|| माबेश्वरी || तृतिय अध्याय. आयडीनामलक्षणे.

Submitted by ह.बा. on 10 December, 2010 - 00:39

|| माबेश्वरी ||
अध्याय तिसरा.
आयडिनामलक्षणे

सदर अध्यायात काहींना आपलेच नाव आहे असे वाटू शकते. पण हे लिखाण पुर्णतः काल्पनिक आहे. कुणाचाही अपमान झाल्यास मनावर घेऊ नये. मनावर घेतल्यास इथे सांगू नये.

मागील अध्यायी मी म्हणालू | पुढे सन्मार्गावरी बोलू |
परी आधी भेद आयड्यांचे खोलू | ऐसे मज वाटते ||

आयडीनाम्स्य्स्वेदोगळे भयान्कओवेगवेगळे
स्वभाव:त बुब्बुळे गुळमुळे नामात वैर्य्गळे

मिया पुसीले मास्तरे | नामे पाहोनी मी घाबरे |
घेतली ऐसी नामे का बरे | माबोकरे येथ ||

हेतू सांगोनी ज्ञानामृत पाजा | लवकर बोला जरा मनी लाजा |
दुसर्‍यांसमोर जाऊन असे माजा | मी बाळ नेणता ||

|पुनश्च गुरूजिच्च उगाच्च उवाच्च|
नामलिदलिदेकामबिदबिदे थांगस्य पत्तस्य नस्ताहा:
परिनवटवाळे अळुमाळे नामात अलगदम फस्ताहा:

गुरू बोलिला ती सांगेन मात | लावणार नाही गुरूशब्दास हात |
बदल करोनी न करेन घात | विश्वास ठेवावा ||

बालका नामास नको घाबरू | नावाला देऊ नको आबरू |
लक्षणांचा उहापोह करू | अंदाजाने आपापल्या ||

नाव असेल मल्लीनाथ | गाल हातभर गेले आत |
जन्मतः मलेरियाची साथ | ऐसा तो मल्ल गा ||

नाव पंत असेल | नेहमी बार मधे दिसेल |
श्रुंगारशतकाचे कौतुक करत बसेल | पंत असतो का असा ||

एक येईल सांगाडा जुजबी | नाव घेईल गुब्बी |
वार्‍यासवे उडेल नभी | कुपोषीत लेकरू ||

नाव घेईल प्रकाश | काव्य अंधारमय भकास |
वर करू जातो इतरांच विकास | उजेड हा असा ||

नाव असेल राखी | देईल नित्य फ्लाकी |
पण समोर येता काकी | म्हणावेसे वाटेल ||

नाव ज्याचे भुंगा सापडे | वस्तुतः तो दिसतो तुडतुडे |
डोळे जणू साबणाचे बुडबुडे | फूल कैसे भुलावे ||

नावात आहे वाघ ज्याच्या | हमखास पाठी लाग त्याच्या |
पांघरलेल्या कातडीच्या | आत हरीण सापडे ||

नाव कुणाचे रैना | वाटे हा सुरेश तर नैना?|
पण भेटताच कळते ही बेहना | वांदेच होतात ||

घेतले नाव रॉबिनहूड | घरी नाही चहा पूड |
बायको उगारते आसूड | ऐसी दैना असावी ||

नाम घेऊनी मोहिनी झाला | आवाज चक्क पुरूषी त्याला |
देवे स्त्री-नर एक केला | नमन त्या देवाला ||

नाव आरभाट | जाईल तेथ लावी वाट |
करावे का ताट | ओवाळण्या ऐशिया ||

जितेंद्र नावाचा कवी | वाचका मरणयातना दावी |
त्याला जीत कोठोनी मिळावी | इंद्र कसला भामटा ||

नाव जाईजुई | कुईकुई कोल्हेकुई |
ये गं आई | बडवू भुई ||

नावाचा एक जागू | त्याला प्रतिसाद मागू |
नको लगेच लागू | उशिराच देई तो ||

नाव एक मंदार | त्याला कळाला मेंदुचा आकार |
नावासवे मेंदु सुमार | बदामेविन लेकरू ||

काय तो गर्दभडौल | बेफिकीर फेगडी चाल |
मानापमानाची करील ढाल | नाव येथे वर्ज्युया ||

नावात गंगा जा तिला धर | खाली गाळ, प्लॅस्टीक वर |
पापा सार्‍या पात्रभर | पिंक टाकी दैत्यही ||

शिववाहने भरला कैलास | सलाईनला गांजाचा वास |
डॉक्टर परागंदा पेशंट खलास | जयहो माबो तुझी ||

आता येथून पुढचा अध्याय | लिहायचा कि नाय |
वाद झाला तर काय | प्रश्न सारे ||

परी श्रोते रहावे निवांत | आयडी ब्लॉकिंगची मज नाही खंत |
नाव घोवोनी किर्तीवंत | माबेश्वरी लिहीण ||

उत्तरार्ध

आता घ्यावा पवित्रा सावध | करू पाही ससा वाघाची पारध |
काही गिधाडे झाली गारद | संग्राम संपेना ||

ऐका काही आयडिनामांची किर्ती | जे महान उत्सवमुर्ती |
सगळीकडे नावात आणती भरती | जोडोनी अक्षरे ||

नाव घेती वर्षा_म | हा अंडरस्कोअर कोण अधम |
अर्थ लागेना रेषेचे काय काम | ओळखावे काय बा ||

मी_आर्या लिहावे कशाला | आर्या तूच हे कळेना ना का मला |
मी उगाच वाया गेला | भाषेवरी अन्यायु ||

नावात घातले एकशे आकरा (१११) | तो होत नाही का बळीचा बकरा |
अरे त्रीवार लिहीणार्‍या एकाच कोकरा | वाचव रे अंक हे ||

नाव घेतले इंग्रजी | तो पिझ्झा खातो की भजी |
हे जावोनी एकदा ग्गुरुजी | पाहिले पाहिजे ||

कुणी येते माउली गवरा | नावात बळे कोंबते नवरा |
काय तो प्रेमाचा फुलला डवरा | एकट्याने फिरवेना ||

जाईविना एकटी एक जुई | दुसरा क्या नाव मिला नही |
दुसर्‍याचे अर्धे नाव घेई | अर्धचोरटी कुठली ||

कुणी होतो देवमाणूस | स्वतःलाच पुसत बसले मुंगूस |
लोक म्हणाल्यावर घूस | देव्हार्‍यात बिनधास्त ||

सुर्याचे किरण आहे म्हणतो | सोबत कुट्ट अंधार आणतो |
उन्ह लागले की कन्हतो | काय प्रखर किरण ते ||

च ला काय म्हणू न | स चा उल्लेख करून |
आठवे मित्राचे मन | जाऊदे बिचार्‍याला ||

कन्हैय्या बनोनी फिरे कुश्या | किस किस से जाके पुश्या |
कुछ उपयोग झाला नश्या | होईल रे भविष्यात ||

मामी वर्तनाने बदामी | प्रत्यक्षात कुचकामी |
विबासात माहिर असामी | फोनावरीच केवळ ||

कुणामनी राग नसुदे | अध्याय वाचोनी जन हसुदे |
अनुमोदन दे असुदे | रुसूदे फसुदे डसुदे ||

आता शेवट झाला या पर्वाचा | उद्या गटगाध्याय पहिला वाचा |
तोवरी खुर्चीत बुडापटोनी नाचा | हास्य मावळू नये ||

पुंडलीकवरदे हारीविठ्ठल...... श्री .......

जाताना आपापल्या ताट वाट्या, बस्करं, ग्रंथांचे पाट घेऊन जाणे. चप्पल चोरीला गेली म्हणून तक्रार करू नये. माझ्याकडे माझा बूट आहे. मी कशाला चोरीन?

स्वतःनंदांचा आजचा दिवस फारच त्रासाचा गेल्याने त्यानी आज तीन अध्याय घेण्या ऐवजी. ग्रंथातले दोन अध्याय कटाप केले आहेत. सात अध्यायांचा ग्रंथ आता पाचातच उरकला जाईल.

गुलमोहर: 

.

हबा...
नाव असेल राखी | देईल नित्य फ्लाकी |
पण समोर येता काकी | म्हणावेसे वाटेल ||

>>> उग्गाच्च उग्गाच्च... Proud

नाव पंत असेल | नेहमी बार मधे दिसेल |
श्रुंगारशतकाचे कौतुक करत बसेल | पंत असतो का असा ||

>>> Rofl

नावात गंगा जा तिला धर | खाली गाळ, प्लॅस्टीक वर |
पापा सार्‍या पात्रभर | पिंक टाकी दैत्यही |
|

आररररररररररार ................ Lol

हबा, तू प्रामाणिकपणे लिहिलय, कुणालाही हिणवायचा किंवा दुखवायचा हेतू नाही हे मला माहित आहे त्यामुळे राग कसला???
लिहित रहा Happy

>> नाम घेऊनी मोहिनी झाला | आवाज चक्क पुरूषी त्याला |
देवे स्त्री-नर एक केला | नमन त्या देवाला ||
hahagalomany.gif

नाव पंत असेल | नेहमी बार मधे दिसेल |
श्रुंगारशतकाचे कौतुक करत बसेल | पंत असतो का असा ||

नाव ज्याचे भुंगा सापडे | वस्तुतः तो दिसतो तुडतुडे |
डोळे जणू साबणाचे बुडबुडे | फूल कैसे भुलावे ||

नावात आहे वाघ ज्याच्या | हमखास पाठी लाग त्याच्या |
पांघरलेल्या कातडीच्या | आत हरीण सापडे ||

नाम घेऊनी मोहिनी झाला | आवाज चक्क पुरूषी त्याला |
देवे स्त्री-नर एक केला | नमन त्या देवाला || >>>>>>>>>>>> Rofl मस्त Biggrin

सदा घाले घाव/ हबा त्याचे नाव
बांधे खुर्चीला गाठ/ गुर्जींच्या सोग्याची....

जाहला किती वाद/ केला नाही नाद
झाले निंदक बाद/ काव्यप्रतिभेने...

पर्सनल कमेंट्स आहेत या! त्यामुळेच अनावश्यक 'वाटल्या'!

विनोदाचे अस्तित्वच दुसर्‍याला दुखावण्यात किंवा दुसर्‍यावर काहीबाही लिहिण्यावर अवलंबून आहे तुमचे!

(लोकांना आवडते आहे हे दिसतेच आहे. पण मी मात्र 'बाकी चालु द्या' असे कधीच म्हणत नाही. मुळीच चालू देऊ नका असे मात्र म्हणतोय, पण ते केवळ एक वाचक या नात्याने! अधिकार कसलाच नाही मला!)

(यावरून आठवले - महाभारत कलियुगातील - या माझ्या धाग्यावर प्रतिसाद देताना आपण बहुतेक म्हणाला होतात की 'मायबोलीच्या आयडींवर केलेले सोडून बाकी विनोद ठीक' ! आपले हे लिखाण केवळ त्या आय डींवरच आहे याची आठवण करून द्यायला हवी मी आपल्याला!)

'खच्चून अर्धा तास'ही लागत नाही ही मिरवण्याची गोष्ट इतर लेखनप्रकारांसाठी ठीक आहे. हे असले लिहायला अर्धा तास तरी कशाला लागायला हवा??

कंप्लीट भंकस!

अर्थात, चतुर्थाध्यायात हा प्रतिसाद आपल्याला चांगले पोटेन्शिअल देईल याची कल्पना आहेच. पण तुमच्या मर्यादाच दिसतायत यातून!

-'बेफिकीर'!

Lol

तुमचे लेखन वाचून तुम्ही फार मोठे (वयाने Happy ) असाल असे वाटत होते. त्यादिवशी तुम्हांला गटगमध्ये बघून (भेटून म्हणत नाही, कारण, भेटणे झाले नाही.) मला जरा धक्काच बसला होता. Happy

एकमेव तुची ह बा
सदैव असतो धरूनी दबा
झडप घाली सर्वांवर बा
कुणा ना सोडिले......

विद्वत्ता ऐसी अफाट
भल्याभल्यांना पाडिले चाट
विनोदबुध्दीने लावितो वाट
बोलती बंद होतसे..... Happy

पण तुमच्या मर्यादाच दिसतायत यातून!
>>> अगदी बरोबर. अशीच प्रतिभा आहे आमची.

आपण गटगला गेलेल्याना वानरसेना म्हणाला होतात याची आठवण झाली. यानिमीत्ताने.

बेफिकीरजी,
निव्वळ गंम्मत आहे हो. कशाला वेळ वाया घालवताय. त्यापेक्षा एखादी कादंबरी लिहा नवी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सोमवारी ती कथा टाकतोय. बाकी कुणीही मनाला लावून घेऊ नये. हे काल्पनिक लिखाण आहे.

बेफिकीर, गंमत आहे हो ही सगळी... आता हे मी काही तुम्हाला सांगायला नकोच..>>>

राखी,

गंमत आहे ते मला माहीत आहे. पण ती गंमतच अनावश्यक आहे. त्या टवाळने या गोष्टीला मर्कट लीला असे संबोधले. हबा उत्तम लिहू शकतात. पण दुसर्‍याची खेचणे यावर त्यांचा भर अधिक असतो. आणि ते 'अत्र्यांप्रमाणे' असते तरी चालले असते. ही नुसतीच भंकस आहे.

Pages