पुण्यात Consumer Court कुठे आहे?

Submitted by Chintu on 25 December, 2010 - 04:22

पुण्यात Consumer Court कुठे आहे?

२० डिसेम्बर ला DTDC ने Sony Walkman Courier (रू ३०००/-) केला. २३ ला डोम्बिवली ला पोहचले तेव्हा पार्सल मधे Sony Walkman नव्हता. DTDC च्या site वरुन तक्रार केली, अजून प्रतिसाद नाही, DTDC च्या ऑफिस मधे जाउन आलो, तिकडे तर कोणि दाद देत नाही.

पोलिसात तक्रार करायला गेलो होतो, पण काही उपयोग होइल असे दिसत नाही.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटवर मिळालेली माहिती : For all consumer complaints, consumers can approach:

District Consumer Disputes Redressal Forum

692, Pushpa Heights

Bibewadi

Pune 411037

Telephone No.: 24210364 (Registrar), 24217489 (Office)

धन्स अरुंधती,

मलासुद्धा हा पत्ता मिळाला, पण GoogleMap "BIBWEWADI" आणि PMPML "BIBEWADI" दाखवतय. बहुतेक हा प्रकार "हिजेवडी" (Hinjewadi) आणि "हिजवडी" (Hinjwadi) सारखा असावा, त्यामुळे माबोकराची मद्त घेतली.

तसेच कोणास Consumer Court चा अनुभव असल्यास कळ्वावा. नककी मद्त मिळ्ते का? आणि procedure माहीत आहे का?

मला काही माहिती मिळाल्यास मी कळवेनच. आणि माझा अनुभव इथे लिहीन.

पुणे ३७ म्हणजे बिबवेवाडीचाच पत्ता आहे. फोन नंबर्सवरून तरी तसेच वाटत आहे. तुमचा अनुभव इथे नक्की शेअर करा. शुभेच्छा! Happy

बिबवेवाडी मध्येच आहे...
सातारा रोड वरून बिबवेवाडीकडे जाताना जो टर्न घेतो तिथेच डावीकडे... कोणतेतरी रेस्टॉरंट आहे त्याच्या अलिकडे

धन्यवाद मनकवडा, सध्यातरी स्वतः चे वाहन नसल्याने PMT नेच प्रवास करतो त्यामुळे confirm केल.
PMPML च्या वेब् साइट वर बस स्टॉप असा दाखवतोय :

१. विमान नगर ते पुणे स्टेशन
२. पुणे स्टेशन ते हिरा बाग
३. हिरा बाग ते बिबवेवाडीकडे

हिरा बाग,स्वारगेट जवळ दाखवत आहे. हिरा बाग वरुन साधारण consumer court कितीसे दूर आहे?

पुणे स्टेशन ते कात्रज्/भारती विद्यापीठाकडे जाणारी कोणतीही बस पकडा आणि City Pride च्या किंवा त्याच्या पुढच्या स्टॉप ला उतरा.. तिथून चालत जाण्याच्या अंतरावर आहे.... त्या हॉटेलचे नाव बहुतेक "निमंत्रण" आहे

मिळालं का कंझ्युमर कोर्ट ?

सगळे कागद जपून ठेवा, वॉकमनच्या रिसीटसकट.

कंझ्युमर कोर्टमध्ये तक्रार करण्या आधी कुरीयर ऑफिसला भेट देउन तीथे तक्रार नोंदवावी लागेल. त्यांना तक्रारनिवारणासाठी वेळ द्यावा लागेल.

कंझ्युमर कोर्ट मधे उद्या जाण्याचा विचार होता. परन्तु जर "तक्रारनिवारणासाठी वेळ द्यावा लागेल." अस असल्यास २-३ दिवसानी जाइन. आणि हो सर्व रिसीटस xerox करुन ठेवल्या आहेत.

कुरीयर ऑफिसला भेट देउन तीथे तक्रार केलेली आहे. dtdc website वरुन ही तक्रार नोंदवली आहे.

तसेच http://www.ccccore.co.in/ इथेही तक्रार नोंदवली आहे. NIC कडून auto generated email dtdc head office ला गेलेला आहे.

Waiting for reply from all side....