रेन दादर प्ल्याटफोर्म नंबर एक वर आलेली होती. मी गोंधळलेल्या मनस्थितीत ट्रेन मध्ये चढले. शांतपणे बसायला मिळालेले म्हणुन नशिब. पण मन आज काही स्थिर रहायला तयार नव्हते. पुन्हा मला ते तिथेच घेउन गेले जे जग मी पंधरावर्षापुर्वी सोडले होते कायमचे......?
तो सहावीचा वर्ग काही नविन विद्यार्थी आणि काहि जुने. मी तशी जुनिच होती. सगळ्यांचे परिचय झाले. त्यात तो होता. ज्याने आज मला तोडुन पण जोडल होत. हक्क काही नव्हता आमचा एकमेकांवर पण एक आकर्षण होत दोघांत तेच आम्हाला जवळ घेउन येत होत. प्रेमाच अर्थ फार उशिरा कळाला. पण नक्किच ते आकर्षण होत, प्रेम नव्हत. सारख माझ्याकडे बघण. माझ्या घरापर्यंत माझ्या मागे चालत येण, मला गुलाबाच फुल देण, स्वत:च्या जिवलग सायकलची एक चावी माझ्याकडे देण, माझा पासपोर्ट फोटो पॉकीटात आणि फ्रेम फोटो स्वःताच्या बेडरुम मधे ठेवणे. हे त्याच प्रेम होत. पण माझ्या मनात ते कधिच निर्माण होउ शकल नाही. मग तुझ मला भेटायला येण. मला पण ते आपल भेटण आवडण. मग हळु हळु आपल्यात एक नात निर्माण होत गेल. ते मैत्रीच नात नव्हत. कारण मित्रत्व वेगळच असत. दोन वर्ष कसे सरले कळालच नाही. मग अचानक एक दिवस तु सर्वांसमोर येउन मला सांगितलस कि मला तु खुप आवडतेस, तु माझी आयटम होशिल का?
खाडकन कानाखाली बसली त्याचे. हो मीच मारली होती ती. इतकी हिमत कुठुन आली होती माझ्यात कुणास ठाउक>? मी त्याला जास्त काही समजावल नाही. माझ्या एका थापेतच तो गार झाला होता. मग मी खुप विचार केला... कि का नाही प्रेम करु शकत मी त्याच्यावर का नाही मी त्याची आयटम होउ शकत? का ?
त्यावेळी तरी माझ्या समोर एकच कारण होत कि माझे बाबा ह्या गोष्टीला कधीच सहमत होणार नाही. कारण तो आमच्या जातीबाहेर होता आणि बिन बापाचा आहे? हो फक्त आईच होती त्याला. तिला लोक वाईट नजरेने बघतात. पण मला त्याच्या आईबद्दल अजुन तरी काहि महित नाहि. पण ती वाईट आहे असे लोक म्हणतात. मी अजुन नववीत आहे. अजुन बरेच आयुष्य जायच आहे माझ. माझे वडिल समजात मान वर करुन चालतात आपण जर काहि चुकी केली तर?
नाही सध्या तरी असे काहि करुन चालणार नाही नंतर बघु. वय खुप लहान होत माझ. पण तरीहि मी हा निर्णय घेतला असा विचार केला. कारण मी खुप फोकस होते. माझा गोल ठरला होता. मला कलेक्टर व्ह्यायच होत.
स्व:ताच अस्तित्व निर्माण करायच होत. माझ स्वप्नच होत ते. प्रेमबिम सध्या तरी नको. मनात कहि नसताना जर टाईमपास जरी केला तरी वडिलांची इज्जत कोणत्या मुलीला प्यारी नसते. जाउ दे हा विचार आता नको म्हणुन तर कोवळ्या वयात मनाला इतकी बंधन घालुन मी तयार केल. आणि मग तो दिवस उजाडला. ज्या दिवसापासुन माझ्या जिवनाला आणि आमच्या नात्याला कलाटणी मिळाली. मी त्याला एक चिठ्ठी लिहली कि उद्या शाळा सुटल्यावर मला तुला भेटायच आहे. शाळेच्या मागे तु एकटाच ये. मी ही एकटीच असेन. मी त्याच्या बाकावरील पुस्तकात चिठ्ठी ठेवली आणि निघुन गेले. नेमके ते पुस्तक आमच्या वर्गातील सर्वांत नलायक मुलीने घेतले आणि तिने ती चिठ्ठि वाचली. आणि पिसाचा कावळा केला...........
हो पिसाचा कावळाचं म्हणता येईल त्याला. तिने ती चिठ्ठि नेऊन सरळ आमच्या क्लास टिचर कडे दिली. मग तिने आमच्या दोघांच्याघरी नोटीस पाठवली की उद्या पालकांनी शाळेत हजर रहावे. तो तर बिचारा ह्या सगळ्यापासुन खुप दुर होता. काय झाले आहे हे ही त्याला कळले नव्हते. मी रडत रडत आईला येवुन सगळे सांगितले. वर पप्पापर्यंत जाऊ नकोस अशी विनंती ही केली. हो. मी माझ्या स्वःताच्या आईला विनंती केली. कि फक्त तुच शाळेत चल असं. वर्ग सुरु झाला आई माझ्या आधीच आली होती माझा सोबतही नाही. पहिलाच एकटिचं. आमच्या प्रार्थना सुरु होत्या. मग आमच्या क्लास टिचरने तिला आत बोलवले. समोर तो होता, मीही होते. आमच्या बाईं काही बोलायला सुरुवात करतील इतक्यात माझा आईनेही तेच केले, पुर्ण वर्ग भरलेला असताना फाड कन त्याचा कानाखाली लावुन दिली आणि बोलल, आधी तिचा पाठलाग करतो, आमच्याघरी निनावे कॉल करतो. तिला प्रेमाच्या जाळ्यात अड्कवायचा प्लान आहे तुझा. पुन्हा कधी तिच्या जवळ दिसलास तर तंगड्या तोडुन हातात देईन. हा प्रकार बघुन माझी क्लास टिचर काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. माझी आई ताड्ताड निघुन गेली. तो पुर्ण थंड पडला होता. एक हसु बनुन राहीला होत तो. एक मजाक. खुप रडलो आम्ही दोघेही. त्याची आई आली रीसेस नंतर पण काही फायदा नव्ह्ता. वेळ निघुन गेली होती. हातातील वाळु सरकली होती. मग तो पुन्हा कधी माझ्याशी बोलायला आला नाही. खुप रागवला होता तो. मी खुप प्रयत्न केले कि त्याने मला समजुन घ्यावे. पण ते नाही जमले. मी हरले होते. ह्या घट्नेला काही महीने उलटुन गेले. आमचे आयुष्य स्थिरावत होते तितक्यात ती बातमी आली................
ह्रदयविकाराच्या झटक्याने माझे पप्पा दगावले. मी हतबल झाले. मी, आई, दादा आणि ताई पोरके झालो होतो कायमचे. आमचे छ्त्र हरवले होते. आमचा आधार गेला होता. सगळ्चं संपल होत. मी हरले होते आयुषाशी. ज्या व्यक्ती साठी मी माझ्या प्रेमाला नकार दिला होता ती व्यक्तीच आज जगात नव्हती. मी एकटी पडली होते. संपली होते. मी नववी फेल होता होता वाचले होते. फक्त ग्रेस पास झाले होते मी. नेहमी फर्स्ट क्लास येणारी मी ३८% नी पास झाले होते. आईने ह्याचा वेगळाच अर्थ घेतला. तिला वाटलं माझं आणि त्याच लफडं चालु आहे. पण शपथ आम्ही बोलतही नव्हतो. मला पप्पा हवे होते. घरातलं वातावरण गढुळ झालं होतं. माझी १०वी होती. खुप महत्त्वाचं वर्ष ज्याच्यावर माझं पुर्ण करीअर अवलंबुन होतं. माझी रवानगी मामाकडे झाली. खुप लांब नव्हतं मामार्‍ह पण हो तास दिड तास जायचा ट्रेन मध्ये. सगळ्च बदलल होतं. नेहमी भरभरुन बोलणारी मी अबोल झाली होती. कोणालाच माहीती नव्हत माझ्या मनात काय चालु आहे ते.? मी आतुन पोकळ झाली होती. मला चक्क गर्लस स्कुल मधे घातल होतं. मी पळुन-बिळुन गेली तर..........
१० वी सरली ७८% मार्क काढुन मी शाळेत तिसरी आले होते. नाखुषीने. आई-मामा मात्र खुप खुश होते. मला सायंस हवय कॉमर्स म्हणुन भांडावुन सोडले होते. पुन्हा आई कडे की मामा कडे ही धुसफुस होतीच, शेवटी मी मामाकडे राहुन सायंस घ्यायचा निर्णय ठरला होता. मला काय हवय ते कोणिच नाही विचारले, विचारणार कसे.? माझे पप्पा नव्ह्ते ना मला जे हवय ते करुन द्यायला. अशीच एकदा आईला भेटायला गेले तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने सांगितले कि तो १०वी फेल झाला. हो तो फेल झाला होता. फक्त माझ्यामुळे. मी नकळत दुर गेले ह्याचा त्याने सदमा घेतला होता. मी पुन्हा जिंकुन हरले होते. तो आयुष्यात आल्यापासुन मी हरतचं चालले होते. मी त्याला भेटलेही नव्ह्ते आणि त्याच्याशी बोलले ही नव्ह्ते. दिवस सरत चालले होते. मी ६८% टक्के काढुन १२वीचा गड जिंकला होता. दादानी माझ्यासाठी इंजिनियरींगचा फॉर्म पण आणला होता. पुन्हा मला काय व्हायच आहे ते कोणाच्या लक्षातही नाही आले. सगळे संपले होते. लेट नाईट ट्युशनस म्हणुन मी सेल्फोन वापरु लागले होते. सहामहीनेही नव्हते झाले. मला त्याचा नंबर मिळाला. माझ्या एका जुन्या मैत्रिणीने दिला होता. मी त्याला एकचं मिसकॉल दिला. तो पण मित्राच्या मोबाईल वरुन. त्याने सलग १० वेळा कॉल केला आम्ही रीसिव्ह नाही केला. मी खुप शहाणी होते म्हणुन मित्राचा मोबाईल वापरला. दुसर्‍या दिवशी घरी जाताना त्याचा कॉल आला तो पण माझ्या सेल वर. माझा नंबर तर त्याच्या कडे नव्ह्ता मी फोन कट केला. सलग फोन येतच होते. शेवटी मी उचलला. हुश्श्श.........
माझ्या तोंडातुन भ्र निघत नव्हता. तो धडाधडा बोलु लागला. खुप बोलला अगदी ७ वर्षाचं साचलेल मळभ तो दुर करत होता. मी स्वच्छ होत होते. जणु तुषार अंगावरुन फिरावे तसे............. मग आम्ही चोरुन बोलु लागलो. दिवसातुन फक्त एकदाच बोलायचो. पण अगदी तास तास भर बोलतच राहायचो. मग पुन्हा तो तेच घेवुन आला जे मला नको होत तेव्हा ही आणि अगदी आताही. मला ईंजिनिअर व्ह्यायच होत आणि दिल्ली अभी बोहोत दुर थी. मग मी नंबर बदलला संपर्क तोडला. पुन्हा नव्याने सुरुवात करायची ठरवली.
माझी डीग्री झाली. कॉंपस जॉब मधुन मिळाला. अवघ्या ४ वर्षात मी एकाच कंपनीत मॉनेजर झाले. प्रगतीची शिखरे गाठताना तो कुठेतरी हरवुन गेला होता. मात्र दरवर्षी जत्रेला तो मला लांबुन नक्कीच दिसायचा. आम्ही बोलायचो नाही कारण मी आई कडे आलेली असताना मा़झ्यावर नेहमी कोणीतरी पाळतं ठेवायचे.
त्यादिवशी जत्रेत मात्र हाईट्स झाली. माझ्या त्याच मैत्रीणीने मला झटका दिला की,
त्याने लग्न केलं. पळुन. एका २० वर्षाच्या मुलीशी. जी त्याच्यापेक्षा तब्बल ७ वर्ष लहान होती. तिने त्याला जाळ्यात अडकवल होत. जबरदस्ती लग्न करायला लावल होतं. तो आता बिल्डर लाईन मध्ये गेला होता. बक्कळ पैसा होता. मी पुन्हा हतबल झाले. हे असे कसे झाले. का झाले. त्याने असे का केले. आणि त्याच दिवशी तो तिला घेवुन माझ्या समोर आला. माझी ओळख करुन दिली. ही माझी ती......... होत तो फक्त ती बोलला आणि ती लाजली हो ती लाजलीच होती. मला खुप विचित्र वाट्ल मग तो हळुच माझ्या कानात कुजबुजला तीला तुझ्याबद्दल सगळ माहीती आहे. तुझा फोटो अजुनही माझ्या बेडरुम मध्ये आहे. तो तिथुन कोणिच काढु शकणार नाही. मी तोडक मोडक बोलुन वेळ मारुन नेली. पुन्हा नियतीने आपला डाव साधला होता. अगदी अचुक.
मी पुन्हा हरले होते. पण आता कायमी. सगळ्चं संपल होत.
आता पुन्हा नव्याने सुरुवात करतेय. पण आता पुन्हा आकर्षीत व्ह्यायची ईच्छा मेली आहे.
पण ते नक्की काय होत तेच मला कळत नाही...........?
समाप्त: --------------------------------------------------

का

गुलमोहर: