------- बॅगंल स्टॅन्ड ------
मी खुप ठिकाणी बांगड्याचे स्टॅड शोधले पण मला
माझ्या छोट्या शोकेसमध्ये बसेल असे मिळेना.व
जे मिळत होते ते मोठे आणी उघडे रहात होते, व त्यावर
धूळ साठत होती;
म्हणूण मी घरच्या घरी थोड डोक चालवल.
मी लाकडी शोकेसमधला एक कप्पा रिकामा केला.
दोन लाकडी सारख्या आकाराच्या पट्ट्या घेतल्या. म्हणजे
एक इंच रुंद दहा ते बारा इंच लांबीच्या पट्ट्या.
दोन्ही पट्यावर समान अंतरावर अंदाजे दोनदोन इंचावर
म्हणजे बांगडीचा गोल बसेल इतक्या अंतरावर घेऊन
दोन्ही पट्ट्यावर एक एक खाच आक्रुतीत दाखवल्याप्रमाणे
पाडून घेतली. व त्या पट्ट्या ड्रावरच्या डावीकडे एक उजवीकडे
एक अशा पध्द्तीने खिळ्याच्या साहाय्याने बसविले.
व त्या दोन्ही खाचेमधे एक एक लाकडाची छोटि पट्टी ठेवत
गेले. व झक्कास घरच्या घ्ररी कमी खर्चामध्ये बांगड्याच स्टॅड तयार झाल.
खाचेमधे तुम्ही प्लास्टीक स्टीक्सही ठेऊ शकता.
साध्या टीपरयाही ठेऊ शकता. चांदण्याच्या जागी खिळे मारलेले
आहेत.
सुंदर बॅगल स्टॅड तयार झालंय.
घरच्या घरी केलेल्या गोष्टीचा आनंद काही वेगळाच असतो.
___________________________________________
*_____| |_____| |_____| |_____| |_____| |_____*
_____ _____ _____ _____ _____ _____
*____|__|_____|__|_____|_ |_____|__|_____|__|_____*
_