गाणे बदनाम वाले

Submitted by अभय आर्वीकर on 14 December, 2010 - 19:09

सध्या माबोवर हबेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहे. तीन अध्याय झालेत.
आणि चवथा अध्याय यायला अवकाश दिसतोय.
तोपर्यंत जरा टाईमपास.....
..................................................................................
गाणे बदनाम वाले

कोण्या एका गावामाजी । वार्ता एक मिळाली ताजी ॥
की कोणी साधू बुवा संताजी । गावामध्ये प्रवेशले ॥१॥

वार्ता पसरता सार्‍या नगरी । गोळा होय सभ्य गावकरी ॥
म्हणती घ्यावा सप्ताह तरी । आता सत्संगाचा ॥२॥

त्यात एक सद्‍गृहस्थ । म्हणे होणार जगाचा अस्त॥
भक्तीमार्गे जावे समस्त । मोक्षप्राप्ती मिळविण्या ॥३॥

सल्ला असा ध्यानी भरला । की भक्तीमार्गे गेला तो तरला ॥
नाहीतर नरकामध्ये चरला । भोगवादी जाणावा तो ॥४॥

ठराव केला एकमताने । आणि गाठला स्वर्ग सुताने ॥
मग उभारले शामियाने । व्यासपिठ भव्यही ॥५॥

पारायणाची पाहती वाट । तिथे गर्दी झाली अफ़ाट ॥
पुजेचेही आणिले ताट । पण बुवा काही येईना ॥६॥

मग कुणाला आली शंका । अफ़वेनेही लूटली लंका ॥
त्यातच कोणी पिटवला डंका । की बुवा पळाले रे ॥७॥

एक नास्तिक संधी साधून । बोलून गेला गहिवरून ॥
घेऊ थोडी ’सिरियल’ पाहून । येईस्तोवर बुवाजी ॥८॥

मग वेळ लावियेला सार्थकी । टीव्हीत नाचत होती नर्तकी ॥
तिने वेधिले चित्त सर्व की । तमाम आपुल्याकडे ॥९॥

पारायणास भुलून गेले । नृत्यांगनेस जवळ केले ॥
ठेका धरूनी नाचू लागले । भावविके भक्तही ॥१०॥

आता मुन्नीचे नाम आले । बुवा झेंडूबाम झाले
गाणे बदनाम वाले । भारतभर फ़ेमस झाले ॥११॥

गंगाधर मुटे
...............................................................

सर्व भावविक्या भक्तांना विनंती त्यांनी
इकडे-तिकडे-कुणीकडेही जाऊ नये.
क्योंकी,
महाराज, पधार रहे है ........!!!

जियो मुटे जी ...
====
मला वाटतं <<तिथे गर्दी झाली अलोट >> च्या ऐवजी अफाट ज्यास्त "फिट" बसेल. ए.फा.सू. Happy

मुटेजी,
खास आणि भन्नाट !

मग वेळ लावियेला सार्थकी । टीव्हीत नाचत होती नर्तकी ॥
तिने वेधिले चित्त सर्व की । तमाम आपुल्याकडे ॥९॥

दुर्चित्रवाणीवर तर सध्या अशा अनेक नर्तकींचे खेळ चांगलेच रंगतात
Happy

धन्यवाद मंडळी. Happy

शुभंकरोतीजी,
तुमची सुचना छान आहे. बदल करतोय. Happy

आता मुंगीचे नाम आले । बुवा झेंडूबाम झाले
गाणे बदनाम वाले । भारतभर फ़ेमस झाले ॥११॥

>>>>>

मुटेजी, इथे "मुंगीचे" ऐवजी "मुन्नीचे" करावे....... त्या गाण्याला अनुसरून होईल Happy

बाकी........

मुटेश्वर महाराज की जय...... Proud